नव्या संसदेसाठी ड्रेस कोडही नवा, आता कर्मचारी वेगवेगळ्या ड्रेसमध्ये दिसणार

| Updated on: Sep 12, 2023 | 3:39 PM

संसदेतील कर्मचाऱ्यांचा नवा ड्रेस कोड NIFT ने तयार केला आहे. त्यामुळे यापुढे तुम्हाला सगळे कर्मचारी वेगळ्या ड्रेसमध्ये पाहायला मिळणार

नव्या संसदेसाठी ड्रेस कोडही नवा, आता कर्मचारी वेगवेगळ्या ड्रेसमध्ये दिसणार
Special session of Parliament
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली : संसदेतील (Special session of Parliament) सगळ्या कर्मचाऱ्यांना नवी कपडे मिळणार आहेत. एका हिंदी बेवसाईटने दिलेल्या माहितीनुसार, गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi) दिवशी नवीन संसद भवनचं (Parliament)उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यादिवशी तिथं विधीनुसार पूजा केली जाणार आहे. पूजा संपल्यानंतर प्रवेश केला जाणार आहे. 18 सप्टेंबरला जुन्या संसद भवनात बैठक होईल. त्या दिवशी पहिली संसद निर्माण कशी केली, तेव्हापासून आतापर्यंतची चर्चा केली जाईल.

विधीवत पूजा केल्यानंतर नव्या संसद भवनमध्ये प्रवेश केला जाणार आहे. त्यावेळी दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक सुध्दा होण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संसद भवनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवा पोषाख मिळणार आहे. तो नवा पोषाख NIFT यांच्याकडून तयार करण्यात आला आहे. सचिवालयातील कर्मचाऱ्यांना बंद गळ्याचा सूटमध्ये बदल करुन गुलाबी रंगाचं नेहरु जॅकेट देण्यात येणार आहे.

Special session of Parliament (1)

त्याचे शर्ट सुध्दा गुलाबी रंगाचे असतील. त्या शर्टवर कमळाचे फूल असेल आणि खाकी रंगाची पॅन्ट देखील असेल, सांगितलं जात आहे की, दोन्ही सदनातील सदस्यांसाठी सुध्दा मार्शल ड्रेस सुध्दा बदली केला जाऊ शकतो, ती लोकं मणिपुरी पद्धतीची पगडी घालतील. त्याचबरोबर संसदेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची सुध्दा वेशभूषा बदलण्यात येणार आहे. आतापर्यंत त्यांनी सफारी सूट घातला आहे, परंतु त्यांना आता सैनिकांप्रमाणे ड्रेस देण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

18 ते 22 सप्टेंबरला विशेष सत्र

केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबरला संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्यातं आलं आहे. सुत्रांच्या माहितीनुसार त्या अधिवेशनात सरकार संसदेत एकाचवेळी एक देश एक निवडणुकीचं बील पास करण्याची शक्यता आहे. संसदेत विशेष अधिवेशन बोलवण्यामुळे विरोधकांनी मोदी सरकारवरती जोरदार टीका केली आहे. त्याचबरोबर सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीलं आहे.