कैदेत असताना आदेश देणे केजरीवाल यांना पडणार भारी ?, आता ED करणार ही कारवाई
ईडी कोर्टाने केजरीवाल यांना 28 मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. केजरीवाल यांची पत्नी सुनीता केजरीवाल आणि त्यांचे खाजगी सचिव बिभव कुमार यांना दर दिवशी सायंकाळी सहा ते सात वाजेदरम्यान केजरीवाल यांची भेट घेण्याची परवानगी दिली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मद्य घोटाळा प्रकरणात ईडीने 28 मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. केजरीवाल यांच्या अटकेनंतर आम आदमी पार्टी ( आप ) आणि स्वत: केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे की ते मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाहीत. अशात केजरीवाल यांनी कैदेत असताना मुख्यमंत्री या नात्याने एक आदेश जारी केला. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री यांना हा आदेश देणे अडचणीचे ठरणार असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणाची कसून चौकशी केली जाणार असल्याचे म्हटले जात आहे.
ED उचलणार पाऊल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने मद्य घोटाळ्यात अटक केली आहे. या प्रकरणात त्यांना 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी मिळाली आहे. कोठडीत असताना केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला नाही. त्यातच त्यांनी कोर्टात असताना एक आदेश जारी केला. दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी म्हटले की मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पाणी आणि सांडपाणी संबंधित लोक कल्याणाची कामे सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ईडीने आता या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. पीएमएलए ( PMLA ) कायद्यानूसार हा आदेश योग्य आहे की नाही याची तपासणी ईडी करणार आहे.
सक्तवसुली संचालनालयाचे ( ईडी ) आदेश काय ?
सक्तवसुली संचालनालयाने ( ईडी ) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 28 मार्चपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. केजरीवाल यांची पत्नी सुनीता केजरीवाल आणि खाजगी सचिव बिभव कुमार यांना दर सायंकाळी सहा ते सात वाजताच्या दरम्यान केजरीवाल यांना अर्धा तास भेटण्याची परवानगी दिली आहे. यातील अर्धातास केजरीवाल यांना त्यांच्या वकीलांशी चर्चा करण्याची अनुमती दिली आहे. त्यामुळे या तासाभरातच केजरीवाल हे आपल्या पत्नी आणि सहाय्यक तसेच वकीलांना भेटू शकणार आहेत.
इंडिया आघाडीची 31 मार्च रोजी निदर्शने
लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या आपच्या केजरीवाल यांना अटक झाल्याने आता आपची सत्ता असलेल्या राज्यात इंडिया आघाडीला फटका बसणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी रविवारी 31 मार्च रोजी सकाळी 10 वाजता इंडिया आघाडीने दिल्लीच्या रामलीला मैदानात एका महारॅलीचे आयोजन केले आहे.