RBI News on 2000 Note : नोटबंदी पावली म्हणायची काय! राजस्थानमध्ये सापडले घबाड, बंडलच बंडल आले की बाहेर

RBI News on 2000 Note : नोटबंदीनंतर राजस्थान लागलीच चर्चेत आले आहे. जयपूर येथील योजना भवनात मोठे घबाड मिळाले आहे. त्यात 2000 रुपयांच्या नोटांची बंडलच बंडल आढळल्याने चर्चेला पेव फुटले आहेत.

RBI News on 2000 Note : नोटबंदी पावली म्हणायची काय! राजस्थानमध्ये सापडले घबाड, बंडलच बंडल आले की बाहेर
Follow us
| Updated on: May 20, 2023 | 9:07 AM

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) शुक्रवारी, 19 मे रोजी 2000 रुपयांच्या (Note) नोटा चलनातून बाहेर करण्याचा निर्णय घेतला. अचानक हा निर्णय घेतल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. नागरिकांना 30 सप्टेंबरपर्यंत या नोटा बदलण्याची मुभा देण्यात आली आहे. नोटबंदीनंतर राजस्थान लागलीच चर्चेत आले आहे. जयपूर येथील योजना भवनात (Jaipur Yojana Bhawan) मोठे घबाड मिळाले आहे. कोट्यवधी रुपयांच्या नोटांचा ढिगच या ठिकणी सापडला. त्यात 2000 रुपयांच्या नोटांची बंडलच बंडल आढळल्याने चर्चेला पेव फुटले आहेत.

पोलिसांनी दिली माहिती शुक्रवारी 2000 रुपयांच्या नोटबंदीचा बातमी येऊन धडकल्यानंतर लागलीच जयपूरमध्ये गोंधळ उडाला. जयपूरच्या योजना भवनातील आयटी विभागात (IT Department) 2 कोटी रुपयांच्या नोटा सापडल्या. या नोटांमध्ये 2 हजार आणि 500 रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. राजस्थानचे मुख्य सचिव, पोलीस निदेशक आणि पोलिस आयुक्त यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत याची माहिती दिली.

मुख्यमंत्र्यांना देण्यात आली माहिती नोटांचा इतका मोठा साठा सरकारी इमारतीत सापडल्याने अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत. पोलीस आयुक्त आनंद श्रीवास्तव यांनी याप्रकरणी तपास सुरु असल्याचे सांगितले. पूर्ण चौकशी झाल्यावरच याविषयीची पुढील अपडेट कळविण्यात येणार आहे. या सर्व घटनाक्रमाची माहिती मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांना देण्यात आली आहे. तसेच काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

असा लागला तपास संध्याकाळी उशीरा, पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त जयपूरचे आनंद श्रीवास्तव यांनी या संपूर्ण प्रकरणावरुन पडदा हटविला. येथील योजना भवनातील IT विभागातील तळघरात दोन कपाट आहेत. त्यांना उघडण्यात आले. त्यामध्ये एक लॅपटॉप बॅग आणि भलीमोठी ट्रॉली सुटकेस सापडली. त्यामध्येच हे घबाड सापडले. लागलीच याची पोलिसांना माहिती देण्यात आली.

2 कोटी रोख, 1 किलो सोने पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. नोटांची मोजणी झाली. यामध्ये 2 कोटी 31 लाख 49 हजारांच्या नोटा जप्त करण्यात आल्या. 1 किलो गोल्ड बिस्किट पण सापडले. या नोटांमध्ये मोठ्या प्रमाणावर 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा सापडल्या.

विशेष पथक करणार तपास राज्य सरकारने तातडीने याप्रकरणाचा तपास करण्यासाठी एक विशेष समिती गठित केली. ही समिती आता पुढील तपास करेल. हे कपाट अनेक महिन्यांपासून बंद असल्याची माहिती समोर येत आहे. शुक्रवारी संध्याकाळी हे कपाट उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.

आकडेवारी काय सांगते

  1. RBI च्या अहवालानुसार, 31 मार्च 2022 पर्यंत 2,000 रुपयांच्या (2000 Rupee note) एकूण 214.20 कोटी नोटा चलनात होत्या
  2. एकूण नोटांच्या हे प्रमाण 1.6% आहे. मूल्यानुसार एकूण 4,28,394 कोटी रुपयांच्या नोटा व्यवहारात
  3. इतक्या प्रमाणात नोटा असूनही त्या चलनात, व्यवहारात न दिसल्याने नागरिकांना पूर्वीच बंद होण्याची आशंका

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.