तिला मला मारायचं आहे… Daddy I am Sorry… अखेरचा मेसेज वाचला अन् काळजात धस्स झालं; काय घडलं?; कुठे घडलं?

हुबळीतील एका व्यक्तीने पत्नीच्या छळाला कंटाळून जीवन संपवलं आहे. त्याने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पत्नीच्या अत्याचाराचा उल्लेख केला आहे. ही घटना अतुल सुभाष प्रकरणासारखीच आहे, ज्यात एका आयटी इंजिनिअरने पत्नीच्या छळामुळे जीवन संपवलं होतं. दोन्ही घटनांमुळे दाम्पत्य जीवनातील हिंसाचाराचे प्रश्न पुन्हा एकदा समोर आले आहेत.

तिला मला मारायचं आहे... Daddy I am Sorry... अखेरचा मेसेज वाचला अन् काळजात धस्स झालं; काय घडलं?; कुठे घडलं?
man depression
Follow us
| Updated on: Jan 28, 2025 | 12:15 PM

कर्नाटकातील हुबळी येथील अतुल सुभाषने स्वत:ला संपवून टाकलं होतं. तसंच काहीसं प्रकरण समोर आलं आहे. बायकोच्या जाचाला कंटाळून एका व्यक्तीने आयुष्य संपवलं आहे. त्याने जीवन संपवण्यापूर्वी त्याच्या वडिलाच्या नावाने एक चिठ्ठी लिहिली होती. त्यात त्याने, तिला मला मारायचं आहे. बाबा, मला माफ करा, असं म्हटलंय. त्याचीही चिठ्ठी वडिलांच्या हातात पडली. समोर मुलाचा मृतदेह आणि चिठ्ठीतील काळीज चिरणारे शब्द, यामुळे त्याच्या वडिलाच्या काळजात धस्स झालं. काय करावं आणि काय करू नये असं त्यांना झालं. डोळ्यातून फक्त आसवे गळत होती आणि हात थरथरत होते. हे दृश्य पाहून शेजारी पाजारीही मनातून हादरून गेले होते.

हुबळीच्या चांमुडेश्वरी नगरमधील ही घटना आहे. पीटर नावाच्या एका व्यक्तीने आयुष्य संपवलं. त्यापूर्वी त्याने एक सुसाइड नोट लिहून ठेवली होती. त्यात त्याने काळजाला हात घालेल अशी व्यथा मांडली होती. डॅडी, आय एम सॉरी, असं त्याने त्यात म्हटलं होतं. पीटरने त्याच्या मृत्यूला त्याच्या पत्नीला जबाबदार धरलं होतं.

तिला मला मारायचेय

माझी पत्नी पिंकी मला मारतेय, असा त्याचा आरोप आहे. तिला मला मारून टाकायचं आहे. पीटरने राहत्या घरीच जीवन संपवलं. तो एका खासगी कंपनीत काम करत होता. गेल्या काही दिवसांपासून दोघा नवरा बायकोंमध्ये तणाव होता. त्यामुळे तो अस्वस्थ असायचा. त्यांच्या वारंवार भांडणं व्हायचे. त्यामुळे तो अस्वस्थ झाला होता.

मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत तो म्हणतो, माझी बायको मला टॉर्चर करत आहे. त्यामुळे मी हे जग सोडतोय. पत्नी पिंकीच्या छळामुळेच त्याने जीव दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या प्रकरणी अशोक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

अतुल सुभाष सारखीच केस

काही महिन्यापूर्वी बंगळुरूत राहणाऱ्या अतुल सुभाष नावाच्या एआय इंजिनीअरने आयुष्य संपवलं होतं. हुंडाबळी आणि हत्येसह 9 गुन्हे दाखल करून माझा छळ करण्यात आला. त्यामुळेच मी जीवन संपवत असल्याचं अतुल सुभाषने म्हटलं होतं. त्याने त्याची पत्नी निकिता सिंघानिय, सासू निशा आणि पत्नीचा भाऊ अनुराग आणि बायकोचा चुलता सुशील याच्यावर छळवणुकीचा आरोप केला होता. अतुल सुभाषने मृत्यूपूर्वी 24 पानांची चिठ्ठी लिहिली होती. तसेच 81 मिनिटाचा एक व्हिडीओही तयार केला होता. त्यात त्याने त्याच्यावरील अत्याचाराची माहिती दिली होती. तसेच पत्नी आणि तिच्या घरच्यांवर गंभीर आरोप केले होते.

आपल्या नोटमध्ये आणि व्हिडीओत अतुलने संपूर्ण व्यथा मांडलीय. माझ्याच टॅक्सच्या पैशाने हे कोर्ट, पोलीस आणि संपूर्ण सिस्टिम माझ्याच कुटुंबीयांना आणि माझ्यासारख्या लोकांना त्रास देईल. मीच राहिलो नाही तर पैसाही राहणार नाही. माझ्या आईवडिलांना आणि भावाला त्रास देण्याचं कोणतंही कारण राहणार नाही, असं अतुलने म्हटलं होतं.

सुरेश धस यांनी केलेल्या 'त्या' आरोपांची थेट अजित दादांकडून पडताळणी अन्
सुरेश धस यांनी केलेल्या 'त्या' आरोपांची थेट अजित दादांकडून पडताळणी अन्.
मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या दमानिया आता काय म्हणाल्या?
मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या दमानिया आता काय म्हणाल्या?.
'हे ऑपरेशन टायगर नसून..', साळवींच्या शिवसेना प्रवेशावर अंधारेंचा निशणा
'हे ऑपरेशन टायगर नसून..', साळवींच्या शिवसेना प्रवेशावर अंधारेंचा निशणा.
ठरलं तर..राजन साळवी उद्याच शिंदेंच्या शिवसेनेचं 'धनुष्यबाण' घेणार हाती
ठरलं तर..राजन साळवी उद्याच शिंदेंच्या शिवसेनेचं 'धनुष्यबाण' घेणार हाती.
'सुधीर भाऊ तुमचा हा रेस्ट पिरीअड लवकरच...', चव्हाणांचं मिश्किल वक्तव्य
'सुधीर भाऊ तुमचा हा रेस्ट पिरीअड लवकरच...', चव्हाणांचं मिश्किल वक्तव्य.
'छावा'च्यापूर्वी रश्मिका अन् विकी साईंच्या दरबारी, काय घातलं साकडं?
'छावा'च्यापूर्वी रश्मिका अन् विकी साईंच्या दरबारी, काय घातलं साकडं?.
बीड पोलिसांना 3 महिन्यांनतर जाग; अखेर 'त्या' प्रकरणी गुन्हा दाखल
बीड पोलिसांना 3 महिन्यांनतर जाग; अखेर 'त्या' प्रकरणी गुन्हा दाखल.
'...तर राऊतांसारखा कोणी करंटा असूच शकत नाही', NCP च्या नेत्याची टीका
'...तर राऊतांसारखा कोणी करंटा असूच शकत नाही', NCP च्या नेत्याची टीका.
खलनायक, बिनडोक, शकुनी... शिरसाट राऊतांवर घसरले; काय केली जहरी टीका?
खलनायक, बिनडोक, शकुनी... शिरसाट राऊतांवर घसरले; काय केली जहरी टीका?.
बीडच्या गुंडगिरीवर सुरेश धसांनी स्पष्टच सांगितलं, '...हे आमचं टार्गेट'
बीडच्या गुंडगिरीवर सुरेश धसांनी स्पष्टच सांगितलं, '...हे आमचं टार्गेट'.