Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhirendra Shastri: बागेश्वर धामच्या धिरेंद्र शास्त्रीला जिवे मारण्याची धमकी, कारणही अत्यंत विचीत्र‍!

धीरेंद्र शास्त्री यांचा दैवी दरबार चर्चेत आहे. याबाबत नागपूरच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आव्हानही दिले होते. तेव्हापासून धीरेंद्र शास्त्री प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत.

Dhirendra Shastri: बागेश्वर धामच्या धिरेंद्र शास्त्रीला जिवे मारण्याची धमकी, कारणही अत्यंत विचीत्र‍!
धिरेंद्र शास्त्रीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 24, 2023 | 12:45 PM

छतपूर, गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले बागेश्वर धामचे (Bageshwar Dham) पीठाधीश्‍वर धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी छतरपूर येथील बामिठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या धीरेंद्र शास्त्री रायपूरला कथा सांगण्यासाठी गेले आहेत. बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी त्यांच्यात चमत्कारीक शक्ती असल्याचा दावा केल्यानंतर माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. याशिवाय सोशल मिडीयावरदेखील त्यांच्या या कथित चमत्काराचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या या व्यक्तीला धीरेंद्र शास्त्री यांना भेटायचे होते, असे सांगितले जात आहे.

भेटायला वेळ न दिल्याने दिली धमकी

छतरपूरचे पोलीस अधीक्षक सचिन शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार अमर सिंह असे संशयिताचे नाव आहे. सिमधारकाची चौकशी सुरू आहे. ते म्हणाले- आम्ही आयपीसीचे कलम 506, 507 लावले आहे. ही व्यक्ती काही समस्येने त्रस्त होती आणि त्याला महाराजांना भेटायचे होते, मात्र या व्यक्तीला बोलायला वेळ न दिल्याने असे कृत्य केले आहे.

हे सुद्धा वाचा

धीरेंद्र शास्त्री यांचा दैवी दरबार चर्चेत आहे. याबाबत नागपूरच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आव्हानही दिले होते. तेव्हापासून धीरेंद्र शास्त्री प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. धिरेंद्र शास्त्री यांना फोनवरून कोणीतरी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे बोलले जात आहे. वादात आल्यावर अशा धमक्या मिळाल्यानंतर छतरपूरच्या बामिठा पोलिस ठाण्यात धीरेंद्र शास्त्री यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सध्या बागेश्वर धामचे पीठाधीश्‍वर छत्तीसगडच्या रायपूरमध्ये आहेत. 25 जानेवारीला ते पुन्हा बागेश्वर धामला येत आहेत. छतरपूरचे एसपी सचिन शर्मा यांनी गुन्हा दाखल झाल्याची पुष्टी केली आहे. यासोबतच तपासही हाती घेतल्याची चर्चा आहे. भामिठा पोलिस स्टेशनमध्ये कलम 506, 507 भादंवि अन्वये अमरसिंग या अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर छतरपूर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत, मात्र अद्यापपर्यंत पोलिसांना या संदर्भात ठोस काहीही मिळालेले नाही.

कामरानं शिंदेंना गद्दार म्हटलं पण दादांचा व्हिडीओ होतोय व्हायरल
कामरानं शिंदेंना गद्दार म्हटलं पण दादांचा व्हिडीओ होतोय व्हायरल.
कामराच्या त्या गाण्यावर शिंदें स्पष्टच म्हणाले, मी दुर्लक्ष केलं पण...
कामराच्या त्या गाण्यावर शिंदें स्पष्टच म्हणाले, मी दुर्लक्ष केलं पण....
राज्यात अवकाळीचा कहर, भर उन्हात 'या' जिल्ह्यात पाऊस अन् बळीराजा चिंतेत
राज्यात अवकाळीचा कहर, भर उन्हात 'या' जिल्ह्यात पाऊस अन् बळीराजा चिंतेत.
'नव्या बाटलीत जुनीच दारू, त्यात नवं काय?' 'सामना'तून सरकारला डिवचलं
'नव्या बाटलीत जुनीच दारू, त्यात नवं काय?' 'सामना'तून सरकारला डिवचलं.
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.