लवकरच कुठूनही मतदान करण्याचा हक्क मिळणार? कसा? चाचपणी सुरु

भारतीय निवडणूक आयोग एक महत्तपूर्ण पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. देशातील कोणत्याही मतदान केंद्रावर जाऊन मतदारांना मतदान करता येणं शक्य आहे का?, याची चाचपणी सध्या निवडणूक आयोग करत आहे.

लवकरच कुठूनही मतदान करण्याचा हक्क मिळणार? कसा? चाचपणी सुरु
Follow us
| Updated on: Jan 25, 2021 | 9:27 AM

नवी दिल्ली  :  आपल्याला जर मतदान करायचं असेल तर ज्या मतदारसंघात आपलं नाव आहे किंवा नोंदणी आहे तिथे जाऊन आपल्याला मतदान करावं लागतं. यामध्ये नोकरी करणाऱ्यांना किंवा कामानिमित्त बऱ्याच वेळा बाहेर असणाऱ्या मतदारांना मतदान करणं जमतं असं नाहीच. मात्र आता भारतीय निवडणूक आयोग एक महत्तपूर्ण पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. देशातील कोणत्याही मतदान केंद्रावर जाऊन मतदारांना मतदान करता येणं शक्य आहे का?, याची चाचपणी सध्या निवडणूक आयोग करत आहे. (Election Commission trial To Vote From Any Centre )

देशातील कोणत्याही मतदानकेंद्रावर जाऊन मतदाराला आपलं मत नोंदवता येण्यासाठी भारताच्या निवडणूक आयोगाचं काम सुरु आहे किंबहुना त्याची ट्रायल सुरु असल्याचं भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितलं.  राष्ट्रीय मतदार दिनाच्या पूर्वसंध्येला सुनील अरोरा यांनी भविष्यातील निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा दृष्टीकोन देशवासियांच्या समोर ठेवला.

आम्ही आयआयटी-मद्रास आणि इतर संस्थांसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रिमोट वोटिंग संधोधन प्रकल्प सुरु केला आहे. आमचा हा प्रकल्प प्रगतीपथावर असून त्याची ट्रायलही सुरु झाल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितलं.

प्रत्येक निवडणुकीत हजारो लोकांना भौगोलिक अडथळ्यामुळे, व्यवसाय, शिक्षण, वैद्यकीय उपचार किंवा इतर कारणांमुळे नोंद असलेल्या मतदारसंघात जाता येत नाही. अशा मतदारासांसाठी निवडणूक आयोगाचा हा निर्णय संजीवनी ठरणार आहे. देशातील लाखो मतदारांना याचा फायदा होणार आहे. जर देशातील कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान करण्याचा अधिकार बजावता आला, तर मतदानाची टक्केवारीही वाढण्यास मदत होणार आहे.

मतदान ओळखपत्र आता मोबाईलवर

भारत निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 ला करण्यात आली. याचं दिनाचं औचित्य साधून निवडणूक आयोग दरवर्षी 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन साजरा करतो. आजपासून (सोमवार) भारत निवडणूक आयोगाचे ई मतदार ओळखपत्र (ई ईपिक) वाटप सुरु होणार असून मतदारांना त्यांचे ओळखपत्र मोबाईल अथवा संगणकावर डाऊनलोड करता येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त बलदेस सिंह यांनी दिली. (Election Commission trial To Vote From Any Centre )

हे ही वाचा

मतदानाला जाताना निवडणूक आयोगाचं ओळखपत्र नाही? ‘हे’ आहेत पर्याय

‘निकरवाले’ तामिळनाडूचं भविष्य कधीच ठरवू शकत नाहीत, राहुल गांधींचा आरएसएसवर हल्ला

अशोक चव्हाणांना सोळा नेत्यांच्या काँग्रेस प्रवेशाचे वेध?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.