पुणे येथील वादग्रस्त लवासा सिटी प्रकल्प घेणाऱ्यावर ईडीच्या धाडी
ED Raid lavasa: ईडीच्या दिल्ली येथील पथकाने लवासा सिटी प्रकल्प घेणाऱ्या डार्विन कंपनीवर छापेमारी केली. या छापेमारीत काही आक्षेपार्ह कागदपत्रे आणि रोकड जप्त करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात लवासा प्रकल्प उभारण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यातील पहिले खासगी हिल स्टेशन म्हणून लवासा सिटी प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. हा प्रकल्प विविध कारणांमुळे चांगलाच चर्चेत आला होता. वादग्रस्त लवासा सिटी प्रोजेक्ट विकत घेणाऱ्यावर अंमलबजावणी संचालनालय (ED) धाडी टाकल्या आहेत. दिवाळखोरीत निघालेला लवासा प्रकल्प अजय सिंग यांच्या डार्विन कंपनीने विकत घेतला होता. ईडीच्या दिल्ली विभागीय कार्यालयाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ७८ लाखांची रोकड आणि २ लाख रकमेची विदेशी रोकड जप्त करण्यात आली.
कसा आहे लवासा प्रकल्प
ईडीच्या दिल्ली येथील पथकाने लवासा सिटी प्रकल्प घेणाऱ्या डार्विन कंपनीवर छापेमारी केली. या छापेमारीत काही आक्षेपार्ह कागदपत्रे आणि रोकड जप्त करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात लवासा प्रकल्प उभारण्यात आला आहे. १२ हजार ५०० एकर जमिनीवर देशातील पहिला खासगी हिल स्टेशन उभारण्यात आले आहे. हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीकडून उभारण्यात येणारा हा प्रकल्प अडचणीत आला. त्यानंतर हा प्रकल्प घेण्यासाठी डार्विन कंपनी पुढे आली.
1,814 कोटी रुपयांची बोली
मुंबईतील डार्विन ग्रुपने लवासा घेण्यासाठी 1,814 कोटी रुपयांची बोली लावली. परंतु हा प्रकल्प दिवाळखोरीत गेला असल्यामुळे त्याला एनसीएलटीची (नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल) मंजुरी हवी होती. एमसीएलटीने मंजुरी दिल्यानंतर डार्विन ग्रुपने हा प्रकल्प जुलै 2023 मध्ये घेतला. या प्रकल्पाचा व्यवहार झाल्यानंतर डार्विन ग्रुप आठ वर्षात १ हजार ८१४ कोटी रुपयांची भरपाई बँक आणि घरे घेणाऱ्यांना देणार आहे. बँकांची ९२९ कोटी रुपये थकबाकी आहे. तसेच घर खरेदी करणाऱ्या लोकांना ४३८ कोटी रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे.
डार्विन ग्रुपवर ईडीकडून छापेमारी करण्यात आल्यानंतर लवासा प्रकल्प पुन्हा चर्चेत आला आहे. परंतु डार्विन ग्रुपमुळे बँक आणि घरे घेणाऱ्यांना भरपाई मिळणार आहे.