“छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणणारं सरकार द्यायचं की टिपू सुलतान की जय म्हणणार”; बेळगावमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांनी नस पकडली

लॉकडाउनच्या काळात नरेंद्र मोदीच भारतीयांच्या पाठीशी उभे राहिले होते, त्यांच्यामुळेच एवढ्या मोठ्या संकटातूनही भारत सहीसलामत बाहेर पडला आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणणारं सरकार द्यायचं की टिपू सुलतान की जय म्हणणार; बेळगावमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांनी नस पकडली
Follow us
| Updated on: May 04, 2023 | 6:30 PM

बेळगाव : कर्नाटक विधानसभेची रणधुमाळी जोरदारपणे सुरू आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यानी कर्नाटकमध्ये जाऊन एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या आहेत. खासदार संजय राऊत यांनी काल बेळगावमध्ये सीमाभागातील मराठी माणसांसाठी प्रचंड गर्दीत रोड शो केला होता. त्यानंतर आज भाजपचे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बेळगावमध्ये सभा घेऊन मराठी माणसांच्या आणि मराठी भाषेचा मुद्दा न हातळता देवेंद्र फडणवीस यांनी हिंदू-मुस्लीम मतदारांवर डोळा ठेऊन छत्रपती शिवाजी महाराज, आणि टिपू सुलतान विषयावर कर्नाटकातील मतदारांना भूलवण्याचा प्रयत्न केला.

देवेंद्र फडणवीस यांनी बेळगावमध्ये बोलताना काँग्रेसवर आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेळगावमध्ये बोलताना त्यांनी मराठी भाषिकांच्या कोणत्याही मुद्याला हात घातला नाही.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बेळगावमधील मतदार छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणणारं सरकार द्यायचं की, टिपू सुलतान की जय म्हणणारं सरकार द्यायचं हे तुम्हाला ठरवायचं आहे असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

कर्नाटकसह बेळगावमध्ये आज अनेक विकास कामं झाली आहेत, मात्र एक पैशाची दलाली कोणाला द्यावी लागली नाही असा विश्वास त्यांनी भाजपविषयी व्यक्त केला.

यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांचे विकासाचे राजकारण कसे आहे आणि ते सामान्य माणसांपर्यंत कसे पोहचले आहे त्याविषयीही त्यांनी आपले मत व्यक्त केले.

लॉकडाउनच्या काळात नरेंद्र मोदीच भारतीयांच्या पाठीशी उभे राहिले होते, त्यांच्यामुळेच एवढ्या मोठ्या संकटातूनही भारत सहीसलामत बाहेर पडला आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मागच्या वेळी भाजपला थोड्या जागा कमी पडल्या तरी बाकीच्या पक्षांची सर्कस सुरू झाली आहे असा टोला त्यांनी काँग्रेस आणि म. ए. समितीच्या नेत्यांना लगावला आहे.

आपलया देशातील विकासाची गाडी फक्त मोदींसोबतच पुढे जाऊ शकते असा विश्वास व्यक्त करत त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आज काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे असा टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला आहे.

बजरंग दलाने भारत माता की जय म्हटलं म्हणून त्यांना बंदी घालता का असा सवाल त्यांनी काँग्रेसला विचारला आहे. भारत तुम्हारे तुकडे होंगे हजार असं म्हणणाऱ्या दिल्ली युनिव्हर्सिटीतील लोकांचं राहुल गांधी सांत्वन करतात इतके हे नालायक लोक आहेत म्हणत त्यांनी काँग्रेसवर त्यांनी सडकून टीका केली आहे.

त्यांना अजूनही मोघलांबद्दल कळवळ आहे त्यांच्या हातात सत्ता द्यायची आहे का असा सवाल करून त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.