काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या घरी ED चा छापा, 5 हजार कोटींच्या घोटाळा प्रकरणी चौकशी सुरु

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या घरावर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) 5,000 कोटीच्या भ्रष्टाचार प्रकरणात छापा टाकला आह (ED raid on Ahmed Patel).

काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या घरी ED चा छापा, 5 हजार कोटींच्या घोटाळा प्रकरणी चौकशी सुरु
Follow us
| Updated on: Jun 27, 2020 | 3:42 PM

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या घरावर अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) छापा टाकला आहे (ED raid on Ahmed Patel). ईडीकडून बायोटेक संधेसारा घोटाळा प्रकरणी अहमद पटेल यांची चौकशी सुरु आहे. स्टर्लिंग बायोटेक घोटाळा प्रकरणी अहमद पटेल यांच्यावर 5 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. दरम्यान, याआधी ईडीकडून अहमद पटेल यांना या प्रकरणात चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचीही माहिती आहे.

स्टर्लिंग बायोटेक लिमिटेड (एसबीएल)/सांदेसरा ग्रुपच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सुमारे 5 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. याच प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे. यापूर्वी ईडीने अहमद पटेल यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, अहमद पटेल यांनी कोरोनाची परिस्थिती आणि 65 वर्षांवरील वय हे कारण सांगत चौकशीला जाणं टाळलं होतं. यानंतर आता ईडीकडून थेट त्यांच्या घरावरच छापा टाकण्यात आला आहे. यानंतर ईडीकडून अहमद पटेल यांचीही चौकशी केली जात आहे.

ईडीच्या छाप्यानंतर अहमद पटेल आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संदेसरा समुहावर बँकेच्या फसवणुकीचा आणि मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आहे. आता हाच धागा अहमद पटेल यांच्यापर्यंत पोहोचला आहे. यापूर्वी स्टर्लिंग प्रकरणात अहमद पटेल आणि त्यांच्या जावयावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. सांदेसरा बांधव अहमदनगर पटेल यांचा जावई इरफान सिद्दीकी यांना मोठ्या प्रमाणात लाच देतात असा आरोप झाला होता.

स्टर्लिंगच्या एका संचालकांनी चौकशीत सांगितले होते, “चेतन संदेसरा आणि गगन धवन अनेक वेळा पटेल यांच्या जावयाच्या घरी पैशांनी भरलेल्या बॅग घेऊन जात असत. चार-पाच वेळा मी स्वत: त्यांच्याबरोबर होतो. एकावेळी 15-25 लाख रुपये देण्यात येत. चेतन संदेसरा अनेकदा अहमद पटेल यांच्या अधिकृत निवासस्थानी (23 मदर क्रेसेंट, नवी दिल्ली) भेट देत असत. सांदेसरा बांधव कोड वर्डमध्ये त्याला मुख्यालय 2′ असे म्हणत. इरफान सिद्दीकी यांना संदेसरा बंधू जे 23 आणि फैजल पटेल जे 1 म्हणून संबोधत.

संदेसरा समूहाविरोधात 5000 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी केल्यानंतर ईडी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या घरी पोहोचली. या घोटाळ्याबाबत अहमद पटेल यांची चौकशी सुरु आहे. अहमद पटेल हे संदेसरा बंधूंचे अगदी जवळचे मानले जातात.

हेही वाचा :

कशाला बोलायचं, अनेकवेळा डिपॉझिट जप्त केलंय, शरद पवारांची पडळकरांवर पहिली प्रतिक्रिया

काल शरद पवार म्हणाले, लवकरच सविस्तर बोलेन, आज अजित पवार म्हणतात सध्या काही बोलणार नाही!

कृष्णकुंजभोवती कोरोनाचा विळखा, राज ठाकरेंच्या 7 कर्मचाऱ्यांना कोरोना

ओरिएन्टल इन्शुरन्स कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना ताळ्यावर आणल्याशिवाय गप्प बसणार नाही : सुनिल तटकरे

ED raid on Congress leader Ahmed Patel

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.