राम मंदिरासाठी दररोज किती दान येतं माहित आहे का? ऑनलाइन देणग्या तर मोजल्याच नाहीत…

सध्या तात्पुरत्या मंदिरात रामललाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची झुंबड उडाली आहे. श्री रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येत येणाऱ्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. भाविक देवाची पूजा करून खुलेआम दानही करत आहेत

राम मंदिरासाठी दररोज किती दान येतं माहित आहे का? ऑनलाइन देणग्या तर मोजल्याच नाहीत...
ayodhya Ram Mandir Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jan 17, 2024 | 10:23 PM

अयोध्या | 17 जानेवारी 2024 : 22 जानेवारी 2024 रोजी प्रभू श्रीरामाचा अभिषेक होईल. त्यानंतर देशभरातील लाखो भाविक अयोध्येला प्रभू श्री राम यांच्या दर्शनाला अयोध्येत पोहोचतील. भगवान श्रीरामाची पूजा करतील आणि त्यांच्या इच्छेनुसार श्री राम मंदिराला दानही देतील. अजून राम मंदिर भक्तांना दर्श्नाकाठी खुले करण्यात आलेले नाही. सध्या तात्पुरत्या मंदिरातही रामललाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची झुंबड उडाली आहे. येथे होणाऱ्या पूजेसाठीही भाविकांची रांग लागली आहे. मात्र, येथे येणारे भाविक मोठ्या प्रमाणात दान करत आहेत.

भगवान श्री रामलला त्यांच्या तात्पुरत्या मंदिरात असताना भक्तिभावाने दान करणार्‍यांची ही स्थिती आहे. मग, श्री राम त्यांच्या भव्य मंदिरात विराजमान झाल्यावर रोज किती दान येईल याचा अंदाज येत नाही. मात्र, मंदिर उभारणीनंतर भाविकांकडून येणाऱ्या देणग्या आणि प्रसादाच्या संख्येत चौपट वाढ होणार हे निश्चित आहे.

श्री रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येत येणाऱ्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. भाविक देवाची पूजा करून खुलेआम दानही करत आहेत. सध्या प्रभू रामललाच्या दानपेटीत दररोज तीन ते चार लाखांच्या देणग्या येत आहेत. जर संपूर्ण महिन्याचा विचार केला तर ही रक्कम सुमारे 1.5 ते 2 कोटी रुपये इतकी होत आहे. ही केवळ दान पेटीत जमा होणारी रोख रक्कम आहे. त्याशिवाय ऑनलाइन आलेल्या देणगीची मोजणी अद्याप झालेली नाही.

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट कार्यालयाचे प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार येथील दानपेटीत दररोज पैसे जमा केले जात आहेत. दान पेटी भरल्यावर ती रक्कम मोजली जाते. किती येतंय असं तरी म्हणायचं कसं? पण, काउंटरवर जे येतं आहे ते दिवसाला किमान तीन ते चार लाखांच्या दरम्यान आहे असे त्यांनी सांगितले.

श्री राम मंदिरात दररोज दानपेटीत पैसे जमा केले जातात. दिवसाला तीन ते चार लाखांच्या दरम्यान रक्कम जमा होत आहे. महिन्याची रक्कम मोजली तर ती सुमारे दीड ते दोन कोटी इतकी जमा होत आहे. देणगीदारांची कमतरता नाही. लोक त्यांच्या क्षमतेनुसार देणगी देत ​​आहेत. देवासाठी काय करायचे असा प्रश्न अनेकांना पडतो. पण, देवासाठी लोक काय काय करू शकतात त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही असेही ते म्हणाले.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.