Covid-19: कोरोनाच्या उपचारात गेमचेंजर औषध; दिल्लीच्या ‘एम्स’ला मिळाली पहिली बॅच

या औषधामुळे कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनची फारशी गरज भासणार नाही. | DRDO 2G drug dose

Covid-19: कोरोनाच्या उपचारात गेमचेंजर औषध; दिल्लीच्या 'एम्स'ला मिळाली पहिली बॅच
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: May 17, 2021 | 11:15 AM

नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या 2-डीऑक्सी डी ग्लुकोज (2-DG) या औषधाची पहिली बॅच अखेर दिल्लीच्या एम्स रुग्णालयाला देण्यात आली आहे. या औषधामुळे कोरोना रुग्णांना लागणारी ऑक्सिजनची गरज कमी होते. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असताना हे औषध कोरोना रुग्णांसाठी गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे. आता पुढील एक-दोन दिवसांत हे औषध देशातील सर्व राज्यांमध्ये उपलब्ध होईल. भारतीय औषध नियामक महामंडळाने या औषधाला 8 मे रोजी मंजुरी दिली होती. (DRDO 2 dg drug 10 thousand doses will launch next week for coronavirus patients)

आता डॉ. रेड्डीज लॅब या कंपनीमार्फत या औषधाचे उत्पादन केले जात आहे. हे औषध पावडरच्या स्वरुपात मिळणार आहे. ही पावडर पाण्यात मिसळूनही घेतली जाऊ शकते. या औषधामुळे कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनची फारशी गरज भासणार नाही. पुढच्या आठवड्यात देशभरातील रुग्णालयांमध्ये या औषधाचे तब्बल 10 हजार डोस उपलब्ध होतील.

Corona Cases in India | देशात कोरोनाग्रस्तांमध्ये मोठी घट, नव्या बाधितांचा आकडा तीन लाखांच्या खाली

रुग्ण बरे होण्यासाठी लागणार वेळ कमी

डीआरडीओनं जारी केलेल्या माहितीनुसार 2 डेक्सोय डी ग्लुकोजच्या रुग्णांना दिलं गेलं ते रुग्ण वेगानं रिकव्हर होतात. त्याचा बरा होण्याचा वेग नियमितपणे केल्या जाणाऱ्या उपचार पद्धतीपेक्षा चांगला असल्याचा दावा कऱण्यात आला आहे. नियमित उपचार पद्धतीनं रुग्ण बरा होण्यासाठी लागणारा वेळ आणि 2 डेक्सोय डी ग्लुकोज दिलेले रुग्ण बरे होण्याचा वेळ यांच्यामध्ये जवळपास 2.5 दिवसांचा फरक आढळून आल्याचं डीआरडीओकडून सांगण्यात आलेय.

2 डेक्सोय डी ग्लुकोज कसं घ्यायचं?

डीआरडीओनं विकसित केलेलं हे औषध पावडर स्वरुपात मिळतं. हे पाण्यामध्ये टाकून घ्यावं लागते. हे औषध संसर्ग झालेल्या पेशींमधील विषाणूंचा संसर्ग कमी करण्यासोबत संसर्ग रोखण्याचं काम करत. त्यासोबतचं रुग्णाच्या शरीरातील उर्जा वाढवण्याचंही काम करते.

2 डेक्सोय डी ग्लुकोजच्या संशोधनाची सुरुवात कधी?

भारतात कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाल्यानंतरच्या पहिल्या लाटेमध्ये INMAS-DRDO च्या शास्त्रज्ञांनी याविषयी संशोधन करण्यास सुरुवात केली. कामामध्ये त्यांना हैदराबादच्या सेंटर फॉर सेल्यलर अँड मॉलेक्युलर बायोलॉजीचं सहकार्य लाभलं. संशोधनात त्यांना 2 डेक्सोय डी ग्लुकोज कोरोना विषाणू विरोधात प्रभावी असल्याचं आढळून आलं आहे. त्याशिवाय हे औषध विषाणूंची वाढ रोखण्याच कामही करतं. प्रयोगशाळेतील परिणामांच्या आधारवर मे 2020 मध्ये कोरोना रुग्णांवर क्लिनिकल ट्रायल घेण्यासाठी डीसीजीआयनं परवानगी दिली होती.

क्लिनिकल ट्रायलच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेत मे ते ऑक्टोबर 2020 या काळात हे औषध सुरक्षित असल्याचं स्पष्ट झालं. त्यासोबतचं रुग्ण बरे होण्यामध्ये या औषधाची सकारात्मक परिणामकारकता दिसून आली होती. दुसऱ्या टप्प्यातील काही चाचण्या 6 रुग्णालयांमध्ये घेण्यात आल्या. त्याशिवाय यानंतर रुग्णालयांची सख्या वाढवण्यात आली. देशातील 11 हॉस्पिटलमध्ये 110 रुग्णांवर चाचणी करण्यात आल्याचं, डीआरडीओनं सांगितले होते.

(DRDO 2 dg drug 10 thousand doses will launch next week for coronavirus patients)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.