तब्बल 6 एकरांमध्ये विस्तार, जाणून घ्या सध्याच्या संसद भवनाचा खास इतिहास

भारतावर ब्रिटीशांची सत्ता असताना 1921 साली सध्याच्या संसद भवनाचे बांधकाम सुरु झाले. (information sansad bhavan)

तब्बल 6 एकरांमध्ये विस्तार, जाणून घ्या सध्याच्या संसद भवनाचा खास इतिहास
Follow us
| Updated on: Dec 10, 2020 | 4:07 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ( 10 डिसेंबर) प्रस्तावित नव्या संसद भवनाचे भूमिपूजन केले. हे नवे संसद भवन जुन्या संसदेपेक्षा अनेक अंगांनी वेगळे आणि आधुनिक असणार आहे. मात्र, भारत देशाच्या सर्वांगीन प्रगतीसाठी वेळोवेळी अनेक कायदे तयार करण्यात आले. या विधेयकांवर झालेल्या चर्चांची जी इमारत साक्षीदार आहे; त्या सध्याच्या संसद भवनावरही चर्चा होणे गरजेचे आहे. नव्या संसद भवनाच्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर जुन्या संसदेच्या इतिहासावर नजर टाकुयात. (detail information of current sansad bhavan)

बांधकामास सुरुवात कधी झाली? खर्च किती आला

सध्याच्या संसद भवनाच्या निर्माणाचा इतिहास अगदीच रंजक आहे. या इमारतीचे बाधकाम आपल्याला स्वातंत्र्य मिळण्याच्या कित्येक वर्षांआधीच सुरु करण्यात आले होते. भारतावर ब्रिटिशांची सत्ता असताना 1921 साली सध्याच्या संसद भवनाचे बांधकाम सुरु झाले. हे काम तब्बल सात वर्षे चालले. भवनाच्या निर्माणासाठी तब्बल 83 लाख रुपये खर्च आला. फेब्रुवारी 1921 मध्ये सुरु झालेल्या संसद भवन निर्माणाचे काम 18 जानेवारी 1927 पर्यंत चालले. या इमारतीचे भूमिपूजन डय़ुक ऑफ कॅनॉट या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या हस्ते करण्यात आले.

संसदेचा आकार 

सध्याच्या संसदेचा आकार गोलाकार आहे. 170.69 मीटर व्यासाची ही इमारत आहे. तब्बल सहा एकराच्या परिसरात सध्याचे संसद भवन विस्तारलेले आहे. या भवानाला एकूण 12 प्रवेशद्वार आहेत. संसदेचे लोकसभा, राज्यसभा, आणि सेन्ट्रल हॉल असे एकूण तीन भाग आहेत. (detail information of current sansad bhavan)

खासदार सरकारी बसने संसदेत यायचे

खासगी वाहनाने संसदेत येण्याची प्रथा पूर्वी नव्हती. पूर्वी कामकाज सुरु असताना चर्चेत सहभागी होण्यासाठी सर्व खासदार सरकारी बसने यायचे. प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर सर्व खासदार पायी चालत संसदेच्या आत प्रवेश करायचे.

नव्या संसदभवनाची वैशिष्ट्ये

1. नवे संसदभवन गोल नव्हे त्रिकोणी आकाराचे

2. संसदभवन स्वातंत्र्यांच्या 75 व्या वर्षी अर्थात ऑगस्ट 2022 पर्यंत बांधकाम पूर्ण

3. संसद भवनाला 861.90 कोटी रुपयांचा खर्च

4. केंद्रीय सचिवालय 2024 पर्यंत तयार होणार

5. लोकसभा-राज्यसभेतील रचना महाराष्ट्र विधानसभेसारखी

6. 64,500 स्क्वे.मी. अंतरावर असेल संसदभवन

7. बांधकामात 2 हजार प्रत्यक्ष, 9 हजार अप्रत्यक्ष कारागिर

9. एकूण 1,272 खासदार एकाच वेळी बसण्याची क्षमता

10. लोकसभेत 888 व राज्यसभेत 384 खासदार बसू शकणार

11. नव्या संसदेत सध्यापेक्षा 488 जादा खासदार बसू शकणार

12. नव्या संसदभवन परिसरात प्रत्येक खासदाराचे कार्यालय

सेंट्रल विस्ताची वैशिष्ठ्ये

1. एकूण बांधकाम 18.37 स्क्वे.कि.मी. भागात

2. सेंट्रल विस्ता प्रोजेक्टचा एकूण खर्च 11,794 कोटी रुपये

3. किमान 6 वर्षे काम चालत राहील

4. सेंट्रल विस्ताममध्ये एकूण 14 इमारती असतील

संबंधित बातम्या :

नरेंद्र मोदी आज करणार नव्या संसद भवनाचं भूमिपूजन, पाहा काय आहे वैशिष्ट्ये आणि विस्तार

New Parliament Lay Foundation Live | लोकशाहीच्या मंदिरातील पहिला प्रवेश अविस्मरणीय : मोदी

New Parliament | ‘ही’ भारतीय कंपनी नव्या संसदेचा निर्माण करणार, 7 कंपन्यांना मागे सारत मिळवलं कंत्राट

(detail information of current sansad bhavan)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.