नवी दिल्ली: आध्यात्मिक शहर काशीशी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अन्ययसाधारण संबंध राहिले आहे. पंतप्रधान होण्यापूर्वी आणि वाराणासीतून खासदार म्हणून निवडून येण्यापूर्वी त्यांना बाबा विश्वनाथ यांच्या पवित्र निवासाचं अनेकदा दर्शन घेण्याचं सौभाग्य लाभलं. जेव्हा जेव्हा त्यांनी काशीचा दौरा केला, तेव्हा तेव्हा ते काशीच्या अत्यंत निकट होत गेले. त्यामुळेच या शहराची परंपरा, इतिहास आणइ सभ्यतेला नवसंजीवनी देण्याचं काम मोदींनी केलं आहे. इच्छाशक्तीच्या बळावरच त्यांनी संपूर्ण काशीचा कायापालट केला आहे.
मोदींचं काशी शहराशी अतूट नातं आहे. त्यामुळेच काशीमध्ये ते जेव्हा पहिल्यांदा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले तेव्हा, “न मैं यहाँ आया हूँ न यहाँ लाया गया हूँ, मुझे माँ गंगा ने बुलाया है।” असं मोदी म्हणाले होते. त्यांचं हे वाक्य आज हजारो भारतीयांच्या मनामनात कोरलं गेलं आहे. त्यामुळेच त्यांनी काशीचा कायापालट करण्यास सुरुवात केली असून आज काशी शहर 360 अंशाने बदलून गेलं आहे. काशी विश्वनाथ मंदिराला गतवैभव मिळवून देण्याची त्यांची इच्छा होती. त्यामुळेच त्यानी काशी विश्वनाथ कॉरिडोरच्या विकासाला आरंभ केला.
गंगा नदीत स्नान करण्याची ही काशीतील सर्वात प्राचीन परंपरा आहे. या नदीत स्नान केल्यानंतर या नदीचं जल भाविक सोबत घेऊन जात असतात. तसेच मंदिरातही देवावर हे जल अर्पण केलं जातं. मात्र, या परिसरात होत असलेल्या बांधकामामुळे ही परंपरा खंडित होण्याच्या मार्गावर आहे. बेरोकटोकच्या बांधकामामुळे मंदिरपर्यंत पोहोचणे आणि दर्शन घेणं भाविकांसाठी कठिण झालं आहे. त्यामुळेच भक्तांची ही अडचण दूर करण्यासाठी मोदींनी काशी विश्वनाथ कॉरिडोरला मूर्तरुप दिलं आहे.
गंगा घाटापासून मंदिरांपर्यंतच्या रस्त्यावर प्रचंड घाण झाली आहे. त्यामुळे भाविकांना दुर्गंधीतूनच मार्ग काढावा लागत आहेत. त्यामुळे मोदींनी वास्तूविशारदांना बोलावलं आणि त्यांच्याशी चर्चा केली. गंगा घाटापासून मंदिरापर्यंत जाताना भाविकांचं मन प्रफुल्लित झालं पाहिजे. त्यांना आनंद आणि उत्साह वाटला पाहिजे, असा मार्ग तयार करा, अशा सूचना मोदींनी दिल्या. त्यानंतर कॉरिडोरचं काम सुरू झालं.
पीएम मोदींनी 8 मार्च 2019ला काशी विश्वानाथ कॉरिडोर प्रकल्पाचा शिलान्यास केला. त्यावेळी मोदींनी जनतेशी संवाद साधला होता. माहीत नाही. भोले बाबानेच बोलावलं असेल. खूप भाषण देतोस, आता इथं येऊन काम करून दाखव, असंच भोलेबाबांना म्हणायचं असेल. भोले बाबाचा आदेश असेल किंवा आशीर्वादही असेल. त्यामुळेच एक स्वप्न मार्गी लावण्याचा मी प्रयत्न करत आहे, असं मोदी म्हणाले होते.
प्रचंड लोकसंख्या, लोकांची नाराजी, वाद अशा असंख्य अडचणी असताना हा प्रकल्प कसा पूर्ण होईल, असं म्हटलं जात होतं. मालमत्तेच्या संपादनाची सर्वाधिक अडचण या प्रकल्पात होती. मात्र, सातत्याने लोकांशी संवाद साधूनच मार्ग काढा, अशा सूचना मोदींनी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. लवचिक धोरण अवलंबा, धैर्य दाखवा, सर्व तक्रारी दूर करून या समस्यातून मार्ग काढा, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. अधिकाऱ्यांनीही सूचनाबरहूकूम काम केलं. त्यामुळे अनेक वाद, तक्रारी आणि खटले निपटता आले. सुमारे 400 कुटुंबांनी दिलेल्या दानामुळेच या प्रकल्पासाठी जमीन मिळू शकली.
2017चे फोटो आणि आताचे फोटो पाहिले तर हा प्रकल्प राबवण्यासाठी किती तरी अडथळे दूर करावे लागल्याचं दिसून येतं. इतकी वर्ष या गोष्टीकडे कुणीच लक्ष दिले नव्हते. ते केवळ एका दूरदर्शी नेत्यानेच करून दाखवलं. कारण या परिसरात नेमकं काय करता येऊ शकतं, याचं चित्रं त्यांच्या डोळ्यासमोर होतं. म्हणूनच हा प्रकल्प मार्गी लागू शकला. मोदींना जे हवं होतं, ती गोष्ट अस्तित्वात येऊ शकली.
भूसंपादन ही या प्रकल्पाची एक बाजू होती. डिझाइन आणि विकास हा या प्रकल्पाचा दुसरा भाग होता. पंतप्रधानांनी सुरुवातीला केवळ आर्किटेक्ट्सला ब्रिफिंग केली नाही तर आर्किटेक्चरल डिझाइन सातत्याने इनपूट आणि अंतर्दृष्टीही दिली. या प्रकल्पाची 3डी मॉडलद्वारे समीक्षा करण्यात आली आहे. विकलांगांनाही मदत होईल अशा पद्धतीनेही हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. केवळ डिझाइन देऊन मोदी थांबले नाहीत, तर त्यांनी सातत्याने हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आपला सहभागही दर्शविला. कोविडच्या काळात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी या योजनेची माहिती घेतली. कोरोना असतानाही त्यांनी विक्रमी वेळात हे काम पूर्ण केलं. त्यामुळेच संकटाच्या काळातही काशी शहराने आपण थांबत नाही, थकत नाही, करून दाखवतो हे दाखवून दिलं आहे.
या कॉरिडोरमध्ये अडथळा असणारी बांधकामे हटवण्यात आली. मात्र, या दरम्यान येणाऱ्या ऐतिहासिक आणि प्राचीन वास्तूचं संरक्षणही करण्यात आलं. जेव्हा इमारती जमीनदोस्त करण्याचं काम सुरू झालं तेव्हा श्री गंगेश्वर महादेव मंदिर, मनोकामेश्वर महादेव मंदिर, जौविनायक मंदिर, श्री कुंभ महादेव मंदिर आदी सुमारे 40 हून अधिक अधिक प्राचीन मंदिरे या तोडकामात सापडली. रस्त्यातील बहुमजली इमारतीत ही मंदिरे गडप झाली होती. ही काही छोटी मंदिरे नाहीत. तर प्रत्येक मंदिराचा एक इतिहास आहे. अनेक युगांचा त्यांनी इतिहास आहे. ही प्राचीन मंदिरं म्हणजे देशाचा गौरवशाली इतिहास आणि परंपरा आहे. त्याशिवाय देशविदेशातील आपल्या देशाच्या वास्तू, दुर्मिळ गोष्टी देशात आणण्याचा मोदींनी प्रयत्न सुरू केला. त्याचाच एक भाग म्हणून कॅनडात माँ अन्नपूर्णा देवीची दुर्लभ मूर्ती आहे. ती परत आणण्यात आली आहे. काशी विश्वनाथा मंदिरात ही मूर्ती वसविण्यात आली आहे.
काशी विश्वनाथ कॉरिडोर हे एक माध्यम आहे. पण नव्या भारताचं मोदींनी पाहिलेल्या स्वप्नाचा तो एक टप्पा आहे. हा नवा भारत आधुनिक आणि आध्यात्मिक असा आहे. मोदींनी त्याची पायाभरणी केली आहे.
Video | MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 11 December 2021#News | #NEWSUPDATE https://t.co/eUjpv31kyT
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 11, 2021
संबंधित बातम्या:
जितेंद्र आव्हाड म्हणतात, राष्ट्रवादीला सर्व मार्ग खुले; विनायक राऊत म्हणाले, बंधन नाही
मुसळधार पाऊस खिडकीत उभा राहून… नव्हे, उभी राहून पाहा… राऊतांची जोरदार कविता, पवारांची हसून दाद