1 मार्चपासून कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा, नोंदणी कशी करावी?, लस कोठे मिळणार?, अनेक अवघड प्रश्नांची सोपी उत्तरं

येत्या 1 मार्चपासून कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होणार आहे. या टप्प्यात 60 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येणार आहे. (detail information corona vaccination)

1 मार्चपासून कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा, नोंदणी कशी करावी?, लस कोठे मिळणार?, अनेक अवघड प्रश्नांची सोपी उत्तरं
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Feb 28, 2021 | 3:54 PM

मुंबई : येत्या 1 मार्चपासून कोरोना लसीकरणाच्या ( corona vaccination) दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होणार आहे. या टप्प्यात 60 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येणार आहे. लस घेण्यासाठी 1 मार्चपासूनच सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात तुम्हाला पडलेल्या 5 प्रश्नांची सोपी उत्तरं. (detail information and answers of four questions of corona vaccination)

कोणाला लस मिळणार, किती रुपये द्यावे लागणार

कोरोनाला थोपवण्यासाठी लसीकरणाचा दुसरा टप्पा राबवला जात आहे. या टप्प्यात 60 पेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना लस देण्यात येईल. तसेच 60 ते 45 या वयोगटादरम्यान गंभीर आजार असणाऱ्या नागरिकांनासुद्धा कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. प्राथमिक माहितीनुसार या टप्प्यात 27 कोटी नागरिकांचे लसीकरण केले जाईल. जवळापास 12 हजार सरकारी रुग्णालयात कोरोना लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच खासगी दवाखान्यात ही लस घ्यायची असेल तर, एका लसीसाठी 250 रुपये द्यावे लागतील.

60 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना वय निश्चित करण्यासाठी आपले ओळखपत्र दाखवावे दाखवावे लागेल तर तर ज्या नागरिकांना गंभीर आजार आहेत, त्यांना डॉक्टरने दिलेले आजारी असल्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल.

तुमच्या सोयीनुसार लस घेता येणार

सध्या सीरम इन्टिट्यूचची कोव्हिशील्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन या दोनच लसी भारतात उपलब्ध आहेत. लसीकरणावेळी जी लस उपलब्ध असेल ती लस घ्यावी लागेल. आपल्या सोयीनुसार लस घेण्याची सुविधा सध्यातरी नाही. तसेच, लस घेण्यासाठीची वेळ आणि ठिकाण म्हटलं तर ते निवडण्याचा पर्याय लसीकरणाची नोंदणी करतानाच उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

किती केंद्रांवर लसीकरण होणार, नावनोंदणी कशी कराल.

लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात एकूण 12 हजार शासकीय रुग्णालयांत लसीकरण केले जाणार आहे. तसेच आयुष्मान भारत या योजनेचा लाभ ज्या खासगी रुग्णालयांत घेता येतो; त्या रुग्णालयातही कोरोना प्रतिबंधक लस घेता येईल. देशात एकूण 12 हजार शासकीय रुग्णालयांत कोरोन लस घेता येईल. तसेच खासगी रुग्णालयांतही कोरोना लस घेता येईल.

एका फोनववर किती जणांची नावनोंदणी

कोरोना लस घेण्यासाठी एका फोनावरुन चार जणांना लसीची नोंदणी करता येईल. आरोग्य सेतू अ‌ॅप वरुनसुद्धा लसीकरणासाठी नावनोंदणी करता येऊ शकते. त्यासाठी लवकरच सेतू अ‌ॅपवर ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्याबरोबच कोविन अ‌ॅप (CoWIN) आणि cowin.gov.in या संकेतस्थळावरसुद्धा कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नावाची नोंद करता येईल.

दरम्यान, सध्या देशात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. शासनाकडून नागरिकांना कोरना प्रतिबंधक नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यास सुरुवात होत असली तरी, नागरिकांना वैयक्तिक स्तरावर काळजी घेण्याची गरज असल्याचे मत आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

इतर बातम्या :

खासगी रुग्णालयात 250 रुपयात कोरोना लस, महाराष्ट्रातील 775 हॉस्पिटलची संपूर्ण यादी

पुण्यात खासगी रुग्णालयातही कोरोना लस, किती रुपये दर आकारणार?

Fact Check : येत्या 1 मार्चपासून कोरोनाच्या लसीसाठी खरंच 500 रुपये मोजावे लागतील?

(detail information and answers of four questions of corona vaccination)

'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...