कोणी घेतलं इमाम साहेबाचं मन मोहून..
डॉ. इलियासी यांनी मोहन भागवत यांना राष्ट्रपिता आणि राष्ट्रऋषी अशा शब्दात त्यांचा गौरव केला आहे.
नवी दिल्लीः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (Rashtriya Swayamsevak Sangh) प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत राहत असतात. आजही ते ऑल इंडिया मुस्लिम इमाम संघटनेचे प्रमुख इमाम उमर अहमद इलियासी (Umar Ahmed Ilyasi) यांच्यासह इतर मुस्लिम नेत्यांची भेट घेतल्यामुळे चर्चेत राहिले आहेत. दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावरील मशिदीमध्ये बैठक बोलवण्यात आली होती. ही बैठक सुमारे तासभर चालली. मोहन भागवतांची ही एकाच महिन्यात मुस्लिम विचारवंतांसोबतची ही दुसरी बैठक आहे त्यामुळे या भेटीकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते.
ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे प्रमुख डॉ. इमाम उमर अहमद इलियासी यांनी आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांचे कौतुक केले.
डॉ. इलियासी यांनी मोहन भागवत यांना राष्ट्रपिता आणि राष्ट्रऋषी अशा शब्दात त्यांचा गौरव केला आहे. त्यांनी बोलताना सांगितले की, मोहन भागवतजी आपल्या निमंत्रणावर ते येथे आले आहेत.
यावेळी त्यांचा ‘राष्ट्रपिता’ आणि ‘राष्ट्र-ऋषी’ म्हणूनही त्यांचा गौरव केला आहे. या आजच्या भेटीमुळे भारतात एक चांगला संदेश जाणार असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी आपाल्या देवपूजा वेगळ्या असल्या तरी आपल्यातील सर्वात मोठा धर्म हा मानवता आहे. आणि त्यावर आमचा विश्वासही असल्याचे त्यांनी सांगितले.
आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी सर्वप्रथम ऑल इंडिया मुस्लिम इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख इमाम उमर अहमद इलियासी यांच्यासह इतर मुस्लिम नेत्यांची गुरूवारी सकाळी भेट घेतली.
दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्ग मशिदीत ही बैठक झाली. यापूर्वी मोहन भागवत यांनी मुस्लिम विचारवंतांच्या पाच सदस्यीय गटाचीही भेट घेतली होती.
मोहन भागवत यांनी माजी खासदार शाहिद सिद्दीकी, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी, माजी लेफ्टनंट गव्हर्नर नजीब जंग, अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे माजी कुलगुरू जमिरुद्दीन शाह आणि उद्योगपती सईद शेरवानी यांची भेट घेतली.
मोहन भागवत यांची भेट घेण्याचा पुढाकार मुस्लिम विचारवंतांनी घेतला होता. त्यामुळे भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे परिस्थिती आणखीनच चिघळली असताना हा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
कस्तुरबा गांधी मार्गावरील मशिदीमध्ये मुस्लिम नेत्यांची भेट घेतल्यानंतर मोहन भागवत यांनी आझाद बाजार येथील मदरशातील मुलांची भेट घेतली. यावेळी त्यांनी येथे काय शिकवतात असाही सवाल विद्यार्थ्यांना केला.
मदरशातील दीर्घ काळ भेट ही पहिल्यांदाच झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
मदरशाची भेट घेतल्यानंतर आरएसएसचे इंद्रेश कुमार म्हणाले की, हा एक प्रयत्न आहे. ते 70 वर्षांपासून लढत आहेत. जे एकत्र येतील ते ताकदीने लढतील आणि जे फूट पाडतील ते दुर्बल होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मोहन भागवत म्हणाले की, केवळ धर्माचा अभ्यास करून तुम्ही एक कसे होणार. इलियासी आधुनिक शिक्षण देण्याचे कामही करत आहेत.
त्यांना भरपूर ज्ञान असल्याने ते संस्कृतही शिकवणार असल्याचे इल्यासी यांनी सांगितले. गीतेबद्दलही त्यांनी यावेळी माहिती सांगितले.
मोहन भागवत यांनी यावेळी जय हिंदच्या घोषणा दिल्यानंतर विद्यार्थ्यांनीही घोषणा दिल्या. मदरशांच्या सर्वेक्षणाबाबत मदनी यांचा उल्लेख करताना इलियासी यांनी सांगितले की, जे सर्वेक्षण केले जात आहे ते ठीक आहे.
मदरशांचे सर्वेक्षण झाले पाहिजे आणि आधुनिक शिक्षण हे दिलेच पाहिजे. तसेच 15 ऑगस्ट, 26 जानेवारी हा कार्यक्रम देशाची शान आहे, तो साजरा केलाच पाहिजे अस मतही त्यांनी व्यक्त केले.