ऑक्सिजनसाठी सेक्सची मागणी; कोरोनाग्रस्त पित्याचे प्राण वाचवण्यासाठी हतबल तरुणीचा शेजाऱ्याकडून गैरफायदा
कोरोनाग्रस्त पित्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर्सचा शोध घेणाऱ्या मुलीकडे शेजाऱ्याने सेक्सची मागणी केली गेल्याचा धक्कादायक प्रकार ट्विटरवरून उजेडात आला आहे. या प्रकाराविरोधात सोशल मीडियात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. (Disadvantage of a helpless young woman from a neighbor to save the life of a coronated father)

नवी दिल्ली : कोरोना विषाणूमुळे सर्वसामान्य कुटुंबांची पुरती वाताहात उडवली आहे. महामारीत जवळच्या माणसांचा, आई-वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे अनेकांवर अनाथ होण्याची वेळ आली आहे. ही व्यथा अजून थांबलेली नाही. अजूनही देशाच्या कानाकोपऱ्यात आपल्या जवळच्या व्यक्तींचे प्राण वाचवण्यासाठी जीवघेणी धावपळ सुरू आहे. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना ऑक्सिजनसाठी उन्हातान्हात वणवण भटकावे लागत आहे. ऑक्सिजन सिलिंडर्सच्या नावाखाली बक्कळ पैसे उकळणारे महाभागही कमी नाहीत. लोकांच्या हतबलतेचा, गरीब परिस्थितीचा अनेक ठिकाणी गैरफायदा घेतला जात आहे. अशातच मानवतेला काळीमा फासणारा प्रकार सोशल मीडियातून चव्हाट्यावर आला आहे. कोरोनाग्रस्त पित्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर्सचा शोध घेणाऱ्या मुलीकडे शेजाऱ्याने सेक्सची मागणी केली गेल्याचा धक्कादायक प्रकार ट्विटरवरून उजेडात आला आहे. या प्रकाराविरोधात सोशल मीडियात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. (Disadvantage of a helpless young woman from a neighbour to save the life of a coronated father)
तरुणीच्या ट्विटला हजारो लोकांचा प्रतिसाद
गरीब मुलीच्या वाट्याला आलेल्या या प्रकाराबाबत एका तरुणीने सोशल मीडियातून वाचा फोडली आहे. या तरुणीने पीडित मुलीला लहान बहिण म्हणून संबोधले आहे. पीडित मुलगी आपल्या कोरोनाग्रस्त पित्यासाठी ऑक्सिजनचा शोध घेत होती. त्याचवेळी तिच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने मुलीकडे ऑक्सिजन सिलिंडर्सच्या बदल्यात सेक्सची मागणी केली. अत्यंत घाणेरड्या भाषेत त्या व्यक्तीने पीडित मुलीकडे सेक्सची मागणी केली. ती व्यक्ती नंतर लैंगिक छळवणुकीचा आरोप फेटाळत आहे. अशा प्रसंगी काय करायचे, असा सवाल हा प्रकार उजेडात आणणाऱ्या भावरीन कंधारी या तरुणीने सोशल मीडियातून उपस्थित केला आहे. माझ्या मित्राच्या बहिणीच्या बाबतीत हा कटु अनुभव घडल्याचे तिने निदर्शनास आणून दिले आहे. तिने यासंदर्भात ट्विट करताच सोशल मीडियातील हजारो तरुण-तरुणींनी या प्रकारावर चीड व्यक्त केली. तसेच नराधमाला कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी अनेकांनी केली आहे.
अत्याचाराविरोधात ऑनलाईन चळवळ
भावरीन कंधारी या तरुणीच्या ट्विटनंतर सोशल मीडियात कोरोना महामारीतील अत्याचाराविरोधात ऑनलाईन चळवळच उभी राहिली आहे. संपूर्ण देशभरातील हजारो तरुण-तरुणींनी या गंभीर प्रकारावर चर्चा करून सरकारला कारवाईसाठी भाग पाडण्याचा निर्धार केला आहे. नराधमाचे नाव जाहीर करून त्याची समाजात इज्जत काढण्याची मागणी केली आहे, तर अनेकजण याबाबत पोलिसांकडेच रितसर करण्याचा पर्याय योग्य असल्याचे मत व्यक्त करीत आहेत. याचवेळी अनेकांनी पीडित मुलीला न्याय मिळेल की नाही, याबाबतही शंका उपस्थित केली आहे. त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर अविश्वास व्यक्त केला आहे. पोलिस वेळकाढू धोरण अवलंबतील. त्यामुळे गुन्हा सिद्ध होईल की नाही, तसेच पीडितेला न्याय मिळेल की नाही, याबाबत शाश्वती देता येणार नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. (Disadvantage of a helpless young woman from a neighbour to save the life of a coronated father)
जाणून घ्या काय आहे आयर्न डोम सिस्टम? ज्यामुळे इस्त्रायल अद्याप सुरक्षितhttps://t.co/Pxq3ybFmay#IronDomeSystem |#know |#about |#System
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 13, 2021
इतर बातम्या
चीनचं खरं रुप पुन्हा उजेडात, औषधांचे करार रद्द, कोविडशी संबंधित वस्तूच्या किमती प्रचंड वाढवल्या
भारताला 7 हजार कोटी रुपये दान करणारा 27 वर्षीय तरुण, एका आठवड्यात पुन्हा कमवले 2100 कोटी डॉलर