जेवणात मासा…कवितेत इक्बाल, मनमोहन सिंग यांची आवड काय काय?
Dr Manmohan Singh Passed away : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा शाकाहारी जेवणावर भर होता. पण त्यांना जेवणात मासा आवडत होता. तर कवींमध्ये इक्बाल हे त्यांचे आवडते होते. त्यांना निळा रंग अधिक प्रिय होता. त्यांना अजून या गोष्टींची आवड होती.
33 वर्षांपर्यंत राजकारणात असलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांना दिल्लीमधील बंगाली मार्केटमधील चाट खूप आवडायची. ती खाण्यासाठी ते दोन महिन्यात एकदा तरी सहकुटुंब तिथे जायचे. मितभाषी असलेले माजी पंतप्रधानांना कमी पण चविष्ट खाणे आवडायचे. दोन दशकांपर्यंत त्यांना जवळून पाहणारे त्यांचे मीडिया सल्लागार संजय बारू यांनी सांगितल्याप्रमाणे ते दुपारच्या जेवणात केवळ दोन चपात्या, पोळी खायचे. देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग गुरूवारी अचानक बेशुद्ध झाले. त्यांना दिल्लीतील एम्स रुगालयात दाखल करण्यात आले. 92 व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
डॉ. सिंग यांची राजकारणातील प्रवेश अपघातानेच झाला म्हणायला जागा आहे. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसमध्ये उलथापालथ झाली होती. दक्षिणेतील नरसिंह राव हे पंतप्रधान झाले. त्यावेळी त्यांना एका निष्णात अर्थमंत्र्याची गरज होती. मनमोहन सिंग यांच्या रूपाने त्यांची ही शोध मोहीम थांबली. त्यानंतर डॉ. सिंग यांनी राजकारणात मोठं-मोठी पद भूषवली.
जेवणात मासा, तांदळासह कढी फेव्हरेट ढीश
मनमोहन सिंग हे कमी खायचे. ते शाकाहार पसंत करत. पण त्यांना जेवणात मासा आवडायचा. जेवणानंतर कॉफी पिण्याची त्यांना आवड होती. संजय बारू यांच्या मते, चपाती अथवा पराठा हा त्यांच्या जेवणातील खास भाग होता. त्यांना तांदळासह कढी आणि लोणचं खाण्याची आवड होती. मनमोहन सिंग यांची मुलगी दमन सिंह यांनी त्यांच्या पुस्तकात ही आवर्जून आठवण सांगितली आहे. त्यांना पंजाबी जेवणाची आवड होती. दोन महिन्यातून ते कुटुंबासह बाहेर जेवायला जात असत. यावेळी दिल्लीतील बंगाली मार्केटमधील चाट ही त्यांची फेव्हरेट होती.
फ्रान्सचे व्हिक्टरी ह्युगो आवडते लेखक
अर्थशास्त्रात निष्णात मनमोहन सिंग याचे आवडते लेखक म्हणजे फ्रान्सचे व्हिक्टरी ह्युगो. अनेकदा त्यांच्या बोलण्यात, ह्युगो यांचा उल्लेख व्हायचा. 1991 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी ह्युगोच्या एका वाक्याने सुरूवात केली होती. अल्लामा इकबाल हे त्यांचे आवडते शायर, कवी होते. राज्यसभेतील चर्चा, वादा दरम्यान त्यांनी दोन शेर सादर केले होते. त्यानंतर विरोधी पक्ष शांत झाला होता.
त्यांना निळा रंग आवडायचा. त्यांनी अनेकदा निळ्या रंगाची पगडी घातलेले अनेकांनी पाहिलेले आहे. त्यांना निळ्या रंगाचे जॅकेट सुद्धा आवडायचे. शिक्षण घेताना, त्यांना मित्र, निळ्या पगडीवाले असे संबोधित करत, अशी आठवण त्यांनी सांगितली आहे.