नवी दिल्ली : देश-विदेशात आपल्या तर्कसंगत उत्तरांसाठी आणि योगाच्या प्रचारासाठी प्रसिद्ध असलेले सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी TV9 चे एमडी बरुण दास यांच्यासोबत Duologue कार्यक्रमामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली मते मांडली आहेत. त्यांनी या कार्यक्रमामध्ये त्यांना अध्यात्माविषयी अनेक सवाल उपस्थित करण्यात आली आहे. त्यामध्ये त्यांनी अगदी अगदी मोकळेपणाने त्यांनी उत्तरे दिली आहेत. या कार्यक्रमामध्ये बरुण दास सद्गुरूंचे विचार आणि शब्द एका व्यवस्थापनाच्या चौकटीत मांडण्यात आले आहेत.
हा कार्यक्रम एकूण 6 भागांमध्ये रेकॉर्ड करण्यात आला आहे. त्यामध्ये पहिला भाग हा ‘कॉम्प्लेक्सिटी टू क्लॅरिटी’ वर आहे. या दरम्यान सद्गुरुंनी अध्यात्म ही संकल्पना आहे यावरच ते असहमत झाले आहेत.
याविषयी त्यांनी सविस्तरपणे आपले मत व्यक्त केले आहे.तर दुसरा भागामध्ये ‘SPIRITUAL FACTORY S.O.P.’ या विषयावर ते बोलले आहेत.
या एपिसोडमध्ये बरुण दास दैनंदिन जीवनातील साध्या आध्यात्मिकतेवर बोलले आहेत. मात्र सद्गुरू यांनी बोलताना त्यांनी अभियांत्रिकी तत्त्वज्ञान आयआयटी-आयआयएमच्या व्यावसायिक नेत्याबरोबर आपले जुळत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
या मालिकेतील तिसरा भाग हा ‘INTOXICATED’ वर म्हणजेच नशा झालेला’ यावर आहे. बरुण दास सद्गुरूंना जीवनातील शांतता, उत्साह आणि नशा याबद्दलही सवाल उपस्थित केले आहेत.
या प्रश्नांच्या उत्तरामध्ये सद्गुरूंनी आदियोगी शिवाची तत्त्वं सांगितली आहेत. तर पुढचा भाग ‘THE MATH OF HAPPINESS’ वर आधारित आहे.
बरुण दास यांनीही अपेक्षेपेक्षा चांगल्या निकालाच्या दृष्टीने आनंदाचे गणित समजून घेण्याबद्दल त्यामध्ये चर्चा केली आहे. यावर सद्गुरूंनी जे सांगितले आहे ते मात्र खूप मनोरंजक आहे.
या क्रमातील पुढील भाग ‘INDIAS TRYST.’ वर सादर झाला आहे. सद्गुरु आणि बरुण दास ‘सनातन’ जीवनपद्धती आणि भारताने आर्थिकदृष्ट्या विवेकपूर्ण प्रवास सुरू केल्यावर ज्या ऐतिहासिक चुका केल्या जाऊ शकत नाहीत त्याबद्दल चर्चा करतात. यावर सद्गुरूंनी जीवनात नवीन दृष्टीकोन कसा येतो याबद्दलही चर्चा केली आहे.
तर या कार्यक्रमाचा शेवटचा भाग आहे हा ‘YONDER OF YOUTH.’ मध्ये देशातील युवावर्ग आणि त्यांची विचारसरणी यावर खूप गंभीरपणे चर्चा केली आहे.
यावेळी सद्गुरुंना विचारण्यात आले की, सद्गुरूंचा युवकांवरी विश्वास उडाला आहे का? कौटुंबिक मूल्ये महत्वाची नाहीत का? तर या प्रश्नांची उत्तरं ही सद्गुरूं देतात का त्यासाठी हा कार्यक्रम पाहा…
महाशिवरात्रीनिमित्त टीव्ही 9 भारत वर्षाचे एमडी आणि सीईओ वरुण दास यांनी शिवाचे महान रूप, अध्यात्म आणि तत्त्वज्ञान याविषयी योगाच्या प्रचारासाठी आणि द्वैभाषिक कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्याशी संवाद साधला आहे. त्यासाठी आपण हा कार्यक्रम येथे पाहू शकता…