बंगल्यात जिथे नजर गेली तिथे फक्त नोटाचे बंडलच बंडल; ईडीच्या अधिकाऱ्यांनाही फुटला घाम, राज्यात खळबळ
मुख्य अभियंत्याच्या घरावर आज सकाळपासून ईडीची छापेमारी सुरू आहे. प्रवर्तन निर्देशालय अर्थात ईडीच्या छापेमारीमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.

बिहारची राजधानी पाटणामध्ये संजीव हंस प्रकरणाशी सबंधित प्रकरणात मुख्य अभियंत्याच्या घरावर आज सकाळपासून ईडीची छापेमारी सुरू आहे. प्रवर्तन निर्देशालय अर्थात ईडीच्या छापेमारीमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार सरकारी टेंडरला मॅनेज करणारे अधिकारी सध्या ईडीच्या रडारवर असून, सरकारी अधिकारी आणि ठेकेदारांच्या घरांवर ईडीकडून छापेमारी सुरू आहे.
छापेमारीदरम्यान कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या नोटा मोजण्याचं काम अजूनही सुरू आहे. या प्रकरणातील एका चीफ अभियंत्याच्या घरात एवढ्या मोठ्या प्रमाणात कॅश आढळून आली आहे की, ईडीच्या अधिकाऱ्यांना पैसे मोजण्याच्या तब्बल चार मशिन मागाव्या लागल्या आहेत. पैशे मोजण्याच्या चार मशिनच्या मदतीनं गेल्या आठ तासांपासून ईडीचे अधिकारी हे पैसे मोजत आहेत. मात्र अजूनही रकमेचा एकूण आकडा समोर आलेला नाही. पैसे मोजता -मोजता अधिकाऱ्यांना घाम फुटला आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पाटणामध्ये आज ईडीनं गृह निर्माण विभागाच्या मुख्य अभियंत्याच्या बंगल्यावर छापा टाकाला. हे प्रकरण आयएएस संजीव हंस यांच्याशी संबंधित आहे. याच प्रकरणात आज ईडीकडून मुख्य अभियंत्याच्या घरावर छापा टाकून बंगल्याची झाडा झडती घेण्यात आली. या बंगल्यात एवढा मोठा पैसा आढळून आला आहे की, तो मोजता-मोजता ईडीच्या अधिकाऱ्यांना देखील घाम फुटला आहे. चार मशिनच्या मदतीनं गेल्या आठ तासांपासून पैसे मोजण्याचं काम सुरू आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाटणाच्या एका अलिशान बंगल्यामध्ये मोठ्या प्रमाणात बेनामी मालमत्ता लपवून ठेवल्याची माहिती ईडीला मिळाली होती. या बंगल्यावर ईडकडून छापा टाकण्यात आला. हा बंगला गृहनिर्माण विभागातील चीफ इंजिनिअरचा आहे. या बंगल्यामधून मोठ्या प्रमाणात कॅश जप्त करण्यात आली आहे. छापा टाकल्यानंतर समोरचं दृश्य पाहून अधिकारी हादरून गेले आहेत. जीथे नजर गेली तिथे पैसाच पैसा सापडला आहे. यापूर्वी दिल्लीमधील एका न्यायधिशांच्या घरामध्ये देखील मोठी रक्कम आढळून आली होती. घराला लागलेल्या आगीमुळे हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.