Election Fund: राजकीय पक्षांनाही कोरोनाचा फटका, देणग्यांमध्ये 41 टक्क्यांनी घट

कोरोनाचे संकट (Corona)आणि त्यापाठोपाठ लागलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे (Lockdown) सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले. कोरोनाची भीती अद्यापही कायम असली तरी त्याची तीव्रता आता थोडी कमी होत असून जनसामान्यांचे जीवन आता पूर्वपदावर येऊ लागले आहे. मात्र कोरोनोचा फटका जसा जनतेला बसला तसाच त्याचा परिणाम देशातील राजकीय पक्षांवरही झाला. कोरोना व लॉकडाऊनमुळे राजकीय पक्षांना (Political Parties) मिळणाऱ्या देणग्यांमध्ये चांगलीच […]

Election Fund: राजकीय पक्षांनाही कोरोनाचा फटका, देणग्यांमध्ये 41 टक्क्यांनी घट
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 10:26 AM

कोरोनाचे संकट (Corona)आणि त्यापाठोपाठ लागलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे (Lockdown) सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले. कोरोनाची भीती अद्यापही कायम असली तरी त्याची तीव्रता आता थोडी कमी होत असून जनसामान्यांचे जीवन आता पूर्वपदावर येऊ लागले आहे. मात्र कोरोनोचा फटका जसा जनतेला बसला तसाच त्याचा परिणाम देशातील राजकीय पक्षांवरही झाला. कोरोना व लॉकडाऊनमुळे राजकीय पक्षांना (Political Parties) मिळणाऱ्या देणग्यांमध्ये चांगलीच घट झाली आहे. 2020-2021 या आर्थिक वर्षात राष्ट्रीय राजकीय पक्षांना मिळालेल्या देणगीत तब्बल 420 कोटी रुपयांची घट झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत देणग्यांमध्ये 41.49 टक्के घट झाली आहे. भारतीय जनता पक्ष, कॉंग्रेस, बहुजन समाज पक्ष (बसप), सीपीआय, सीपीआय-एम, तृणमूल कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ( एनसीपी) आणि नॅशनल पीपल्स पार्टी हे देशातील आठ मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष आहेत.

राजकीय पक्षांना गेल्या आर्थिक वर्षांत किती देणग्या मिळाल्या याचे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (ADR) विश्लेषण केले होते. त्यातूनच ही माहिती समोर आली आहे. कोविड-19 चे संकट आणि त्यामुळे लागलेला कडक लॉकडाऊन यामुळे संपूर्ण जगावर परिणाम दिसून आला. नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होण्यापूर्वी, मार्च 2020 च्या शेवटी कोरोनाची पहिली लाट आली, ज्यामुळे देशभरात लॉकडाऊन झाले. त्याचाच परिणाम राजकीय पक्षांच्या आर्थिक देणग्यांवरही झाला. भारतीय जनता पक्षाला ( भाजप) 2019-2020 मध्ये 785.77 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या. मात्र 2020-2021 मध्ये हाच आकडा 477.54 कोटी रुपयांवर आला. त्यामध्ये 39.23 टक्क्यांची घट दिसून आली. 2018-2019 च्या तुलनेत 2019-2

2020 मध्ये भाजपाला मिळालेल्या देणग्यांमध्ये 5.88 टक्के वाढ झाली, असे एडीआरने नमूद केले आहे. तर देशातील दुसरा प्रमुख राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला मिळालेल्या देणग्यांमध्ये आधीच्या वर्षाच्या तुलनेत 46.39 टक्के घट झाली. 2019-2020 साली काँग्रेसला 139.16 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या मात्र 2020-2021 या आर्थिक वर्षात हा आकडा 74.542 कोटी रुपयांवर पोहोचला. 2018-2019 आणि 2019-2020 या आर्थिक वर्षात त्यांच्या देणग्यांमध्ये 6.44 टक्के घट झाली आहे.

हे सुद्धा वाचा

दिल्लीतून मिळाल्या सर्वाधिक देणग्या

राजधानी दिल्लीतून राजकीय पक्षांना सर्वात जास्त म्हणजेच 246 कोटी रुपयांच्या देणग्या देण्यात आल्या. तर महाराष्ट्रातून 71.68 कोटी रुपये आणि गुजरातमधून 47 कोटी रुपयांच्या देणग्या देण्यात आल्याचेही, समोर आले आहे.

या देणग्यांपैकी 80 टक्के देणग्या कॉर्पोरेट आणि बिझनेस सेक्टरतर्फे देण्यात आल्या. त्यांनी राष्ट्रीय पक्षांना 480.655 कोटी रुपयांच्या एकूण 1398 देणग्या दिल्या. तर 2258 वैयक्तिक देणगीदारांनी 18 टक्के म्हणजेच 111.65 कोटी रुपयांच्या देणग्या दिल्या.

भारतीय जनता पक्षाला कॉर्पोरेट आणि बिझनेस सेक्टरतर्फे 1100हून अधिक ( 416.794 कोटी रुपये) देणग्या मिळाल्या, तर 1071 वैयक्तिक देणगीदारांनीही त्यांना देणगी तर दिली. काँग्रेसला कॉर्पोरेट सेक्टरमधून 146 देणग्या (35.89 कोटी रुपये) तर 931 वैयक्तिक देणग्या (38.634 कोटी रुपये) मिळाल्या.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.