Earthquake Today: आज परत जाणविले भूकंपाचे धक्के, पूर्वोत्तर भारतासह अनेक भागात हादरे
आज परत एकदा भारतात भूकंपाचे धक्के जाणविले. सलग दुसऱ्या दिवशी आलेय भूकंपाचा केंद्रबिंदू अरुणाचल प्रदेशमधील पश्चिम सियांग येथे होता.
नवी दिल्ली, ईशान्य भारतात भूकंपाचे धक्के (Earthquake Today) जाणवले आहेत. या भूकंपाचा केंद्रबिंदू अरुणाचल प्रदेशातील पश्चिम सियांग येथे होता. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, अरुणाचलमधील (Arunachal) या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.7 एवढी होती. आज सकाळी 10.31 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू 10 किमी खोलीवर होता.
दिल्ली-एनसीआरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के
याआधी 9 नोव्हेंबरच्या रात्री दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे धक्के जाणवले होते. मंगळवारी रात्री 1:57 वाजता भूकंप झाला, त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.3 इतकी होती. दिल्ली-एनसीआर, यूपी आणि बिहारमध्ये हे धक्के जाणवले.
नेपाळ आणि मणिपूर हे केंद्र होते
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, सकाळी 1.57 वाजता झालेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ, मणिपूर होता. या भूकंपाची खोली जमिनीखाली 10 किमी होती. विशेष म्हणजे दिल्ली एनसीआरसह अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवल्याने लोक घराबाहेर पडले.
उत्तराखंडमध्ये सकाळी पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के
यानंतर सुमारे साडेचार तासांनंतर बुधवारी सकाळी उत्तराखंडच्या पिथौरागढमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.3 मोजली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू 5 किमी खोलीवर होता.
नेपाळमधील डोटी जिल्ह्यात 6 ठार
नेपाळमधील डोटी जिल्ह्यात भूकंपानंतर पहाटे 2:12 च्या सुमारास घर कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला. अनेक भागात एकापाठोपाठ तीन भूकंपाचे धक्के जाणवले. यानंतर दुपारी 3.15 वाजता पुन्हा 3.6 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के जाणवले.