काय म्हणायचं आता या रेल्वे अधिकाऱ्यांना? थेट हनुमानालाच पाठवली नोटीस…
हनुमानाला दिलेल्या नोटीशीमध्ये मंदिराची ही जमीन रेल्वे खात्याची असून, त्यावर बेकायदेशीरपणे कब्जा करून मंदिर उभारल्याचे म्हटले आहे.
रांचीः सरकारी कार्यालयांकडून कधी काय होईल सांगता येणार नाही. अशीच एक धक्कादायक घटना रेल्वे खात्याकडूनही घडली (Railway Department) आहे. म्हणजे तुम्ही कधी ऐकले आहे का, की कोणत्याही सरकारी विभागाकडून थेट देवालाच नोटीस काढल्याचे. त्या देवाला नोटीस बजावतानाही तुम्ही बांधलेले मंदिर (Hanuman Temple) हे सरकारी जमिनीवर असून त्याचे बांधकाम बेकायदेशीर असल्याचे त्या नोटीसमध्य म्हणण्यात आले आहे.
तर फक्त नोटीस देऊनच हे प्रकरण थांबले नाही तर नोटीस दिल्यानंतर 10 दिवसांच्या आत ही जमीन रिकामी करण्याचे आदेशही काढण्यात आले.
आणि सांगण्यात आले की, नाही तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. ही नोटीस दिली आहे ती, झारखंडमधील रेल्वे विभागाने, भगवान हनुमानाला. तसेच मंदिर हटवण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.
रेल्वे विभागाच्या आदेशाचे पालन केले गेले नाही तर कायदेशीर कारवाईचा बडगा उचलण्यात येईल असंही त्यांनी सांगितले आहे.
रेल्वे विभागाकडून ही नोटीस फिल्मी स्टाईलने मंदिरावर चिकटवण्यात आली आहे. रेल्वे विभागाच्या या कारनाम्यामुळे येथील स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक् केला जात आहे.
याप्रकारे जाणीवपूर्वक नोटिसा चिकटवून आमच्या भावना दुखावल्या जात असल्याची तक्रारही केली गेली आहे.
खरं तर हे संपूर्ण प्रकरण आहे झारखंडच्या धनबाद जिल्ह्यातील बेकरबंद कॉलनीतील आहे. बेकरबंध कॉलनीतील हनुमान मंदिरात रेल्वे विभागाने नोटीस दिली आहे.
नोटीसमध्ये अतिक्रमण संदर्भात भगवान हनुमान यांनाच थेट आदेश देऊन मंदिर हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नोटिशीचा विषय अनधिकृत कचरा धरण वसाहतीतील रेल्वेच्या जमिनीवर बेकायदा कब्जा केल्याचे म्हटले आहे. ही नोटीस पूर्व मध्य रेल्वेच्या सहाय्यक अभियंत्याच्यावतीने दिली गेली आहे.
हनुमानाला दिलेल्या नोटीशीमध्ये मंदिराची ही जमीन रेल्वे खात्याची असून, त्यावर बेकायदेशीरपणे कब्जा करून मंदिर उभारल्याचे म्हटले असून हे बेकायदेशीर असल्याचेही म्हटले आहे.
10 दिवसांच्या आत ही जागा रिकामी करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे.