Corona Vaccination: कोरोना लसीचे दोन डोस घेऊनही जिल्हाधिकारी ‘कोरोना पॉझिटिव्ह’

त्यांनी पहिला डोस ८ फेब्रुवारी रोजी घेतला होता. त्यानंतर ८ मार्च रोजी त्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला. | Covid 19 vaccine

Corona Vaccination: कोरोना लसीचे दोन डोस घेऊनही जिल्हाधिकारी 'कोरोना पॉझिटिव्ह'
छत्तीसगडमधील जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी करोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही काही दिवसांनी ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
Follow us
| Updated on: Mar 12, 2021 | 12:33 PM

रायपूर: देशभरात कोरोना लसीकरणाच्या मोहिमेने वेग पकडला असताना आता चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. भारतात सध्या सिरम इन्सिट्यूटची ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लसींच्या वापराला मान्यता दिली आहे. या लसींमुळे (Covid vaccine) देशातील कोरोनाची साथ आटोक्यात येईल, अशी आशा सर्वांनाच आहे. मात्र, छत्तीसगढमध्ये एक काळजी वाढवणारी घटना समोर आली आहे. (Govt officer found positive for Covid 19 days after taking both doses of vaccine)

छत्तीसगडमधील जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी करोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही काही दिवसांनी ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. छत्तीसगडच्या जाजगीर भागाचे जिल्हाधिकारी यशवंत कुमार हे गुरुवारी करोना संक्रमित आढळले आहेत. खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनीच ही माहिती सोशल मीडियाद्वारे दिली. त्यामुळे आता कोरोना लसीकरण मोहिमेवर नव्याने प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

यशवंत कुमार यांनी काही दिवसांपूर्वी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला होता. त्यांनी पहिला डोस ८ फेब्रुवारी रोजी घेतला होता. त्यानंतर ८ मार्च रोजी त्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला. मात्र, त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत यशवंत कुमार यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले.

मुंबईत कोविडची लस घेतल्यानंतर दीड तासात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

कोविड लसीकरणानंतर मुंबईत एक दुर्देवी घटना घडली आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतर अवघ्या दीड तासात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर महापालिकेने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांची समिती नेमली असून या प्रकरणाचा तपास करण्यात येणार आहे.

8 मार्च रोजी मुंबईतील एका खाजगी रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रात ‘कोविड-१९’ लसीकरण सुरू होते. यावेळी एका 68 वर्षीय नागरिकाने दुपारी तीन वाजता कोविशिल्डची लस टोचून घेतली. मात्र, लसीची मात्रा दिल्यानंतर ते बेशुध्द झाले. यामुळे त्यांना तातडीने आपत्कालीन परिस्थितीतील आवश्यक असलेले औषधोपचार करून त्वरीत त्याच रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात पुढील औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु. दुर्दैवाने सायंकाळी. 5 वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. सदर बाब पोलिस यंत्रणेला कळविण्यात आली व त्यानंतर या ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह शवविच्छेदनाकरीता जे.जे. रुग्णालयात पाठविण्यात आला.

संबंधित बातम्या:

कोरोना लस घेतल्यानंतर त्रास होतो ? वाचा पाच संभाव्य साईड ईफेक्ट्स

Vaccine precautions: सावधान! कोरोना लस घेण्यापूर्वी किंवा नंतर दारू प्यायल्यास होणार ‘हे’ परिणाम

Corona Vaccine : कोरोना लसीच्या साईड इफेक्ट्सची भीती वाटतेय? जाणून घ्या लस निर्मिती कंपन्यांच्या महत्वाच्या सूचना

(Govt officer found positive for Covid 19 days after taking both doses of vaccine)

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.