अध्यात्माचा अर्थ काय? सद्गुरूंनी सांगितली ही उत्तरे…

| Updated on: Feb 19, 2023 | 11:56 PM

सद्गुरू यांनी सांगितले की, आदियोगी मूर्तींचे अविभाज्य घटक म्हणजे उत्साह, स्थिरता आणि नशा. सद्गुरु म्हणतात की जीवनात प्रत्येक गोष्टीसाठी उत्साह आवश्यक असतो.

अध्यात्माचा अर्थ काय? सद्गुरूंनी सांगितली ही उत्तरे...
Follow us on

 नवी दिल्लीः आध्यात्मिक गुरू सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्याशी TV9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांनी खास संवाद साधला आहे. संभाषणादरम्यान, बरुण दास यांनी सद्गुरूंना अध्यात्माविषयी काही सवाल उपस्थित केले होते. आणि त्यांच्याकडून त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला. टीव्ही9 नेटवर्कच्या ‘डायलॉग विथ बरुण दास’ या विशेष कार्यक्रमात बरुण दास यांनी सद्गुरूंना विचारले की अध्यात्म ही तार्किक आहे की सर्जनशील प्रक्रिया? ज्ञानाच्या मर्यादा काय आहेत? अध्यात्मिक प्रबोधनाच्या बळावर भारत जगामध्ये आपले नेतृत्व मिळवू शकेल का? या सर्व पैलूंवर सद्गुरु यांनी आपली मतं व्यक्त केली आहेत.

सद्गुरु जग्गी वासुदेव हे केवळ अध्यात्मिक गुरु नसून त्यांचे व्यक्तिमत्त्व जागतिक स्तरावर प्रभावशील राहिले आहे. सार्वजनिक वक्ता म्हणून ते वादग्रस्त राजकीय विषयांसह अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडत असतात. बरुण दास यांच्याशी झालेल्या संभाषणात त्यांनी अध्यात्मावर सर्वच गोष्टी अगदी उघडपणे सांगितल्या आहेत.

संवादाची सुरुवात अध्यात्माचा अर्थ या विषयावरील चर्चेने झाली. सद्गुरु म्हणतात की ही संकल्पना नाही किंवा मनात निर्माण होत नाही. जेव्हा तुम्ही तुमचे मन बाजूला ठेवता तेव्हा तुम्ही आध्यात्मिक बनता.

याबाबत सद्गुरु स्पष्ट करतात की अध्यात्मिक प्रक्रियेतील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्व ओळखणे. तुम्हाला तुमच्या अज्ञानाने ओळख निर्माण करायची आहे, ज्ञानाने नाही. कारण आपल्याला माहित असलेली प्रत्येक गोष्ट फक्त एक छोटा कण असते.

डायलॉग्ज विथ बरुण दास या नवीन एपिसोडमध्ये सद्गुरु यांनी सांगितले की, मानवासह बहुतेक वास्तव हे अभौतिक आहे आणि जर एखाद्याने त्यात प्रवेश केला तर भौतिकता आणि व्यवहाराच्या जगाचे त्यामध्ये इतके कौतुक होणार नाही. या एपिसोडमध्ये सद्गुरूंनी आदियोगी मूर्तीच्या विविध आयामांचा अर्थही स्पष्ट केला आहे.

सद्गुरू यांनी सांगितले की, आदियोगी मूर्तींचे अविभाज्य घटक म्हणजे उत्साह, स्थिरता आणि नशा. सद्गुरु म्हणतात की जीवनात प्रत्येक गोष्टीसाठी उत्साह आवश्यक असतो,

परंतु स्थिरतेशिवाय उत्साह अस्थिरतेकडे नेतो. ते म्हणतात, की एखाद्याने नशा करणे आवश्यक आहे, परंतु अल्कोहोल किंवा ड्रग्सने नाही तर त्याशिवायची नशा महत्वाची.

सद्गुरु जग्गी वासुदेव यांचा समावेश असलेली ‘डायलॉग विथ बरुण दास’ ही वेब सिरीज सहा भागांची आहे. आतापर्यंत त्याचे चार भाग प्रसारित झाले आहेत. या मालिकेचे सर्व भाग पाहण्यासाठी News9Plus अॅप डाउनलोड करा.

भाग 1: स्पष्टतेची जटिलता
भाग २: अध्यात्मिक फॅक्टरी SOP
भाग 3: नशा
भाग 4: आनंदाचे गणित

TV 9 Bharat Varsh चे MD आणि CEO बरुण दास यांनी योगाच्या प्रचारासाठी प्रसिद्ध असलेल्या सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्याशी डुओलोग कार्यक्रमात काय बोलले ते तुम्ही येथे पाहू शकता.