Tejinder Bagga : तैवानमधून डिप्लोमा, दिल्लीतून निवडणूक… प्रशांत भूषण यांना थप्पड मारून तेजिंदर बग्गा प्रसिद्धीच्या झोतात
तेजिंदरपाल सिंग बग्गा नेहमीच चर्चेत असतात. मग ते सर्वोच्च न्यायालयाचे वकील प्रशांत भूषण यांना थप्पड मारणे असो किंवा अरुंधती रॉय यांच्या पुस्तक कार्यक्रमात गोंधळ घालणे असो. दिल्लीच्या रस्त्यांवर तेजिंदरपाल सिंग बग्गा यांच्या अनेक मुद्द्यांवरच्या पोस्टर्सचीही जोरदार चर्चा रंगली. अलीकडेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर झालेल्या निदर्शनातही त्यांचे नाव आले होते.
नवी दिल्ली : भाजप नेते तेजिंदरपाल सिंग बग्गा (BJP leader Tejinderpal Singh Bagga) यांच्या अटकेवरून दिल्लीत जोरदार राजकीय खळबळ उडाली आहे. दिल्ली आणि पंजाबसह हरियाणात सध्या सकाळपासूनच हायप्रोफाईल नाट्य पहायला मिळत आहे. प्रथम पंजाब पोलिसांनी दिल्लीत येऊन बग्गाला अटक केली. पंजाब पोलिसांनी (Punjab Police) बळाचा वापर केला. तेजिंदरला घरातून उचलून सोबत घेऊन गेले. त्यावेळी घरी फक्त वडील होते. त्यांनतर बग्गा यांना मोहालीला घेऊन जाण्याची तयारी होती. त्याचदरम्यान बग्गा यांना अटक केल्यावर प्रीतपाल सिंग यांनी घाईघाईने जनकपुरी पोलीस ठाणे गाठले. मात्र कुरुक्षेत्रातच हरियाणा पोलिसांनी (Haryana Police) पंजाब पोलिसांचा ताफा अडवला. आणि त्यानंतर पंजाब पोलिसांवर अपहरनाचा गुन्हा… असे राजकीय नाट्य रंगल्यानंतर आता कोण आहेत हे बग्गा असे सर्वत्र विचारले जात आहे.
बग्गा हे वडिलांसोबत घरी
पंजाब पोलिस तेजिंदरपालला अटक करण्यासाठी पोहोचले तेव्हा दिल्ली पोलिस त्यांच्यासोबत नव्हते. तेजिंदरला अटक केल्यानंतर पंजाब पोलिसांचे तीन जण निश्चितपणे जनकपुरी पोलिस ठाण्यात पोहोचले. येथे त्यांनी तेजिंदरच्या अटकेची माहिती दिली. दिल्ली पोलिसांनी विचारले- बग्गाला कुठे नेले जात आहे. अटक झाली की नाही… आणि कुठे हजर करणार आहात?
कथेत नवीन ट्विस्ट, हरियाणा विरुद्ध पंजाब पोलिस
दरम्यान, मोहाली पोलिसांनी एक प्रेस नोट जारी करून तेजिंदरला कायद्यानुसार अटक करण्यात आली असून त्याला मोहाली कोर्टात हजर करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. पण तरीही एक ट्विस्ट होता. बग्गा यांना मोहालीला घेऊन जाणाऱ्या पंजाब पोलिसांच्या वाहनांना हरियाणातील कुरुक्षेत्र पोलिसांनी रोखल्याची बातमी आली. आता हरियाणा पोलीस आणि पंजाब पोलीस आमनेसामने आहेत.
बग्गा यांना कोणत्या आरोपाखाली अटक?
पंजाब पोलिसांच्या म्हणण्यानुसार, 1 एप्रिल 2022 रोजी पंजाब पोलिसांच्या सायबर सेलने मोहालीमध्ये गुन्हा दाखल केला होता. तेजिंदर पाल सिंग बग्गा यांच्यावर हिंसाचार भडकवणे, गुन्हेगारी धमकी देणे असे आरोप आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बग्गा मीडियाला आणि ट्विटरवर दिलेल्या मुलाखतींमध्ये प्रक्षोभक, खोटी आणि जातीयवादी विधाने करून लोकांना भडकवत आहे.
कोण आहेत बग्गा?
आपल्या ट्विट्समुळे नेहमीच चर्चेत राहणारे तेजिंदरपाल सिंग बग्गा हे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते आहेत. त्यांच्या ट्विटर बायोनुसार, ते भाजप युवाचे राष्ट्रीय सचिव, उत्तराखंड भाजप युवकचे प्रभारी आणि दिल्ली भाजपचे प्रवक्ते आहेत. दिल्लीतील हरिनगर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही लढवली आहे. ते कुल्हाड बिर्याणीचे संस्थापकही आहेत.
तैवानमधून डिप्लोमा
2020 मध्ये दिलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार तेजिंदरपाल सिंग बग्गा यांच्याकडे 18 लाखांची संपत्ती आहे. इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीमधून ते बॅचलर डिग्री घेत होते आणि त्यांनी तैवानच्या नॅशनल डिफेन्स युनिव्हर्सिटी (रिपब्लिक ऑफ चायना) मधून नॅशनल डेव्हलपमेंट कोर्टमध्ये डिप्लोमा केला आहे.
प्रशांत भूषण यांना चपराक, दिल्लीच्या रस्त्यांवर पोस्टर्स
तेजिंदरपाल सिंग बग्गा नेहमीच चर्चेत असतात. मग ते सर्वोच्च न्यायालयाचे वकील प्रशांत भूषण यांना थप्पड मारणे असो किंवा अरुंधती रॉय यांच्या पुस्तक कार्यक्रमात गोंधळ घालणे असो. दिल्लीच्या रस्त्यांवर तेजिंदरपाल सिंग बग्गा यांच्या अनेक मुद्द्यांवरच्या पोस्टर्सचीही जोरदार चर्चा रंगली. अलीकडेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर झालेल्या निदर्शनातही त्यांचे नाव आले होते.