Draupadi Murmu : द्रोपदी मुर्मूच भारताच्या नव्या राष्ट्रपती, कसा मिळवला सहज विजय?

सकाळपासून या निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू होती. दोन्ही उमेदवारांचं भवितव्य मतभेटीत 18 तारखेला बंद चालू होतं. आज त्याचा निकाल लागलेला आहे.

Draupadi Murmu : द्रोपदी मुर्मूच भारताच्या नव्या राष्ट्रपती, कसा मिळवला सहज विजय?
Follow us
| Updated on: Jul 21, 2022 | 8:07 PM

नवी दिल्ली : आदिवासी समाजाच्या महिला द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) याच भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती (15th President of India) ठरल्या आहेत. द्रोपदी मुर्मू यांनी यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांच्यावरती सहज विजय प्राप्त केला आहे. आत्ताच राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल हाती आला आहे,  सकाळपासून या निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू होती. दोन्ही उमेदवारांचं भवितव्य मतभेटीत 18 तारखेला बंद चालू होतं. आज त्याचा निकाल लागलेला आहे. मुर्मू यांच्यासाठी भाजपने देशभरात जोर लावला होता. त्यासाठी त्यांनी अनेक पक्षांना मतदानासाठी आवाहन केलं होतं. विरोधी पक्षातील काही पक्षांनीही त्यांना या निवडणुकीत मतदान केलं आहे. त्यामुळे त्यांना या निवडणुकीत मोठी मदत झाली आहे. आदिवासी महिलेला प्रथमच संधी मिळत आहे, असे सांगत शिवसेनेही या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवारालाच पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातूनही मुर्मू यांना चांगली मतं मिळाली आहे.

एएनआय वृत्तसंस्थेचं ट्विट

काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केलं

द्रौपदी मुर्मू यांना क्रॉस व्होटिंगद्वारे आतापर्यंत 104 आमदार आणि 17 खासदारांचा पाठिंबा मिळाला आहे. आतापर्यंत 16 राज्यांतील 104 आमदारांनी क्रॉस व्होटिंग करून द्रौपदी मुर्मूंना मतदान केले आहे.

एएनआय वृत्तसंस्थेचं खासदारांबाबतचं ट्विट

तिसऱ्या फेरीत पारडं फिरलं

तिसर्‍या फेरीच्या मतमोजणीत त्यांना राष्ट्रपती होण्यासाठी आवश्यक असलेली 50 टक्के मते मिळाली आहेत. तिसर्‍या फेरीतील मतमोजणीबाबत बोलायचे झाले तर त्यात एकूण 1,333 मते पडली. ज्याचे मूल्य 1,65,664 होते. त्यापैकी मुर्मू यांना 812 मते मिळाली. तर यशवंत सिन्हा यांना 521 मते मिळाली.

सिन्हा यांनीही दिल्या शुभेच्छा

यशवंत सिन्हा यांनी द्रौपदी मुर्मूंचे विजयी अभिनंदन केले आहे. त्यांनी लिहिले की मी द्रौपदी मुर्मूंचे विजयासाठी अभिनंदन करतो. भारताला आशा आहे की त्या कोणत्याही भीतीशिवाय किंवा पक्षपात न करता संविधानाच्या संरक्षक म्हणून काम करतील, अशा शुभेच्छा प्रतिस्पर्धी उमेदवार यशवंत सिन्हा यांनी दिल्या आहेत. मुर्मू यांच्या रुपाने देशाला आज नव्या राष्ट्रपती मिळाल्या आहे. भारतीय संविधानात हे पद अत्यंत मानाचे पद आहे. या पदावरील व्यक्तिकडून कोणत्याही पक्षपाताशिवाय देशहिताच्या कामगिरीची अपेक्षा केली जाते.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.