पंतप्रधान नरेंद्र मोदीही हळहळले, राम जन्मोत्सवात विहिरीवरचा ढाचा खचला, 11 जणांचा मृत्यू

देशभरात आज रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. इंदूरमधील बेलेश्वर मंदिरातही दरवर्षीप्रमाणे रामनवमी उत्सव साजरा होत होता. मात्र अचानक घडलेल्या एका घटनेने या उत्सवाला गालबोट लागले.

पंतप्रधान नरेंद्र मोदीही हळहळले, राम जन्मोत्सवात विहिरीवरचा ढाचा खचला, 11 जणांचा मृत्यू
इंदूरमध्ये रामनवमी उत्सवादरम्यान दुर्घटना, 11 भाविकांचा मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 30, 2023 | 5:12 PM

इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूरमधील जुनी पोलीस स्टेशन हद्दीतील बेलेश्वर मंदिरात गुरुवारी दुपारी एक मोठी दुर्घटना घडली. हवन आणि पूजा सुरू असताना अचानक मंदिरातील विहिरीवरील आच्छादन कोसळले. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 19 जणांना बाहेर काढण्यात आले आहे, अशी माहिती इंदूरचे जिल्हाधिकारी डॉ. इलैयाराजा टी. यांनी दिली. पोलीस आणि एसडीआयआरएफचे पथकाकडून बचाव कार्य सुरु आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली अडकलेल्या सर्व लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.

काय आहे ट्विटमध्ये?

इंदूरमधील दुर्घटनेने अत्यंत दु:ख झाले आहे. मुख्यमंत्री @ChouhanShivraj जी यांच्याशी बोललो आणि परिस्थितीची माहिती घेतली. राज्य सरकार जलद गतीने बचाव आणि मदत कार्य करत आहे. सर्व पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत माझी प्रार्थना आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही रामनवमीनिमित्त भव्य कार्यक्रम सुरु होता

गुरूवारी सकाळी मंदिरात हवन पूजेचा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अनेक भाविक मंदिरात उपस्थित होते. अचानक झालेल्या अपघातामुळे त्यांच्यापैकी कुणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही. दरवर्षी रामनवमीनिमित्त मंदिरात भव्य कार्यक्रम आयोजित केला जातो. यंदाही मंदिरात यज्ञ केला जात होता. यामध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने लोक मंदिरात दाखल झाले. अशा स्थितीत मंदिराची इमारत एवढ्या लोकांचा भार सहन करू शकली नाही.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक आमदार आकाश विजयवर्गीय आणि माजी मंत्री जितू पटवारी घटनास्थळी दाखल झाले. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दुर्घटनेनंतर डीएम आणि आयुक्तांशी फोनवर चर्चा केली आणि अडकलेल्या भाविकांना लवकरात लवकर बाहेर काढण्याच्या सूचना दिल्या.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.