Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाचा नवा व्हेरीएन्ट हलक्यात घेऊ नका, नाही तर आवाज गमावण्याची वेळ येऊ शकते

नव्या संशोधनानुसार JN.1 चा संसर्ग झालेल्या व्यक्तीला चव आणि वास कळत नाही. त्याचप्रमाणे घशाचा आवाज कायमचा गमावला जात आहे अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कोरोनाचा नवा व्हेरीएन्ट हलक्यात घेऊ नका, नाही तर आवाज गमावण्याची वेळ येऊ शकते
corona JN.1 variant
Follow us
| Updated on: Dec 23, 2023 | 11:07 PM

नवी दिल्ली | 23 डिसेंबर 2023 : कोरोना संसर्गामुळे अनेक गंभीर आरोग्य समस्या आतापर्यंत समोर आल्या आहेत. कोविडमुळे उद्भवणाऱ्या समस्यांमुळे शास्त्रज्ञांची चिंता वाढली होती. जागतिक स्तरावर पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढला आहे. ओमिक्रॉनच्या नव्या सब-व्हेरियंट JN.1 प्रकारामुळे चीन, सिंगापूर, भारतासह अनेक देशांमध्ये संसर्गाची प्रकरणे वाढली आहेत. कोरोनाचा हा नवा सब-व्हेरियंट JN.1 हा अधिक घातक नाही असे डॉक्टर सांगत आहेत. मात्र, नव्या संशोधनानुसार JN.1 चा संसर्ग झालेल्या व्यक्तीला चव आणि वास कळत नाही. त्याचप्रमाणे घशाचा आवाज कायमचा गमावला जात आहे अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कोरोनाच्या नव्या सब-व्हेरियंट JN.1 मुळे अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे लोकांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला शास्त्रज्ञांनी दिला आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स नेत्र आणि कान रुग्णालयातील संशोधकांनी कोरोना संसर्गामुळे मज्जासंस्थेशी संबंधित किंवा न्यूरोपॅथिक गुंतागुंत होऊ शकते असा निष्कर्ष काढला आहे.

अभ्यासाचे निष्कर्ष काय आहेत?

आरोग्य तज्ञ अभ्यासाच्या निष्कर्षात म्हणतात, ज्या रुग्णांना आधीच अस्थमा किंवा न्यूरोलॉजिकल समस्या आहेत त्यांना याचा जास्त धोका असू शकतो. यासाठी कोरोना संसर्गावर उपचार करताना न्यूरोलॉजी, मानसोपचार इत्यादींकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. यापूर्वी कोरोनामुळे अनेक प्रकारच्या गुंतागुंत झाल्या आहेत. त्यामुळे हा आजार केवळ श्वसनाच्या संसर्गापुरता मर्यादित नाही असे म्हणता येईल.

काही प्रकरणांच्या एन्डोस्कोप तपासणीमध्ये किशोरवयीन मुलाच्या व्हॉइस बॉक्स किंवा स्वरयंत्रात सापडलेल्या दोन्ही व्होकल कॉर्डमध्ये (घशामध्ये असलेला स्वरयंत्राचा पडदा ज्यांच्या कंपनांमुळे बोलू शकतो.) समस्या असल्याचे आढळून आले. एका 15 वर्षांच्या मुलीला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. रुग्णालयात तपासणी दरम्यान कोविडच्या मज्जासंस्थेवर होणाऱ्या दुष्परिणामांमुळे त्या मुलीला व्होकल कॉर्ड पॅरालिसिस झाल्याचे आढळून आले. त्या मुलीला आधीच अस्थमाची समस्या होती.

कोविड-19 सुरू झाल्यापासून किशोरवयीन मुलांमध्ये व्होकल कॉर्ड पॅरालिसिसची ही पहिलीच घटना आहे. ज्येष्ठ व्यक्तींमध्ये ही स्थिती यापूर्वी नोंदवली गेली होती. मात्र, किशोरवयीन मुलामध्ये व्होकल कॉर्ड पॅरालिसिसची पहिली घटना आढळून आली आहे. त्यामुळे शास्त्रज्ञांनी अधिक काळजी घेण्याचा सल्ला दिलाय. हार्वर्ड मेडिकल स्कूलचे प्राध्यापक क्रिस्टोफर हार्टनिक यांनी ‘व्हायरसचा हा संसर्ग डोकेदुखी, फेफरे आणि न्यूरोपॅथीसह गुंतागुंतांशी संबंधित आहे. व्होकल कॉर्ड पॅरालिसिस हा कोरोना व्हायरसचा पुढचा टप्पा असू शकतो असे सांगितले.

'तनिषाची मृत्यूनंतर बदनामी', भिसे कुटुंबीयांचं चाकणकरांना पत्र अन्...
'तनिषाची मृत्यूनंतर बदनामी', भिसे कुटुंबीयांचं चाकणकरांना पत्र अन्....
पंतप्रधान 2025 चा काळ पूर्ण करतील का यावर मला शंका, राऊतांची टीका
पंतप्रधान 2025 चा काळ पूर्ण करतील का यावर मला शंका, राऊतांची टीका.
'त्यांचा घराचा पत्ता काढणार आणि घरी येऊन...', सोमय्यांना FB वरून धमकी
'त्यांचा घराचा पत्ता काढणार आणि घरी येऊन...', सोमय्यांना FB वरून धमकी.
'आलमगीर औरंगजेब..', दादरमध्ये मनसेची बॅनरबाजी
'आलमगीर औरंगजेब..', दादरमध्ये मनसेची बॅनरबाजी.
वारंवार शरीरसुखाची मागणी केली; संतप्त तरुणीने त्याचं काम तमाम केलं
वारंवार शरीरसुखाची मागणी केली; संतप्त तरुणीने त्याचं काम तमाम केलं.
धक्कादायक! .. म्हणून कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये कुत्रा बनवून फिरवलं
धक्कादायक! .. म्हणून कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये कुत्रा बनवून फिरवलं.
ब्लॅक मंडे! शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांना घाम फुटला
ब्लॅक मंडे! शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांना घाम फुटला.
अस्थापनांमध्ये मराठीच्या मुद्द्यावर मनसेचा यू टर्न का?
अस्थापनांमध्ये मराठीच्या मुद्द्यावर मनसेचा यू टर्न का?.
'ऑर्गनायजर'मधल्या 'त्या' लेखाने राजकीय वादंग
'ऑर्गनायजर'मधल्या 'त्या' लेखाने राजकीय वादंग.
छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांना अजित पवारांनी खडेबोल सुनावले
छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांना अजित पवारांनी खडेबोल सुनावले.