पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पॉडकास्ट डोनाल्ड ट्रम्प यांना खूपच भावला, सोशल मीडियावर केला शेअर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेक्स फ्रिडमॅन या पॉडकास्टरला दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीचा जगभरात चर्चा सुरु आहे. या मुलाखतीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील पसंद केले आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडियावर ही मुलाखत प्रसिद्ध केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रदीर्घ मुलाखत ( पॉडकास्ट ) अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमॅन यांनी घेतली होती. जगभरात रविवार पाच वाजता ही मुलाखत रिलीज झाली. या मुलाखतीची चर्चा जगभरात झाली. आपल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संपूर्ण प्रवास सांगितला. या मुलाखतीची तारीफ आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांच्या दिलदारी प्रवृत्तीची खूपच प्रशंसा केली आहे. मोदी यांचा हा पॉडकास्ट ट्रम्प यांनी आपल्या ट्रुथ सोशल हँडलवर शेअर केला आहे. पीएम मोदी तीन तासांच्या या पॉडकास्टमध्ये आपल्या बालपणापासून ते ग्लोबल पॉलिटीक्सवर अगदी मोकळेपणाने व्यक्त झाले आहेत. स्वत: अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमॅन यांनी पीएम मोदी यांचा आला आतापर्यंतचा सर्वात चांगला इंटरव्युव्ह म्हटले आहे.
ह्युस्टनमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत ‘हाऊडी मोदी’ हा कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात ट्रम्प व्यासपीठाच्या खाली चेअरवर बसून माझे भाषण ऐकत होते. ट्रम्प यांच्यासोबत आपण संपूर्ण स्टेडियमचा राऊंड माराला. सुरक्षा कर्मचाऱ्यांना न विचारता ट्रम्प माझ्या सोबत चालले. अमेरिकन सुरक्षा प्रोटोकॉल पाहाता हे शक्य नव्हते. ट्रम्प ‘अमेरिका फर्स्ट’ वाले आहेत. मी ‘भारत फर्स्ट’ वाला आहे.राष्ट्राध्यक्षांसोबत माझी जोडी नेहमीच जमते असे या पॉडकास्टमध्ये मोदी यांनी म्हटले होते.
बराक ओबामा यांच्याबद्दल काय म्हणाले मोदी
या पॉडकास्टमध्ये नरेंद्र मोदी यांनी माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यावतीने दिलेल्या शाही डिनरचा देखील उल्लेख केला. जेव्हा ओबामा यांनी व्हाईटहाऊसमध्ये मोदी यांना जेवणाचे आवतण दिले तेव्हा मोदी यांचा उपवास चालू होता. आपण डीनर घेणार नाही असे ओबामा यांना कळताच ते चिंतेत सापडले. मग गरम पाणी आले तेव्हा आपण आ गया मेरा डिनर असे मोदी यांनी ओबामा यांना सांगितले. जेव्हा आपण पुन्हा अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलो तेव्हा तेव्हा माझा उपवास नव्हता. ओबामा मला म्हणाले की आता तुम्हाला ‘डबल जेवण’ खावे लागेल असा किस्सा सांगत मोदी यांनी ओबामांशी असलेले नातेही सांगितले.




युक्रेन युद्धावर मोदी यांची काय प्रतिक्रीया होती ?
जगात युद्धसुरु आहेत. या विषयावर एक भारतासारख्या कायम शांततेचा पुरस्कार करणाऱ्या देशाचे प्रमुख म्हणून तुम्ही युक्रेन युद्धावर काय सल्ला द्याल असे लेक्स फ्रिडमॅन यांनी मोदी यांना विचारले. यावर मोदी यांनी जेव्हा आम्ही शांततेचा मार्ग सांगतो तेव्हा जग आमचे ऐकते. कारण हा देश गौतम बुद्ध आणि महात्मा गांधींचा आहे. आम्ही संघर्षाच्या बाजूने कधीच नसतो. आम्ही समन्वयाच्या बाजूनेच असतो. आम्ही निर्सगाशीही संघर्ष करु इच्छीत नाही आणि राष्ट्राशीं देखील नाही. रशिया आणि युक्रेनशी आमचे घनिष्ट संबंध आहेत. युद्धभूमीतून या हा प्रश्न सुटणार नाही. युद्धाचा तोडगा हा टेबलवर एकत्र बोलण्याने होणार आहे. मी तटस्थ नाही, माझीही एक बाजू आहे. मी शांततेच्या बाजूचा आहे असेही मोदी यावेळी म्हणाले.