Twin towers: दिल्ली स्तब्ध, 15 सेकंद देशाचा हृदयाचा ठोका चुकला, धुराचे लोट अन् टाळ्यांचा गजर.. राडारोड्याची किंमत 15 कोटी
दिल्ली येथील ट्विन टॉवर इमारत पाडण्याची निर्धारित वेळ होती. एवढेच नाहीतर त्याअनुशंगाने तयारी ही गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. मात्र, प्रत्यक्ष इमारती पडत असतानाची स्थिती काही औरच होती. देशभरातील प्रत्येकाला आपण याचे साक्षीदार व्हावे असाच तो काही प्रसंग होता. अनेकांनी टेव्हिजनच्या माध्यमातून पाहिले पण त्यांच्या देखील काळजा ठोका चुकला होता.
दिल्ली : (Twin Towers Demolition) ट्विन टॉवर पाडले जाणार हे ऑगस्ट 2021 मध्येच निश्चित झाले होते. मात्र, तो दिवस आज उजाडला आणि भ्रष्टाचाराचं उंच प्रतिक असणाऱ्या ट्विन टॉवर अवघ्या काही सेकंदामध्ये जमिनदोस्त झाले. हे ट्विन टॉवर पाडण्यापूर्वीच सुरु झालेले सायरन हा शेवटपर्यंत कायम राहाणार होता. टॉवरमधील (blast) 9 हजार 640 स्फोटके अवघ्या काही क्षणात उडणार त्यापूर्वी निर्माण झालेली स्मशान शांतता आज संपूर्ण देशाने अनुभवली आहे. इमारती कोसळ्यापूर्वी तो सायरनचा आवाज, उपस्थितांचा गोंगाट आणि माध्यम प्रतिनीधींचे वार्तांकन.. हे सर्व सुरु असतानाच बरोबर अडीच वाजता या (Two Building) दोन्ही इमारती कोसळल्या त्या पत्त्याच्या बंगल्यासारख्या… हे पाहण्यासाठी जेवढी उत्सुकता ताणली गेली होती त्यापेक्षा कैक पटीने दिल्लीकरांच्या काळजाचा ठोका चुकला होता. सुरु होता तो केवळ सायरन.. अखेर बहुचर्चीत मोहिम यशस्वी झाल्यानंतर या परिसरात धुराचे लोट दिसत होते आणि कानावर पडत होता टाळ्यांचा गजर, एक मोहिम फत्ते झाल्यानंतर सर्वकाही नियोजनाप्रमाणे झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितल्यावरच दिल्लीकरांनी सुटकेचा श्वास सोडला.
सर्वकाही स्तब्ध अन् सायरनचा आवाज
दिल्ली येथील ट्विन टॉवर इमारत पाडण्याची निर्धारित वेळ होती. एवढेच नाहीतर त्याअनुशंगाने तयारी ही गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. मात्र, प्रत्यक्ष इमारती पडत असतानाची स्थिती काही औरच होती. देशभरातील प्रत्येकाला आपण याचे साक्षीदार व्हावे असाच तो काही प्रसंग होता. अनेकांनी टेव्हिजनच्या माध्यमातून पाहिले पण त्यांच्या देखील काळजा ठोका चुकला होता. इमारत पाडण्यापूर्वी नेमकी कशी कोसळणार, काही नुकसान तर होणार नाही, मोहिम फत्ते होणार की नाही अशा एक ना अनेक विचारांनी गोंगाट उठला होता. पण प्रत्यक्ष इमारती कोसळत असताना सर्वकाही शांत झाले. या दरम्यान सुरु होता तो सायरन. इमारती कोसळताच नजरेत पडत होता तो केवळ धूर.
राडारोड्याची किंमतच 15 कोटी रुपये
बेकायदेशीर असलेले ट्विन टॉवर हे अवघ्या 12 सेकंदामध्ये जमिनदोस्त झाले. या दोन्ही इमारती कोसळातच जणूकाही सबंध दिल्लीवरच धुळीचे पांघरुन आहे की काय असे चित्र निर्माण झाले आहे. ह्या इमारती पाडल्याने निर्माण झालेले मातीचे ढिगारे उचलण्यासाठी तब्बब तीन महिने लागणार आहेत. तर येथील राडारोड्याची किंमत ही तब्बल 15 कोटी एवढी आहे. त्यामुळे आजचा दिवस जेवढा ऐतिहासिक आहे तेवढाच या दिवसभरात झालेल्या घडामोडी कायम देशवासीयांच्या मनात घर करुन राहणार आहेत. राडारोड्याची किंमत 15 कोटी आणि ते ढिगारे उचलण्यासाठी 300 हून अधिक वाहने राहणार आहेत.
असे होते नियोजन
टॉवरमध्ये 9 हजार 640 होल करून त्यात 3 हजार 700 किलो दारूगोळा भरण्यात आला होता. आज दुपारी अडीच वाजता हा टॉवर पाडण्यात आला. या टॉवरच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांना संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या परिसरात न येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा टॉवर पाडल्यानंतर त्याचा त्याचा राडारोडा हटवण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी लागणार आहे. 3700 किलो स्फोटकांच्या सहाय्याने हा टॉवर पाडण्यात आला.