आलिशान वंदेभारत ट्रेनमध्येही प्रवासी टाकतात कचरा ? WE THE PEOPLE असे म्हणत, आयएएस अधिकाऱ्याचे ट्वीट

भारतीय रेल्वे प्रवासाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या वंदेभारत एक्सप्रेसला एकीकडे प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे काही अपवादात्मक विचित्र घटनाही घडत आहेत

आलिशान वंदेभारत ट्रेनमध्येही प्रवासी टाकतात कचरा ? WE THE PEOPLE  असे म्हणत, आयएएस अधिकाऱ्याचे ट्वीट
vandebharat (2)Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jan 28, 2023 | 12:31 PM

दिल्ली : भारतीय प्रवाशांना कचरा करण्याची इतकी सवय झाली आहे, की नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या आलिशान वंदेभारत एक्सप्रेसमध्ये ( VandeBharat )  प्रवासी आपला कचरा टाकण्याचा उपक्रम कायम ठेवत असल्याचे ओंगळवाणे दृश्य समाजमाध्यमावर टाकलेल्या एका पोस्टद्वारे उघडकीस आले आहे. एका आयएएस ( IAS ) अधिकाऱ्याने ट्वीटर या संदर्भात वंदेभारतचा एक फोटो ट्वीट करीत भारतीयांच्या या प्रवृत्तीवर सडकून टीका केली आहे. या पोस्टला अनेक प्रतिक्रीया देखील येत आहेत.

भारतीय रेल्वे प्रवासाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या वंदेभारत एक्सप्रेसला एकीकडे प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे काही अपवादात्मक घटना घडत आहेत. वंदेभारत एक्सप्रेसच्या एका कोचचा फोटो आयएएस अधिकाऱ्याने मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्वीटरवर पोस्ट केला आहे. अविनाश शरण या आयएएस अधिकाऱ्याने ही पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये वंदेभारत एक्सप्रेसचा कर्मचारी झाडू मारताना दिसत आहे. या ट्रेनची सफाई करताना प्रवाशांनी टाकलेल्या कचऱ्याचा अक्षरश: ढीग दिसत आहे. ज्यात उरलेले अन्नाचे बॉक्स, मिनरल वॉटरच्या रिकाम्या बाटल्या यांचा खच पडलेला दिसत आहे.

हा फोटो ट्वीट करताना या आयएएस अधिकाऱ्याने कॅप्शन देताना, ‘आम्ही भारताचे लोक’, असे भारतीय घटनेचे पहिले वाक्य लिहीले आहे. या फोटोवर इंटरनेट युजरच्या अनेक मजेशीर प्रतिक्रीया येत आहेत.

एका युजरने एकीकडे केंद्र सरकार राज्य सरकारना सिंगल युज प्लास्टीकवर बंदी घालण्याचे धोरण राबवा अस सांगत असताना राज्य सरकारे दुर्लक्ष करीत आहेत. सो कॉल्ड हायक्लास पिपल नेहमीच सार्वजनिक ठीकाणी स्वच्छता राखण्याला हरताळ फासतात अशी टीका करीत ज्यादा आझादी मिळाल्याने असे होत असल्याचे म्हटले आहे. तर एका युजरने या आयएएस अधिकाऱ्यांना कळले नसावे की हा कचरा प्रवाशांनी टाकला नसून पॅण्ट्रीकारचा कचरा आहे अशी प्रतिक्रीया दिली आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.