सौदी अरेबियामध्ये चाँद नजर आया…! भारतात ईद कधी साजरी होणार..?

| Updated on: Apr 21, 2023 | 1:29 AM

रमजानचे रोजे पाळल्यानंतर ईदचा आनंद अल्लाहने बक्षीस म्हणून दिला असल्याचे सांगण्याची प्रथा आहे. यामुळेच ईदच्या दिवशी उपवास करण्यास मनाई आहे. ईदच्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याचे आणि वाटप करण्याचीही प्रथा आहे.

सौदी अरेबियामध्ये चाँद नजर आया...! भारतात ईद कधी साजरी होणार..?
Follow us on

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र केंद्राकडून असा दावा करण्यात आला आहे की, गुरुवारी (20 एप्रिल) मध्यपूर्वेतील बहुतेक देशांमध्ये ईदचा अर्धा चंद्र आपल्या सहज पाहता येणार नाही आणि दुर्बिणीच्या साहाय्याने पाहणे कठीण होणार आहे. या अहवालाद्वारे सौदी अरेबियासह इतर मध्य पूर्व देशांमध्ये शनिवार, 22 एप्रिल रोजी ईद-उल-फित्रचा सण साजरा केला जाणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तर संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएईने ईदच्या पहिल्या दिवशी 2023 ची ईद अल फितर जाहीर केली आहे.

तर चंद्र पाहण्याच्या परंपरेनंतर ही अधिकृत घोषणा करण्यात आली. यूएईच्या चंद्रदर्शन समितीकडून गुरुवारी (20 एप्रिल) पुष्टी केली की ईद अल-फित्रचा पहिला दिवस शुक्रवारी होणार आहे.

तर या समितीने जाहीर केले आहे की शव्वाल महिन्याचा पहिला दिवस शुक्रवार आणि गुरुवार, 20 एप्रिल हा रमजानचा शेवटचा दिवस असणार आहे.

तर सवाबचा उपवास महिना ईदच्या आनंदाने संपतो आणि म्हणजे हा प्रसंग शुक्रवारी 21 रोजी संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार आहे.

तसे तर ईद हा सण जगभरात साजरा केला जातो, पण अरब देशांमध्ये तो पाहिल्यानंतरच साजरा केला जातो. यूएईमध्ये या दिवशी प्रत्येक शहर अल्लाहच्या आशीर्वादाचा आनंद साजरा करताना दिसत आहे. तर सगळे शहर शहर दिव्यांनी उजळून निघाले असताना, नेत्रदीपक फटाक्यांची आतषबाजीही केली जाते.

जगभरातील मुस्लिम दरवर्षी ईदची वाट पाहत असतात. महिनाभर चाललेला उपवास आता संपणार आहेत. तर चंद्रदर्शनानंतर ईद साजरी केली जाणार आहे.

कॅलेंडरनुसार एका महिन्यात 29 आणि 30 दिवस असू शकतात. त्यामुळे चंद्रदर्शन होईपर्यंत ईद साजरी केली जाणार नसल्याचेही काही संस्थांकडून सांगण्यात आले. तर गुरुवारी भारतात चंद्र दिसला नाही, त्यानंतर आता शुक्रवारी संध्याकाळी चंद्र दिसणार असल्याने या दिवशी चंद्र दिसल्यास दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी ईद साजरी केली जाणार आहे.

मुस्लिम धर्मगुरूंनी चंद्र दिसल्याची घोषणा करतात, मात्र अनेक देशांमध्ये चंद्र दिसला आहे. सौदी अरेबियामध्ये गुरुवारी चंद्र दिसला आहे, म्हणजेच शुक्रवारी तेथे ईद साजरी केली जाणार आहे.

याशिवाय कतारमध्येही शुक्रवारी ईद आहे. अमेरिकेच्या फिकह कौन्सिलने सांगितले की, ’20 एप्रिल रोजी सार्वत्रिक वेळेनुसार 4.12 वाजता चंद्र दिसला. त्यामुळे शव्वालचा पहिला दिवस म्हणजे 21 एप्रिलला शुक्रवार असणार असल्याचेही धर्मगुरुंकडून सांगण्यात आले आहे.

तर दिल्लीसह देशभरात ईदची तयारी जोरात सुरू आहे, पण मुख्य प्रश्न असा आहे की ईद कोणत्या दिवशी साजरी होणार? सहसा सौदी अरेबियामध्ये रमजान 1 दिवस आधी सुरू होतो आणि ईद देखील 1 दिवस आधी साजरी केली जाते.

या आधारावर पाहिल्यास सौदी अरेबियामध्ये ईदचा चंद्र दिसल्याने शनिवारी देशभरात ईद साजरी होण्याची शक्यता आहे आणि शुक्रवारी तेथे ईद साजरी केली जाणार आहे. तर दुसरीकडे, भारतातही शनिवारी किंवा रविवारी ईद साजरी केली जाणार आहे. यावेळी ईदचा चंद्र 21 तारखेला म्हणजेच शुक्रवारी दिसण्याची दाट शक्यता असून शनिवारी देशभरात ईद साजरी केली जाणार आहे.

रमजानचे रोजे पाळल्यानंतर ईदचा आनंद अल्लाहने बक्षीस म्हणून दिला असल्याचे सांगण्याची प्रथा आहे. यामुळेच ईदच्या दिवशी उपवास करण्यास मनाई आहे.

ईदच्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याचे आणि वाटप करण्याचीही प्रथा आहे. यामुळेच प्रत्येक मुस्लिमांना ईदच्या नमाजपूर्वी सदाकत-उल-फित्रचे गरिबांमध्ये वाटप करण्याची प्रथा असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येकजण ईदच्या आनंदात सहभागी होऊ शकतो.