नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपूर्वी दिल्लीत भुकंपाचे धक्के बसले होते, त्यानंतर आता पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने दिल्ली हादरली आहे. राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा 2.5 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के बसले असले तरी या धक्क्यांमुळे कोणतीही जीवितहानी अथवा कुठेही पडझड झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. नवी दिल्लीपासून पश्चिमेकडेच्या आठ किलोमीटर अंतरावर रात्री साडेनऊ वाजता हे भूकंपाचे झटके बसले होते.
An earthquake of magnitude 2.5 occurred 8 km west of New Delhi at around 9.30pm today. The depth of the earthquake was 5 km below the ground: National Center for Seismology pic.twitter.com/f0V0A2Mtky
— ANI (@ANI) November 29, 2022
मागील काही दिवसांपूर्वीही राजधानी दिल्लीत भूकंपाचे धक्के बसले होते. मागील वेळी दिल्लीत भूकंप झाला होता त्यावेळी 5.4 रिश्टर स्केलच्या तीव्रेतेच्या भूकंपाचे धक्के बसले होते.
त्यावेळी भूकंपाची तीव्रता जास्त असल्याने दिल्लीसह आसपासचा परिसर हादरला होता. तर यावेळी भूकंपाची तीव्रता कमी असल्याने त्याचे धक्के कुठेही जाणवले नाहीत.
दिल्लीत भूकंपाचे हादरे बसल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीकडून ही माहिती देण्यात आली होती.
गेल्या काही दिवसांपूर्वीही भूकंपाचे धक्के जाणवले होते, त्यावेळी 5.4 रिश्टर स्केल एवढ्यी तीव्रतेने धक्के बसले असल्याने अनेक परिसरांना धक्क जाणवले होते. त्यानंतर काही दिवसानंतर आज पुन्हा दिल्ली हादरल्याने थोड्या फार प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले होते.
दिल्लीत मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता पश्चिम भागात भूकंपाचे धक्के बसल्यानंतर राष्ट्रीय भूकंपशास्र केंद्राकडून ही माहिती जाहीर करण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय भूकंपशास्र केंद्राकडून या भूकंपाचा केंद्रबिंद्रू जमिनीच्या खाली पाच किलोमीटर आतमध्ये असल्याचे सांगण्यात आले आहे. राजधानी दिल्ली एका महिन्यात दुसऱ्यांदा हादरली असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तरीही काही प्रशासनाकडून काही परिसरांची माहिती घेण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.