ऐकलंत का? फक्त ‘विदेशवारी’च नव्हे तर ‘या’ ठिकाणांहूनही होऊ शकते कोरोनाची लागण…

सुरुवातीला केवळ विदेशातून आलेल्या नागरिकांचीच कोरोना चाचणी (Corona Test) करण्यासाठी प्राधान्य दिले जात होते. परंतु आपल्या जवळपासच्या अशाही का जागा आहेत जेथून आपल्याला कोरोनाची लागण फार वेगाने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशीच काही ठिकाण एका अभ्यासातून समोर आली आहे.

ऐकलंत का? फक्त 'विदेशवारी'च नव्हे तर 'या' ठिकाणांहूनही होऊ शकते कोरोनाची लागण...
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 12, 2022 | 12:46 PM

कोरोनाचा ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंट जगभरात वेगाने पसरताना दिसत आहे. मोठ्या शहरांपासून ते अगदी गावखेडेदेखील त्याला अपवाद ठरलेली नाही. सर्वच वयोगटातील लोकांना कोरोना(Corona)ची लागण होण्याची अनेक उदाहरणे आहेत. जगभरात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. नवनव्या व्हेरिएंटने कोरोना आपले डोके वर काढताना दिसत आहे. विकसित देशांसह मागास देशांमध्येही कोरोना मोठ्या वेगाने पसरत आहे. सुरुवातीला कोरोनाला आळा घालण्यासाठी विदेशातून भारतात आलेल्या नागरिकांची कोरोना चाचणीला प्राधान्य देण्यात आले होते. त्यानंतर ज्या पद्धतीने देशात कोरोनाचे रुग्ण विक्रमी संख्येने समोर आलेख तस-तसे चाचण्यांचे नियमही बदलत गेले. आता केवळ विदेशातूनच नव्हे तर आपल्या आजूबाजूला अशीही काही ठिकाणे आहेत, ज्यातून आपल्याला अलगदपणे कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे.

संशोधनात ‘हे’ सत्य आले समोर ‘व्हायरस वॉच स्टडी’ (Virus Watch Study)ने 7 जानेवारी 2022 रोजी कोरोनाच्या लागण होण्याच्या विविध कारणांबाबत एक संशोधन समोर आणले आहे. त्यात केवळ विदेशवारीच नव्हे तर तुम्ही दिवसभराच्या कामांसाठी ज्या-ज्या ठिकाणी जात असाल त्याठिकाणांहून देखील तुम्ही कोरोनाला आपल्या घरी आणू शकतात. असा तो अभ्यास सांगतो. बाजाराच्या ठिकाणी जाणे, रेल्वे, एसटीसारख्या सार्वजनिक वाहनांचा दळणवळणासाठी वापर करणे आदीदेखील कोरोनाला आपल्यापर्यंत पोहोचवू शकते. गेल्या वर्षीप्रमाणे हे नवीन वर्षही कोरोनाची तिसरी लाट घेउन आले. देशासह जगभरात ओमिक्रॉन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट मोठ्या वेगाने पसरत आहे. सोमवारी (ता. 10) भारतात 1, 79, 723 नवीन कोविड-19 प्रकरणे नोंदली गेली आणि देशातील ओमिक्रॉनने बाधितांची संख्या 4003 आहे.

‘हे’ अवश्‍य करा *अनावश्‍यक कार्यक्रमांना जाणे टाळा *एकाच वेळी बाहेरील सर्व कामे करा, वारंवार बाहेर जाऊ नका *चित्रपटगृह, ब्यूटी पार्लर, सार्वजनिक वाहने आदी ठिकाणी, मास्क वापरा निर्जंतुकीकरणाचा वापर करा *इतरांच्या वस्तू वापरणे टाळा किंवा त्यांना स्वच्छ करून वापरा *बाजारात खरेदी करताना शारीरिक अंतर राखा

पसरतो अधिक वेगाने कोरोनाच्या डेल्टा (Delta) या व्हेरिएंटने संपूर्ण जगाला चिंतित केले आहे. ओमिक्रॉनपेक्षा कमी वेगाने पण त्याच्यापेक्षा जास्त घातक असलेल्या डेल्टामुळे रुग्णांना प्राणवायूची सर्वाधिक गरज भासली होती. त्याचप्रमाणे रुग्णांचे रुग्णालयात भरती होण्याची संख्यादेखील जास्त होती. जगभरातील अभ्यासकांच्या दाव्यानुसार कोरोनाचा ओमिक्रॉन हा नवा व्हेरिएंट डेल्टापेक्षा कमी घातक असला तरी तो त्याच्यापेक्षा दुप्पट वेगाने पसरत आहे. त्यामुळे जगभरातील कोरोना रुग्णांची संख्यादेखील जास्त आहे. त्यामुळे आपल्याला कोरोनाची लागण होऊ नये, म्हणून आपण रोजच्या दिनचर्येत अधिक काळजी घेणे आवश्‍यक ठरते.

Corona Cases in India: देशात आजही कोरोना रुग्णसंख्येत उसळी, महाराष्ट्रातील रुग्णांचा सर्वाधिक 17.68% वाटा!

अमेरिकेत कोरोनाचा उद्रेक, एका दिवसात 14 लाखांहून अधिक रुग्ण, फ्रान्स- स्वीडनमध्येही हाहाःकार

Palghar News | पालघरमध्ये जाळ्यात अडकले दुर्मिळ मासे, मच्छीमारांनी केली सुटका

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.