निवडणूक आयोग ॲक्शन मोडमध्ये..या सुविधेचा गैरवापर थांबवणार..
निवडणूक आयोगाने मागील निवडणुकांमध्ये असे निरीक्षण नोंदवले आहे की, ज्यांना पोस्टल मतपत्रिका पुरवल्या जातात ते मतदार सुविधा केंद्रावर मतदान करत नाहीत.
नवी दिल्लीः पोस्टल बॅलेटचा गैरवापर थांबवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून (Election Commission) ॲक्शन प्लॅन तयार केला गेला आहे. पोस्टल बॅलेटचा (Postal Ballot) संभाव्य गैरवापर टाळणयासाठी हा प्लॅन केला गेला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता पोस्टल बॅलेटसंबंधित नियमांमध्ये बदल करण्याची मागणीनेही सरकारकडे जोर धरला आहे. लोकांनी पोस्टल बॅलेटसाठी नियुक्त केलेल्या सुविधांवरच मतदान करावे आणि तो बॅलेट पेपर जास्त वेळ सोबत ठेवू नयेत अशा सुचनाही देण्यात आल्या आहेत.
मतदान प्रक्रियेत कोणताहा गैरवापर होऊ नये यासाठी वेगवेगळे उपाययोजना केल्या जात आहेत. पोस्टल मतपत्रिकांचा गैरवापर थांबवण्यासाठी निवडणूक आयोगही आता मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे.
निवडणुकीसाठी मतदारांना प्रदान केलेल्या पोस्टल बॅलेट सुविधांचा होणारा गैरवापर थांबवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून सुधारणा करण्यात येणार आहेत.
पीटीआयच्या वृत्तानुसार निवडणूक आयोगाच्या या निर्णयामागील विचार सांगताना म्हटले आहे की, लोकांनी केवळ पूर्वनिश्चित सुविधा केंद्रांवरच मतदान करावे आणि ती मतपत्रिका आपल्याजवळ जास्त वेळ ठेऊही नये अशीही सुचनाही देण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाच्या 16 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की, निवडणूक असेल त्यावेळी मतदारांनी ‘मतदार सुविधा केंद्र’वर मतदान करावे. आणि त्याची खात्री करण्यासाठी कायदा मंत्रालयाकडेही शिफारस करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने नियम 1961 च्या नियम 18 मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव सरकारला देण्यात आला आहे.
निवडणुकासंदर्भात सांगण्यात आले आहे की, निवडणूक आयोगाने मागील निवडणुकांमध्ये असे निरीक्षण नोंदवले आहे की, ज्यांना पोस्टल मतपत्रिका पुरवल्या जातात ते मतदार सुविधा केंद्रावर मतदान करत नाहीत.
परंतु त्यांच्या पोस्टल मतपत्रिका सोबत घेऊन जातात कारण त्यांच्याकडे नियमांनुसार मतदान होते. तर मतमोजणीच्या दिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत पोस्टल मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याचा पर्याय देण्यात आला आहे.
आयोगाच्या नियमांनुसार, निवडणूक ड्युटीवर असलेले लोक प्रशिक्षणाच्या वेळीच रिटर्निंग ऑफिसरकडे पोस्टल बॅलेटसाठी अर्ज करतात.
त्यानंतर त्यांना पोस्टल मतपत्रिका देण्यात येतात. त्यामुळे त्यांच्यासाठी सुविधा केंद्रदेखील तयार केले आहे,त्याच ठिकाणी हे लोक निवडणुकीदिवशी कर्तव्यावर असताना त्यांचे मत देऊ शकतात.
या सुविधेत मात्र सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गुप्त आणि पारदर्शक मतदानाची खात्री केली जाते. निवडणूक ड्युटीवर असलेल्या लोकांकडे आणखी एक पर्याय आहे.
यामध्ये तो पोस्टल मतपत्रिका पोस्टाद्वारे नंतर रिटर्निंग ऑफिसरकडे पाठवू शकतात. यामध्ये मतमोजणीच्या दिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत पोस्टल मतपत्रिका पाठवता येतात आणि असे अनेक मतदार टपाल मतपत्रिका पाठवतानाही वेळ घालवत असल्याने या नियमामध्ये बदल केले गेले आहेत.