इस्रायलवरील हमासच्या हल्ल्यानंतर DGCA झाली सतर्क, मोटर संचालित हॅंग ग्लायडरचे नियम केले कठोर

हमासने इस्रायलवर मोठा हल्ला घडवून नरसंहार केल्याने जग आश्चर्यचकीत झाले आहे. त्यानंतर इस्रायलने हमास संपविण्यासाठी घनघोर युद्ध सुरु केले आहे. हमासने हा हल्ला पॅराग्लायडरवापरुन केला होता. त्यामुळे भारताने सावध झाला आहे.

इस्रायलवरील हमासच्या हल्ल्यानंतर DGCA झाली सतर्क, मोटर संचालित हॅंग ग्लायडरचे नियम केले कठोर
paragliderImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Oct 18, 2023 | 4:11 PM

नवी दिल्ली | 18 ऑक्टोबर 2023 : हमासने इस्रायलवर 7 ऑक्टोबर रोजी हल्ला करताना दुसऱ्या महायुद्धातील पॅराग्लायडरचा तंत्राचा वापर केला. हमासने मोटर आधारित ग्लायडरचा वापर करुन हवेतून अंधाधुंद गोळीबार करीत मोठी जिवीतहानी केली. भारतही दहशतवादा सामना कित्येक दशके करीत आहे. त्यामुळे या प्रकाराचा हल्ल्याचा वापर अतिरेक्यांकडून होऊ शकतो. त्यामुळे भारतीय नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने ( DGCA ) मोटर आधारित हॅंग ग्लायडर बाबत नियम कठोर केले आहेत.

हमासने इस्रायलवर मोठा हल्ला घडवून नरसंहार केल्याने जग आश्चर्यचकीत झाले आहे. त्यानंतर इस्रायलने हमास संपविण्यासाठी घनघोर युद्ध सुरु केले आहे. हमासने हा हल्ला पॅराग्लायडरवापरुन केला होता. त्यामुळे भारताने सावध होत आता मोटरवर चालणाऱ्या हॅंग ग्लायडरचे नियम कठोर केले आहेत. DGCA ने ग्लायडरच्या संचालन आणि सुरक्षेबाबत नविन नियम लागू केले आहेत. त्यानूसार कोणीही व्यक्ती डीजीसीएकडून मान्यताप्राप्त असलेल्या एक्झामर किंवा ट्रेनरच्या परवानगी शिवाय हॅंग ग्लायडरचा वापर करु शकत नाही.

डीजीसीएने एक्झामर किंवा ट्रेनर बनण्यासाठीची पात्रतेबद्दल देखील सांगितले आहे. याबाततच्या गाईडलाइनमध्ये म्हटले आहे की पावर्ड हॅंग ग्लायडरवर 50 तास आणि दोन मशिनवाल्या ग्लायडरवर 10 तास उड्डाण झालेली व्यक्ती असावी. त्यालाच एक्झामर किंवा ट्रेनर मानले जाईल. अशीच व्यक्ती नियामककडून मंजूरी मिळाल्यानंतर लोकांना मोटार संचालित हॅंग ग्लायडर उडविण्यासाठी अधिकृत परवानगी देऊ शकतो.

कोण उडवू शकते पावर्ड हॅंग ग्लायडर ?

DGCA ने अशा पॅराग्लायडर्सच्या संचालनसाठी पात्र होण्यासाठी मानदंड जारी केले आहेत. कोणालाही पावर्ड पॅराग्लायडर उडविता येणार नाही. त्याकडे पा्वर्ड हॅंड ग्लायडर उडविण्याचे 25 तासांचे कमर्शियल पायलटचे लायसन्स हवे. 50 तासांचा उड्डाण अनुभव आणि ज्याच्याकडे पूर्वीचे लायसन्स आहे तो देखील पात्र मानला जाईल.

डीजीसीएकडून गृह मंत्रालयाद्वारे परवानगी मिळाल्याशिवाय हॅंग ग्लायडरला विकण्याची किंवा खरेदी करण्याला मंजूरी मिळणार नाही. हॅंड ग्लायडर खरेदी करणाऱ्याची पार्श्वभूमीची चौकशी केल्यानंतरच ग्लायडर कोणा व्यक्ती किंवा फर्मला विकता किंवा स्क्रॅप करता येईल. तसेच मालक किंवा ऑपरेटर ग्लायडर कोणालाही भाड्याने देऊ शकणार नाही. तसेच त्यावर परवानगी शिवाय कोणतेही रिमोट सेंसिंग उपनगर, हत्यार, फोटोग्राफी, व्हिडीओ रेकॉर्डींग लावता येणार नाहीत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.