नवी दिल्ली : देशात उत्तरेकडील अनेक राज्यात भूकंपाचे जोरदार धक्के अनुभवायला मिळाले. आसाम, बिहार, सिक्किम आणि पश्चिम बंगालमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीने दिलेल्या माहितीमुसार भूकंपाची तीव्रता 5.4 रिस्टर स्केल इतकी होती. भूकंपाचं केंद्र सिक्किम – नेपाळ बॉर्डरवर असल्याचं सांगितलं जातयं. तर जमिनीत 10 किलोमीटर खोल भूकंप झाल्याची नोंद झाली आहे. सोमवारी रात्री 8 वाजून 49 मिनिटांनी भूकंपाचे धक्के अनुभवायला मिळाले. (Earthquake in Assam, Bihar, Sikkim and West Bengal, PM Modi reviews)
बिहारमध्ये पाटणा, कटिहार, भागलपूरसह अनेक जिल्ह्यात भूकंप जाणवला. तर भूकंपाचा दुसरा धक्का दार्जिलिंग, सिलीगुडी, दक्षिण दिनाजपूर, रायगंज, जलपाईगुडी, अलीपूरद्वारेमध्ये अनुभवायला मिळाला. इथं भूकंपाची तीव्रता 4.2 रिस्टर स्केल नोंदवली गेली आहे.
Earthquake of magnitude 5.4 on the Richter scale occurred near Sikkim-Nepal border at 2049 hours: National Center for Seismology pic.twitter.com/FxT8RfV43r
— ANI (@ANI) April 5, 2021
भूकंपामुळे अद्याप कुठेही मृत्यूची नोंद झालेली नाही. यापूर्वी एप्रिलमध्येच 2 एप्रिलला मिझोरममध्ये भूकंपाचे झटके अनुभवायला मिळाले होते. तिथे भूकंपाची तीव्रता 3.8 रिस्टर स्केल नोंदवली गेली होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार मिझोरामच्या उत्तर-पूर्व भागात आएजोलमध्ये भूकंपाच्या धक्क्यानं जमिन हलल्याचा अनुभव अनेकांना आला. तर काही दिवसांपूर्वी लेहमध्ये रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले होते. तेव्हा रिस्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 3.1 नोंदवली गेली होती.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाम, बिहार, सिक्किम आणि पश्चिम बंगालमधील भूकंपामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन करुन भूकंपाबाबत सविस्तर माहिती घेतली आणि मदतीचं आश्वासनही दिलं आहे.
PM Narendra Modi is taking stock of the damage due to the earthquake. He is speaking to the Chief Ministers of all foure affected states, he has already spoken to CMs of Bihar, Assam, and Sikkim: Govt of India sources pic.twitter.com/tank8oAKb5
— ANI (@ANI) April 5, 2021
इतर बातम्या :
Earthquake in Assam, Bihar, Sikkim and West Bengal, PM Modi reviews