डीटीएच कंपनीची सक्ती नाही, तुमच्या आवडीचा सेट टॉप बॉक्स निवडा
मुंबई : केबल टीव्हीची नवी शुल्क प्रणाली ही 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. यानंतर भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायचे अध्यक्ष आर.एस. शर्मा यांनी ग्राहकांच्या हिताचा आणखी एक निर्णय घेतला आहे. आता ग्राहक आपल्या सोयी आणि गरजेनुसार सेट टॉप बॉक्स सरळ बाजारातून विकत घेऊ शकतात. यासाठी कुठलीही डीटीएच सर्व्हिस कंपनी ग्राहकांना त्यांच्या कंपनीचा सेट टॉप […]
मुंबई : केबल टीव्हीची नवी शुल्क प्रणाली ही 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. यानंतर भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायचे अध्यक्ष आर.एस. शर्मा यांनी ग्राहकांच्या हिताचा आणखी एक निर्णय घेतला आहे. आता ग्राहक आपल्या सोयी आणि गरजेनुसार सेट टॉप बॉक्स सरळ बाजारातून विकत घेऊ शकतात. यासाठी कुठलीही डीटीएच सर्व्हिस कंपनी ग्राहकांना त्यांच्या कंपनीचा सेट टॉप बॉक्स घेण्यासाठी जबरदस्ती करु शकत नाही.
सर्व्हिस प्रोव्हायडर हे ग्राहकांच्या आवडींना प्राधान्य देत असल्याचं मागील काही दिवसांपासून दिसून येत आहे. त्यामुळे 100 टक्के ग्राहक हे नव्या प्रणालीत समाविष्ट होण्यास मदत होणार आहे. सुरुवातीला याची गती तितकीशी बरी नसली, तरी त्यात आता बराच सुधार झाला आहे. यामुळे 31 जानेवारी पर्यंत 90 टक्के ग्राहकांना या प्रणालीत आणण्यात आम्ही यशस्वी होऊ, असा विश्वास शर्मा यांनी व्यक्त केला.
ट्रायने दिलेल्या माहितीनुसार, 24 जानेवारी 2019 पर्यंत 40 टक्के लोकांनी ही नवीन प्रणाली स्वीकारली आहे. केबल टीव्हीसाठी ट्रायने या नव्या प्रणालीला लागू करण्याचे आदेश दिले होते. या अंतर्गत ग्राहकांना आपल्या आवडीचे चॅनेल निवडण्याची आणि त्यानुसार पैसे भरण्याची मुभा देण्यात आली आहे.
याशिवाय इंटरनेटवरील सेवांना नियामक आराखड्यात बसवण्याचा विचारही ट्राय करत आहे. गुगल ड्युओ, फेसबुक, व्हाट्सअॅप आणि स्काईप यांसारख्या इंटरनेच्या मंदतीने चालणाऱ्या सेवांमध्येही आता कॉलिंग आणि मेसेजिंग सारख्या सेवा देण्यात येत आहेत. याचा फटका दुरसंचार कंपन्यांना बसतो आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून या इंटरनेटवरील सेवांना नियामक आराखड्यात बसवण्याबाबत चर्चा होते आहे. याबाबत ट्रायने ग्राहकांचे मतही मागितले आहे.
संबंधित बातम्या :
1 फेब्रुवारीपासून 153 रुपयांत 100 चॅनल