Election Commission : आरटीआय अर्जाला उत्तर देताना काहीही लपवू नका; केंद्रीय माहिती आयोगाचे निवडणूक आयोगाला आदेश

निवडणूक आयोगाने आरटीआयच्या तरतुदीनुसार माहिती पुरवताना पारदर्शक कारभार ठेवला पाहिजे. कुठलीही लपवाछपवी चालणार नाही. निवडणूक आयोगाने सार्वजनिक करता येणारी कुठलीही माहिती लपवता कामा नये, असे स्पष्ट माहिती आयोगाने निवडणूक आयोगाला दिले आहे.

Election Commission : आरटीआय अर्जाला उत्तर देताना काहीही लपवू नका; केंद्रीय माहिती आयोगाचे निवडणूक आयोगाला आदेश
केंद्रीय माहिती आयोगाचे निवडणूक आयोगाला आदेशImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 2:30 AM

नवी दिल्ली : माहिती अधिकारातून निवडणूक रोख्यां (b)च्या तपशील उपलब्ध करून देण्यावरून केंद्रीय माहिती आयोग (Central Information Commission) आणि निवडणूक आयोग (Election Commission) आमनेसामने उभे राहिले आहेत. यासंदर्भात केंद्रीय माहिती आयोगाने निवडणूक आयोगाला कडक शब्दांत खडे बोल सुनावत कुठलीही लपवाछपवी खपवून घेणार नाही, असा सज्जड दमच दिला आहे. निवडणूक रोख्यांसदर्भात लपवाछपवी करू नका. माहिती अधिकाराअंतर्गत कुणी नागरिक निवडणूक रोख्यांबाबत तपशील मागवत असेल तर त्याच्या अर्जाला उत्तर देताना निवडणूक रोख्यांबाबत कुठलीही गोष्ट लपवू नका, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय माहिती आयोगाने एका प्रकरणात निवडणूक आयोगाला दिले आहेत.

नौदलातून निवृत्त झालेल्या माजी उच्चपदस्थ अधिकाऱ्याने मागितली होती माहिती

निवडणूक आयोगाविरुद्ध नौदलातून सेवानिवृत्त झालेले माजी उच्चपदस्थ अधिकारी लोकेश बत्रा यांनी केंद्रीय माहिती आयोगाकडे अपील दाखल केले आहे. त्यांनी निवडणूक आयोगाकडे माहिती कायद्यांतर्गत अर्ज केला होता. 2017 मधील वित्त कायद्यातील दुरुस्ती तसेच त्यानंतर अंमलात आणलेल्या निवडणूक रोख्यांची अंमलबजावणी यासंबंधित संपूर्ण तपशील लोकेश बत्रा यांनी मागितला होता. त्यांच्या अर्जावर निवडणूक आयोगाने अपुरी माहिती उपलब्ध करून दिली. तसा दावा बत्रा यांनी माहिती आयोगाकडे अपिलामधून केला आहे.

अपिलाची माहिती आयुक्तांकडून गंभीर दखल

निवृत्त नौदल अधिकारी लोकेश बत्रा यांच्या अपिलाची केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्य माहिती आयुक्त वाय. के. सिन्हा यांनी गंभीर दखल घेतली आहे. माहिती आयुक्तांनी याबाबत निवडणूक आयोगाला कठोर शब्दांत जाब विचारला आहे. तुम्ही निवडणूक रोखे आणि सुधारित वित्त कायद्यांसंबंधी सर्व माहिती उघड केली का? यात कुठलीही लपवाछपवी केली नाही हे स्टॅम्प पेपरवर लिहून द्या, असे स्पष्ट निर्देश मुख्य माहिती आयुक्त सिन्हा यांनी निवडणूक आयोगाला दिले आहे.

हे सुद्धा वाचा

प्रतिज्ञापत्र दाखल न केल्यास कारवाई होणार

निवडणूक आयोगाने आरटीआयच्या तरतुदीनुसार माहिती पुरवताना पारदर्शक कारभार ठेवला पाहिजे. कुठलीही लपवाछपवी चालणार नाही. निवडणूक आयोगाने सार्वजनिक करता येणारी कुठलीही माहिती लपवता कामा नये, असे स्पष्ट माहिती आयोगाने निवडणूक आयोगाला दिले आहे. तसेच लोकेश बत्रा यांच्या अपिलावर पुढील तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले आहे. या मुदतीत प्रतिज्ञापत्र सादर न केल्यास कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, अशी सक्त ताकीदही माहिती आयोगाने निवडणूक आयोगाला दिली आहे. (Do not hide anything while answering the RTI application, Order of the Central Information Commission to the Election Commission)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.