Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Panama Papers Leak Case : भोपाळ आणि गोव्यात कारवां रिसोर्टच्या मालकावर ED ची कारवाई; कारवाईत सापडली 88 लाखांहून जादा कॅश

पनामा पेपर्स प्रकरणात भारतातील सुमारे 500 लोकांचा समावेश होता. यामध्ये देशातील नेते, चित्रपट अभिनेते, खेळाडू, उद्योगपती, प्रत्येक वर्गातील नामवंत व्यक्तींची नावे होती.

Panama Papers Leak Case : भोपाळ आणि गोव्यात कारवां रिसोर्टच्या मालकावर ED ची कारवाई; कारवाईत सापडली 88 लाखांहून जादा कॅश
अंमलबजावणी संचालनालयImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 13, 2022 | 5:05 PM

नवी दिल्ली : भोपाळमधील आरपीएम सोनिक अॅडव्हेंचर अँड कॅरव्हान रिसॉर्टचे मालक संजय विजय शिंदे यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयने (ED) छापा मारला. संजय विजय शिंदे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या मनी लाँड्रिंग (Money Laundering) प्रकरणात ईडीने भोपाळ आणि गोव्यातील चार ठिकाणी छापे टाकले आहेत. पनामा पेपर्स लीक प्रकरणात (Papers Leak Case) शिंदे यांचे नाव जोडले गेले होते. आतापर्यंत टाकलेल्या छाप्यांमध्ये 88 लाख 30 हजारांहून अधिक रुपयांची रोकड सापडली आहे. ईडीने काही कागदपत्रेही जप्त केली आहेत. तपास सुरूच आहे. पोलिसांनी संजय शिंदे याला अटकही केली आहे. संजयची विदेशातही गुंतवणूक असल्याचे सांगण्यात येत आहे. ब्रिटीश व्हर्जिन आयलंड आणि सिंगापूरमधील बँकांसह जगातील विविध बँकांमध्ये संजयच्या एकूण 31 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.

पनामा पेपर्स लीक प्रकरण नेमकं काय?

पनामा पेपर्स प्रकरणात भारतातील सुमारे 500 लोकांचा समावेश होता. यामध्ये देशातील नेते, चित्रपट अभिनेते, खेळाडू, उद्योगपती, प्रत्येक वर्गातील नामवंत व्यक्तींची नावे होती. या सर्व लोकांवर करचुकवेगिरीचा आरोप आहे. ज्याच्या मदतीने एजन्सी आता आपले काम करत आहे.

पनामा पेपर्समुळे जगभरात उडाली होती खळबळ

पाच वर्षांपूर्वी पनामा पेपर्स प्रकरणामुळे जगभरात अशीच खळबळ उडाली होती. यामध्ये जगातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींना करचुकवेगिरीसाठी परदेशातील बोगस कंपन्यांमध्ये अवैधरित्या गुंतवणूक केल्याचे समोर आले होते. यामध्ये अनेक भारतीयांचाही समावेश होता. त्यामुळे या प्रकरणानंतर संबंधित भारतीय व्यक्तींनी आपली गुंतवणूक दुसरीकडे वळवण्याचे प्रयत्न सुरु केले होते. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या अनिल अंबानी यांनी ब्रिटनमधील न्यायालयाला आपण दिवाळखोर झाल्याचे सांगितले होते. मात्र, पनामा पेपर्सच्या माहितीनुसार, त्यांच्याकडे 18 परदेशी कंपन्यांची मालकी असल्याची माहिती समोर आली होती.

हे सुद्धा वाचा

पँडोरा पेपर्समध्ये आणखी कोणाची नावं?

या अहवालातील माहितीनुसार, 300 हून अधिक भारतीय नावांपैकी 60 जणांविरोधात पुरावे असून त्यांची चौकशीही झाली आहे. येत्या काही याविषयीच्या आणखी काही गोष्टी समोर येतील. या लोकांनी सामोआ, बेलीज, कुक बेटांपासून ते ब्रिटिश व्हर्जिन बेटे आणि पनामा यासारख्या देशांमध्ये बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून पैसा गुंतवल्याचे समजते.

आयकर खात्याच्या माजी अधिकाऱ्यांचाही समावेश

पँडोरा पेपर्सच्या माहितीनुसार, भारतातील केवळ राजकारणी आणि सेलिब्रिटींनीच परदेशात गुंतवणूक केलेली नाही. तर यामध्ये महसूल खात्याचे माजी अधिकारी, आयकर खात्याचे माजी आयुक्त आणि माजी सैन्याधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचे नाव

जगभरात गाजलेल्या पनामा पेपर्स लीक प्रकरणानंतर आता जगातील धनाढ्यांना परदेशात केलेली गुंतवणूक उघड करणारी कागदपत्रे समोर आली होती. ज्यात जगातील 117 देशांच्या 600 पत्रकारांनी केलेल्या पँडोरा पेपर्स या शोध मोहिमेत भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचेही नाव आले होते. मात्र सचिन तेंडुलकरच्या वकिलांनी दावा फेटाळला होता. तसेच सचिन तेंडुलकर यांची सर्व गुंतवणूक वैध मार्गाने केलेली आहे. आयकर विभागाला याविषयी माहिती देण्यात आली होती, असे वकिलांकडून सांगण्यात आले होते.

अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनची चौकशी

याच प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिची अंमलबजावनी संचलनालय अर्थात ईडीकडून तब्बल 6 तास चौकशी झाली होती. यावेळी माध्यमांशी ऐश्वर्याची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तीने माध्यमांशी बोलणं टाळलं होतं.

पनामा पेपर्स काळा पैसा लपवण्याचा मार्ग?

परदेशात पैसे पाठवण्यासाठी किंवा परदेशातून पैसे देशात पाठवण्यासाठी कंपन्या किंवा बँक खाती वापरली जाऊ शकतात. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक परदेशी खाते किंवा बँक खाते फसवणूकीसाठी उघडले जात आहे. मात्र, बर्‍याच काळापासून, परदेशी खाती किंवा कंपन्या, विशेषत: टॅक्स हेव्हन्समध्ये, कर चुकवण्यासाठी किंवा अनधिकृत स्त्रोतांकडून कमावलेले पैसे सुरक्षित करण्यासाठी वापरल्या जात आहेत.

यांची ही नावे आली या प्रकरणात

याच प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचे नाव समोर आल्यानंतर बॉलिवूडसह क्रिकेट जगतात सुनामी आली होती. मात्र या दोघांचीच नावे याप्रकरणात आली नव्हती तर यात अजय देवगण, विनोद अदानी, शिशिर बाजोरिया, अपोलो ग्रुपचे अध्यक्ष ओंकार कंवर, वकील हरीश साळवे, TAFE चेअरमन मल्लिका श्रीनिवासन, DLF के केपी सिंह आणि कुटुंबीय यांचे पनामा पेपर्समध्ये नाव आले आहे.

अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार.
त्यांनी जेवायला बोलवलंय, अजितदादांची भेट घेणार... सुरेश धस काय म्हणाले
त्यांनी जेवायला बोलवलंय, अजितदादांची भेट घेणार... सुरेश धस काय म्हणाले.
'वडिलांचं कर्तृत्व नसेल तर पराभव...', सरवणकरांचा अमित ठाकरेंना टोला
'वडिलांचं कर्तृत्व नसेल तर पराभव...', सरवणकरांचा अमित ठाकरेंना टोला.
बीडच्या सगळ्या गँगला आता सुतासारखं सरळ करणार; अजितदादांचा इशारा
बीडच्या सगळ्या गँगला आता सुतासारखं सरळ करणार; अजितदादांचा इशारा.
दादांनी महिला कार्यकर्त्याला झापलं, दादा बीडमध्ये बघा काय-काय घडलं?
दादांनी महिला कार्यकर्त्याला झापलं, दादा बीडमध्ये बघा काय-काय घडलं?.
वक्फ बोर्डाला धर्मनिरपेक्ष बनवायचे आहे - संसदीय मंत्री किरेन रिजिजू
वक्फ बोर्डाला धर्मनिरपेक्ष बनवायचे आहे - संसदीय मंत्री किरेन रिजिजू.
गंगाजल शुद्धच पण.., शिवसेनेकडून सेनाभवनासमोर बॅनरबाजी अन् मनसेला डिवचल
गंगाजल शुद्धच पण.., शिवसेनेकडून सेनाभवनासमोर बॅनरबाजी अन् मनसेला डिवचल.