Farmers Protest | क्रीडापटूंची शेतकऱ्यांना साथ, राष्ट्रपती भवनात पुरस्कार वापसीसाठी जाणाऱ्या खेळाडूंची पोलिसांकडून अडवणूक

शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला विविध स्तरातून पाठिंबा दिला जातोय.

Farmers Protest | क्रीडापटूंची शेतकऱ्यांना साथ, राष्ट्रपती भवनात पुरस्कार वापसीसाठी जाणाऱ्या खेळाडूंची पोलिसांकडून अडवणूक
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 5:07 PM

नवी दिल्ली : केंद्र सरकारने (Central Government) पारित केलेल्या 3 कृषी विधेयकावरुन (Farm Ordinances) देशभरात रान पेटलं आहे. देशातील विविध राज्यातील शेतकरी दिल्लीमध्ये आंदोलनासाठी (Farmers Protest) दाखल झाले आहेत. केंद्र सरकारच्या या कृषी विधेयकांवरुन 8 डिसेंबरला भारत बंदची हाक देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला अनेक स्तरातून पाठिंबा मिळताना दिसतोय. क्रीडा क्षेत्रही याबाबतीत मागे राहिले नाही. केंद्र सरकारच्या या कृषी विधेयकाचा निषेध म्हणून खेळाडूंनी आपल्याला देण्यात आलेले पुरस्कार परत करण्यासाठी तसेच आंदोलन करण्यासाठी राष्ट्रपती भवनाच्या दिशेने निघाले. मात्र या सर्व खेळाडूंची पोलिसांनी अडवणूक केली. Delhi Police stop sportspersons who were marching towards Rashtrapati Bhavan to return their awards

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पुरस्कार वापसी करणारे खेळाडू हे पंजाब आणि इतर राज्यातील आहेत. या एकूण 30 जणांमध्ये आजी आणि माजी खेळाडूंचा समावेश आहे. पैलवान करतार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, “30 खेळाडू आंदोनल करत राष्ट्रपतींना पुरस्कार परत करण्यासाठी जात आहेत. मात्र पंजाब आणि इतर खेळाडूंना पण पुरस्कार वापसी करायची आहे”.

मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांचा पुढाकार

कृषी विधेयकांविरोधात पुरस्कार वापसीच्या या प्रकारची सुरुवात काही दिवसांपूर्वीच झाली. सर्वात आधी पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी पद्म विभूषण पुरस्कार परत केला. यानंतर काही लेखकांनी साहित्य अकादमी पुरस्कार परत केले.

बॉक्सर विजेंदर सिंह दिवसांपूर्वी (Boxer Vijender Singh) शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ सिंधु बॉर्डरवर पोहचला. केंद्र सरकारने विधेयक मागे घेतले नाहीत, तर राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार (Rajiv Gandhi Khel Ratna Award) परत करणार, अशा इशारा विजेंदरने दिला. विजेंदरने काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती.

8 डिसेंबरला भारत बंदची हाक

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाविरोधात 8 डिसेंबरला भारत बंद पुकारण्यात आला आहे. या भारत बंदला बऱ्याच राजकीय पक्षांचा पाठिंबा आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला नेटीझन्सकडूनही मोठ्या प्रमाणात पांठिबा दिला जात आहे. आतापर्यंत सरकार आण शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत 5 वेळा चर्चा करण्यात आली. मात्र यातून केंद्र सरकारला तोडगा काढण्यात यश आलं नाही. त्यामुळे शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यान उद्या मंगळवारी ( 8 नोव्हेंबर) सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत भारत बंद असणार आहे. यानंतर पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या शिष्ठमंडळ आणि सरकारमध्ये पुन्हा चर्चा केली जाणार आहे.

संबंधित बातम्या :

Farmers Protest | शेतकऱ्यांसाठी 30 खेळाडू मैदानात, राष्ट्रपतींकडे पुरस्कार परत करणार!

FARMER PROTEST | कृषी कायद्यावर विरोधी पक्षांची भूमिका दुतोंडी ? केंद्रीय कायदा मंत्र्यांचा हल्लाबोल

जर शेतकरीविरोधी काळे कायदे मागे घेतले नाही तर खेलरत्न पुरस्कार परत करणार : बॉक्सर विजेंद्र सिंह

Delhi Police stop sportspersons who were marching towards Rashtrapati Bhavan to return their awards

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.