नवी दिल्ली : देशातील नागरिक घरोघरी तिरंगा फडकवत “आझादी का अमृत महोत्सव” साजरा करत आहेत. हर घर तिरंगा या मोहिमेत(Har Ghar Tiranag Certificate ) सहभागी होणाऱ्यांसाठी सरकारने प्रत्येक घरासाठी तिरंगा प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी ऑनलाइन पोर्टल तयार केले आहे.घरावर तिरंगा फडकवल्यावर नागरीक या पोर्टलला भेट देऊन अवघ्या दोन मिनीटांत हर घर तिरंगा सर्टिफिकेट डाऊनलोड करु शकतात.
देशवासीय फार पूर्वीपासून ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करत आहेत. या वर्षीचा स्वातंत्र्यदिन खूप खास आहे कारण उद्या भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होणार आहेत. हा सोहळा संस्मरणीय बनवण्यासाठी भारत सरकारने “हर घर तिरंगा” मोहीम सुरू केली आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सअॅप यांसारख्या सोशल साइट्सवर देशवासियांना राष्ट्रध्वज हा त्यांचा प्रोफाईल पिक्चर म्हणून लावावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्याचबरोबर 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा फडकवण्यासाठीही त्यांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. या मोहिमेत सहभागी झालेले त्यांचे “हर घर तिरंगा” प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतात.
“हर घर तिरंगा” मोहिमेअंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकवणाऱ्या देशवासियांना प्रमाणपत्र मिळणार आहे. यासाठी सरकारने वेबसाइट तयार केली आहे. वापरकर्ते “हर घर तिरंगा” वेबसाइटला भेट देऊन त्यांचे प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतात. “हर घर तिरंगा” प्रमाणपत्र डाउनलोड करण्याच्या सोप्या स्टेप्स
जे लोक हर घर तिरंगा अभियानाचा भाग बनले आहेत ते त्यांच्या घरी तिरंगा ध्वज लावून प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतात किंवा प्रिंट आऊट घेऊन ते घरी ठेवू शकतात. स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून साजरा केला जात आहे.