जगभरात सध्या किती लसी? महाराष्ट्राला कोणत्या देशातून कुठली लस मिळू शकते?

कुठल्या देशातून महाराष्ट्राला कुठली लस मिळू शकते, ती लस किती प्रभावी आहे, हेच आपण आज समजून घेऊया. (covishield sputnik v pfizer moderna corona vaccine)

जगभरात सध्या किती लसी? महाराष्ट्राला कोणत्या देशातून कुठली लस मिळू शकते?
‘कोविशिल्ड’पाठोपाठ ‘कोवॅक्सिन’ही झाली स्वस्त
Follow us
| Updated on: Apr 20, 2021 | 9:42 PM

मुंबई : कोरोनाविरुद्ध भारताचंच नाही तर जगाचं युद्ध चालू आहे. या युद्धात अनेक देशांनी विविध लसींच्या रुपाने आपापली हत्यारं वापरण्यास सुरुवात केली आहे. भारतात कोरोनाविरुद्धच्या लढाईत अॅस्ट्राझेनिका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेली आणि पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युटने उत्पादित केलेली कोविशिल्ड ही लस दिली जात आहे. तर हैदराबादच्या भारत बायोटेकने विकसित केलेली कोवॅक्सिनही (Corona Vaccine) लसीकरण मोहिमेत नागरिकांना दिली जात आहे. मात्र, एवढं होऊनही कोरोनाचा आकडा प्रचंड वाढत आहे. महाराष्ट्रात त्यात अव्वल आहे. आणि त्यामुळेच लसीकरणाचा वेग वाढवण्यासोबतच इतर देशांमधील लसींचीही महाराष्ट्राला गरज आहे. हेच पाहता कुठल्या देशातून महाराष्ट्राला कुठली लस मिळू शकते, ती लस किती प्रभावी आहे, हेच आपण आज समजून घेऊया. परदेशी लसी समजून घ्यायच्या असतील तर आधी आपण देत असलेल्या लसींची क्षमता समजून घेणं जास्त गरजेचं आहे, तरच आपल्याला इतर देशातील लसींची गरज का आहे हे लक्षात येईल. (detail information of Covishield Sputnik V Pfizer Moderna Corona vaccine and vaccination method)

कोविशिल्ड ही लस सध्या आपल्याकडे दिली जात आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्युट सध्या या लसीचं उत्पादन करत आहे. पुढच्या महिनाभरात कंपनी तब्बल 6 कोटीहून अधिक लसीचे डोस बनवणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. चिंपाझीमध्ये सर्दी तयार करणारा विषाणू एडेनो वायरसचं कमकुवत रुपात या लसीद्वारे विकास करण्यात आला. अगदी कोरोनासारखा हा विषाणू वाटावा यासाठी यामध्ये बदल केला गेला आहे. मात्र, या विषाणूला जेव्हा शरीरात टाकलं जातं, तेव्हा त्याने कुठलाही आजार होत नाही. जेव्हा लसीद्वारे हा शरीरात सोडला जातो, तेव्हा शरीराला हा विषाणू अँटीबॉडी बनवण्यासाठी प्रेरित करतो. आणि जेव्हा कोरोना विषाणू तुमच्या शरीरावर हल्ला करतो, तेव्हा या अँटीबॉडीज त्याच्यावर हल्ला करुन त्यांचा खात्मा करतात.

कोविशिल्डची साठवण क्षमता कशी?

4 ते 12 आठवड्याच्या अंतराने या लसीचे 2 डोस दिले जातात. ही लस साठवणं अत्यंत सोपं आहे, कारण 2 ते 8 डिग्री तापमानात ही लस व्यवस्थित राहते. त्यामुळे या लसीचं वितरणंही अगदी सोपं आहे. आता ही लस किती प्रभावी आहे तेही समजून घेऊया.

आंतरराष्ट्रिय स्तरावरील संशोधनानुसार, आधी लसीचा दीड डोस आणि नंतर 4 ते 12 आठवड्याच्या अंतराने 1 डोस दिला तर ही लस 90 टक्के प्रभावी आहे. मात्र, या डोसला अद्याप मान्यता मिळालेली नाही. लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये अंतर वाढवलं तर ही लस 70 टक्क्यांपर्यंत प्रभावी आहे. मात्र, भारतात ज्या पद्धतीने पहिल्या डोसनंतर 28 दिवसाने दुसरा डोस दिला जातो, त्यात ही लस 55 टक्के प्रभावी ठरते.

भारतातील दुसरी लस आहे कोवॅक्सिन. मात्र, अद्याप या लसीबाबत कुठलेही आकडे समोर आलेले नाही, त्यामुळे ही लस किती प्रभावी आहे, याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठलंही संशोधन सापडत नाही. भारतात या लसीला आपात्कालीन मंजुरी देण्यात आली असली तरी या लसीचे तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सध्या सुरु आहेत. मृत कोरोना विषाणूपासून ही लस बनवण्यात आली आहे. भारत बायोटेकच्या दाव्यानुसार ही लस कोविशिल्ड इतकीच प्रभावी असल्याचं सांगण्यात येतं. आता येऊया मुख्य मुद्द्याकडे, परदेशातील कुठल्या लसी महाराष्ट्रासाठी संजीवनी ठरु शकतात?

01. रशियाची स्पुतनिक व्ही

पहिली लस आहे, रशियाची स्पुतनिक व्ही…नुकतीच भारत सरकारने या लसीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे कदाचित काहीच दिवसांत ही लस, भारतातील लसीकरण मोहिमेचा भाग होईल.

स्पुतनिक व्ही कोरोनावर किती प्रभावी?

सायन्स जर्नल असलेल्या द लँसेंटमध्ये या लसीचे शेवटच्या टप्प्यातील निष्कर्ष घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार स्पुतनिक व्ही ही लस कोरोनाविरुद्ध तब्बल 92 टक्के प्रभावी आहे. मॉस्कोतील गॅमालिया इन्स्टिट्युटद्वारे ही लस विकसित करण्यात आली आहे. या लसीचे ट्रायल होण्याआधीच रशियात या लसीला मंजुरी मिळाली होती. त्यामुळे ही लस वादातही सापडली होती. मात्र, आता ही लस अत्यंत प्रभावी असल्याचं समोर आलं आहे. ही लस विकसित करण्यासाठी सर्दीच्या विषाणूचा वापर करण्यात आला आहे. मृत कोरोना विषाणूला शरीरात पाठवण्यासाठी वाहक म्हणून सर्दीचा विषाणू वापरण्यात आला आहे. मात्र, त्यात असे बदल केले गेले आहेत, की ज्यामुळे माणसांना काहीही आजार होणार नाहीत. कोरोनाचा हा जेनेटिक कोड जेव्हा शरीरात जातो, तेव्हा शरीराला समजतं की कोरोनाने हल्ला केला आहे, त्यावेळी शरीराची प्रतिरक्षा प्रणाली कोरोनाविरुद्ध अँटिबॉडीज बनवते. त्यामुळे जेव्हा प्रत्यक्षात कोरोनाचा हल्ला होतो, तेव्हा शरीरात आधीपासूनच असलेल्या अँटिबॉडीज त्याला संपवतात.

इतर लसींपेक्षा स्पुतनिक व्ही वेगळी!

इतर लसींपेक्षा स्पुतनिक व्ही लसीचे खुराक वेगवेगळे आहेत, खुराक वेगवेगळे म्हणजे, पहिली लस आणि दुसरी लस ही पूर्णपणे वेगळी आहे. पहिल्या लसीच्या डोसच्या 21 दिवसांनंतर स्पुतनिक व्ही चा दुसरा डोस दिला जातो. दोन डोसमध्ये कोरोना विषाणूच्या मुकुटाला म्हणजेच ज्याला स्पाईक्स म्हणतात, त्याला निशाणा बनवलं जातं. विशेष म्हणजे, दोन्ही लसींमध्ये वेगवेगळे वाहक वापरले आहेत, त्यामुळे पहिल्या डोसनंतर दुसरा डोस जेव्हा दिला जातो, तेव्हा पूर्णपणे वेगळा वाहक असल्याने, पहिल्या डोसद्वारे तयार झालेल्या अँटिबॉडीज दुसऱ्या डोसला मारण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्या शरीरात व्यवस्थित पोहचतात, आणि काहीच कालावधीत पुन्हा नव्या अँटिबॉडी तयार होण्यास सुरुवात होते. त्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती अधिक चांगली होते.

स्पुतनिक व्ही ची साठवण क्षमता कशी?

स्पुतनिक व्ही ही लससुद्धा साठवण्यासाठी अतिशय सोयीस्कर आहे, 2 ते 8 अंश सेल्सिअस तापमानात ही साठवता येते, त्यामुळे भारतासारख्या उष्ण तापमानाच्या देशात ही यशस्वी ठरु शकते. सुत्रांच्या माहितीनुसार, भारताला स्पुतनिक व्हीच्या 75 कोटी लसी बनवून देण्याचा करार करण्यात आला आहे. भारतासह स्पुतनिक व्ही या लसीला जगातील 60 देशांची मंजुरी देण्यात आली आहे. या लसीच्या वितरणासाठी भारतातील डॉ. रेड्डीज लॅब, ग्लँड फार्मासह 5 कंपन्यासोबत करार करण्यात आलेत.

02. अमेरिकेत हीट ठरलेली मॉडर्ना लस

अमेरिकेत सध्या मॉडर्ना लसीची चांगलीच चर्चा आहे. कारण, ही लस अमेरिकेत चांगलीत प्रभावी ठरल्याचं दिसतं आहे. मात्र, या लसीला अद्याप भारतात मान्यता देण्यात आलेली नाही. मग आता महत्त्वाचा प्रश्न येतो, ही लस अमेरिकन नागरिकांवर सुरक्षित आहे, भारतीयांसाठी ही सुरक्षित आणि प्रभावी असेल का? तर अमेरिकेत राहणाऱ्या हजारो भारतीयांना ही लस देण्यात आली आहे, आणि ही लस त्यांच्यावरही प्रभावी ठरल्याचं दिसतं.

मॉडर्ना लसीची साठवण कशी?

मॉडर्ना ही लस अतिशीत तापमानात साठवावी लागते. या लसील साठवण्यासाठी उणे 20 अंश सेल्सिअस तापमानाची गरज आहे. मात्र, आपल्या फ्रिजचं तापमानही इतकंच असतं, त्यामुळे फ्रिजमध्ये ही लस महिनाभरापर्यंत सहज टिकू शकते.

मॉडर्ना कोरोनावर किती प्रभावी?

आतापर्यंत केल्या गेलेल्या संशोधनातून ही लस अत्यंत प्रभावी असल्याचं समोर आलं आहे. ही लस कोरोनावर तब्बल 94 टक्के प्रभावी असल्याचं समोर आलं आहे. 28 दिवसांच्या अंतराने या लसीचे 2 डोस घ्यावे लागतात. सध्या ही लस अमेरिकेत 15 डॉलर म्हणजेच, भारतीय रुपयांत 1130 रुपयांपर्यंत मिळते

03. अमेरिकेत प्रभावी ठरलेली फायझर लस

मॉडर्नासोबत अमेरिकेत सध्या फायझर या लसीचीही चर्चा आहे. ही लसही प्रभावी ठरल्याचं दिसलं आहे. श्रीमंतांची लस म्हणून सध्या ही जगभरात गाजते आहे. भारतातील अनेक धनाढ्य आणि श्रीमंत लोक ही लस घेण्यासाठी दुबईला जाताना दिसत आहे. 30 ते 35 लाखांचा खर्च करुन हे लोक दुबईला जाताना दिसतात. संयुक्त अरब अमीरातमध्ये (UAE) फायजर (Pfizer) सह चिनची सायनोफार्म लस आणि ब्रिटेनची एस्ट्राजेनेका लस मिळते. यापैकी भारतातील श्रीमंत लोक फायझरला अधिक पसंती देताना दिसत आहेत. विशेष म्हणजे दुबईत 40 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या लोकांना मोफत लस देण्यात येतेय. विशेष म्हणजे, फायझरनेच जगात पहिल्यांदाच 11 वर्षांहून खालील मुलांना लस देणं सुरु केलं आहे. लसीच्या इतिहासातील ही गोष्ट मानल जात आहे. विशेष म्हणजे लसीच्या आपात्कालीन वापरासाठी फायझरने भारत सरकारकडे परवानगी मागितली आहे. मात्र, अद्याप ती परवानगी देण्यात आलेली नाही.

फायझर लसीची साठवणूक कशी?

फायझर ही लस साठवण्यासाठी अतिशीत तापमानाची गरज लागते. तब्बल उणे 70 अंश सेल्सिअसला ही लस साठवावी लागते. ही लस जर भारतात वापरायची असेल तर त्यासाठी कोल्डचेन म्हणजेच शीतगृहांची निर्मिती करणं गरजेचं आहे. मात्र, सध्याच्या परिस्थिती हे कठीण असल्याचं दिसतं आहे. सध्या फ्रिजमध्ये ही लस 3 ते 5 दिवसांपर्यंतच टिकू शकते. त्यामुळे ही लस भारतासारख्या उष्ण हवामानाच्या प्रदेशात देणं अवघड होणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

फायझर लस कोरोनावर किती प्रभावी?

फायझर ही लस कोरोनावर अत्यंत प्रभावी ठरली आहे. विशेष म्हणजे ही लस कोरोनाच्या नवीन स्ट्रेनवरही प्रभावी असल्याचं काही संशोधनातून पुढं आलं आहे. ही लस तब्बल 95 टक्क्यांपर्यंत कोरोनावर प्रभावी आहे असं आतापर्यंतच्या संशोधनातून समोर आलं आहे. 21 दिवसांच्या अंतराने या लसीचे 2 डोस घ्यावे लागतात. ही लस अमेरिकेत 19.5 डॉलरला म्हणजेच भारतीय रुपयांत जवळपास दीड हजार रुपयांना मिळते.

या लसींशिवाय जॉन्सन अँड जॉन्सन ही अमेरिकन कंपनीची लसही बाजारात आहे, ही 79 टक्क्यांपर्यंत संरक्षण देते, मात्र, लस दिल्यानंतर काही परिणाम दिसल्याने काही भागात ही लस देणं थांबवण्यात आलं आहे. याशिवाय, भारतातील कोविशिल्ड बनवणारी सीरम ही, आपली स्वत:ची कोव्होहॅक्स ही लस बनवतेय, या लसीच्या चाचण्याही सध्या सुरु आहेत. नोव्हाव्हॅक्स आणि सीरम मिळून ही लस निर्मिती करतेय, आफ्रिका आणि ब्रिटनमध्ये जो कोरोनाचा नवा प्रकार सापडला, त्यावरही ही लस 89 टक्क्यांपर्यंत प्रभावी असल्याचं अदर पुनावालांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. तर ही लस कोरोनाच्या मूळ विषाणूविरोधात तब्बल 96.4 टक्के प्रभावी असल्याचं यूकेत झालेल्या तिसऱ्या चाचणी फेऱ्यातदिसून आलं आहे. देशभरात 19 ठिकाणी या लसीची चाचणी लवकरच होणार आहे.

एकूणच महाराष्ट्राला आता अधिक क्षमता देणाऱ्या लसींची गरज आहे. शिवाय, फक्त 2 लसींवर अवलंबून न राहता, अनेक लसींचे पर्याय उपलब्ध असणं गरजेचं आहे. तरच 1 मे नंतर अतिवेगाने लसीकरण केलं जाऊ शकतं. त्यासाठी महाराष्ट्राला थेट परदेशातून लस खरेदीची परवानगी मिळणं गरजेचं आहे, असं झालं तर कदाचित कोरोनाच्या कहरातून महाराष्ट्र पुढच्या 4 ते 5 महिन्यात बाहेर पडेल

इतर बातम्या :

PM Narendra Modi Bhashan Highlights : कोरोनाचं तुफान उधळून लावू, देश लॉकडाऊनपासून वाचवू : मोदी

(detail information of Covishield Sputnik V Pfizer Moderna Corona vaccine and vaccination method)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.