NEET पेपर फुटीप्रकरणी सरकारचा मोठा निर्णय, CBI कडे सोपवला तपास
NEET परीक्षेतील पेपरफुटीचे प्रकरण समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर सरकारने एक मोठा, महत्वाचा निर्णय घेता आहे. नीट ( NEET) परीक्षा 2024 मधील कथित गैरव्यवहाराचा तपास CBI कडे सोपवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
देशभरात सध्या नीट परीक्षेतील गैरप्रकारावरुन जोरदार चर्चा सुरू आहेत. पेपरफुटीचे प्रकरण समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर सरकारने एक मोठा, महत्वाचा निर्णय घेता आहे. नीट ( NEET) परीक्षा 2024 मधील कथित गैरव्यवहाराचा तपास CBI कडे सोपवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने NEET (UG) परीक्षा 5 मे रोजी घेण्यात आली होती. मात्र या परीक्षेत काही अनियमिततेची प्रकरणे समोर आली आहेत. यावरून विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले. याच मुद्यावरून विरोधकांनीही सरकारला प्रश्न विचारत धारेवर धरले होते. दरम्यान परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी, सरकारने पुनरावलोकनानंतर हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक परीक्षांमधील पेपर फुटी रोखण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक परीक्षा कायदा 2024 लागू केला आहे. पेपर फुटी प्रकरणामध्ये कोणतीही व्यक्ती किंवा संस्था सामील असल्याचे आढळल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. त्यासाठी १ कोटींपर्यंतच दंड तसेच १० वर्षांच्या कारावासाची शिक्षादेखील होऊ शकते.
सीबीआय चौकशीचे आदेश
पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या NEET परीक्षेतील गोंधळ आणि पेपर फुटल्याच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश केंद्र सरकारने शनिवारी दिले. की NEET परीक्षेच्या संदर्भात कथित अनियमिततेची काही प्रकरणे समोर आली आहेत. परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी, शिक्षण मंत्रालयाने पुनरावलोकनानंतर हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे, असे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या एका निवेदनात नमूद करण्यात आले.
Ministry of Education entrusts the matter of alleged irregularities in NEET (UG) Examination 2024 to CBI for a comprehensive investigation. pic.twitter.com/Bduc8KpCRt
— ANI (@ANI) June 22, 2024
4 जूनला लागला होता रिझल्ट
5 मे रोजी NEET-UG ची परीक्षा देशातील 4,750 केंद्रांवर घेण्यात आली आणि सुमारे 24 लाख उमेदवारांनी त्यात भाग घेतला. या परीक्षेचा निकाल 4 जून रोजी जाहीर झाला. मात्र निकालानंतर लगेचच प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप करण्यात आला, कारण 67 हून अधिक विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त गुण मिळवले, त्यापैकी काही विद्यार्थी हे एकाच परीक्षा केंद्रातील होते. प्रारंभिक पोलिस तपासात बिहारमध्ये हा प्रकार घडल्याचे आणि पेपर फुटल्याचे उघड झाले. तसेच काही उमेदवार पुढेदेखील आले आणि परीक्षेच्या आदल्या दिवशीच आपल्याला प्रश्नपत्रिका मिळाल्या होत्या असा दावा त्यांनी केला. या आरोपांमुळे अनेक शहरांमध्ये निदर्शने झाली. पेपरफुटीचे प्रकरण समोर आल्यानंतर नीट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेऊन याचिका दाखल केली होती.
UGC NET परीक्षेच्या कथित पेपर लीकची देखील CBI चौकशी करत आहे. ही परीक्षा यावर्षी 18 जून रोजी घेण्यात आली होती आणि दोन दिवसांनंतरच 20 जून रोजी रद्द करण्यात आली होतीती. या प्रकरणी सीबीआयने 20 जून रोजी एफआयआर नोंदवला होता.
CSIR-NET परीक्षाही स्थगित
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने NEET-PG प्रवेश परीक्षेसह CSIR-NET परीक्षाही स्थगित केली. या मुद्यावरून सध्या प्रचंड गदारोळ सुरू असून एनटीए महासंचालक (डीजी) सुबोध सिंग यांना शनिवारी पदावरून हटवण्यात आले.