हिमाचलमधलं एक असं गाव जेथे दिवाळी साजरी होत नाही, घरात कोंडून घेतात लोक

देशभर दिवाळीचा उत्साह सुरु आहे. लोक दिवाळीचे स्वागत करीत आहेत. गुरुवारी देशातील प्रत्येक भागात रोषणाई केली जाईल. परंतू खूप कमी लोकांना माहिती असेल की भारतात एक असेही गाव आहे जेथील एकही गावकरी दिवाळी साजरी करीत नाहीत.

हिमाचलमधलं एक असं गाव जेथे दिवाळी साजरी होत नाही, घरात कोंडून घेतात लोक
Follow us
| Updated on: Oct 30, 2024 | 6:45 PM

हिमाचल प्रदेशातील हमीरपुर येथील एका गावात कधीच दिवाळीचा सण साजरा केला जात नाही. हमीरपूर जिल्ह्यातील सम्मू या गावात दिवाळी साजरी तर केली जात नाहीच शिवाय या दिवशी कोणतेही पक्वान तयार केले जात नाही.येथील लोकांच्या मान्यतेनुसार या गावाला एक शाप मिळालेला आहे.त्यामुळे या गावात दिवाळीचा उत्साह साजरा केला जात नाही. जर कोणी हा नियम मोडला तर गावावर संकट येते किंवा अकाली मृत्यू होतो असे म्हटले जाते.

दिवाळीच्या दिवशी घरातून बाहेर पडत नाही

यंदाही हमीपूर जिल्हा मुख्यालयाच्या जवळ 25 किमी दूरवर असलेल्या सम्मू गावात दिवाळीची कोणतेही रोषणाई नाही.येथे शेकडो वर्षांपासून दिवाळी साजरी करण्यास मनाई आहे. दिवाळीला दीप तर पेटवले जातात. परंतू कोणी चुकूनही फटाके फोडले किंवा मिठाई किंवा पंचपक्वान बनवले तर गावात नक्कीच संकट येते अशी गावकऱ्यांची मान्यात आहे. लोकांना या गावाला शापमुक्त करण्यासाठी प्रयत्न देखील झाले होते. अनेकदा हे प्रयत्न झाले होते. परंतू सारे प्रयत्न वाया गेले आहेत. लोकांवर या शापाची इतकी भिती आहे की दिवाळीला लोक घराबाहेर पडण्यास देखील योग्य समजत नाहीत.

दिवाळी केली तर संकट येते

शेकडो वर्षांपासून या गावात दिवाळी साजरी केली नाही. कोणी दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न केला तरी गावात कोणाचा ना कोणाचा तरी मृत्यू होतो किंवा संकट येते असे ठाकूर विधीचंद या बुजुर्गाने म्हटले आहे. हा सण सुरु झाला की वाईट वाटते कारण देशात इतर ठिकाणी सर्वत्र दिवाळी साजरी होते. आजूबाजूच्या गावात दिवाळी सण होतो.त आमच्या गावात हे होऊ शकत नाही असे बीणा नावाच्या महिलेने सांगितले. गावाने या शापातून मुक्त होण्यासाठी अनेक होम हवन केले परंतू यश आले नसल्याचे त्यांनी सांगितले.

शापाची कहाणी ?

दिवाळीच्या दिवशी या गावातील एक महिला आपल्या पती सोबत सती गेली होती. महिला दिवाळीसाठी माहेरी जायला निघाली होती. तिचे पती राजाच्या दरबारात सैनिक होता. परंतू महिला गावापासून काही दूर वर असतानाच तिला समजले की तिच्या पतीचा मृत्यू झाला आहे.तेव्हा ती महिला गर्भवती होती. महिलेला हा धक्का सहन झाला नाही तिने पती सोबत सती जाण्याचा निर्णय घेतला. जाताना तिने साऱ्या गावाला शाप दिला की या गावातील लोक कधीच दिवाळीचा सण साजरा करु शकणार नाहीत. त्यानंतर या गावात कोणी दिवाळी साजरी केलेली नाही. लोक केवळ सतीच्या मूर्तीची पूजा करतात.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.