Elon Musk याच्या विधानाने भारतात येणार वादळ; EVM हटविण्याची मागणी, हॅकिंगबाबत केला आजवरचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

Elon Musk on EVM Hacking : भारतात ईव्हीएमवरुन विरोधकांनी रान उठवलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने याविषयीची सर्वोच्च फैसला सुनावला आहे. पण अजूनही विरोधकांचं समाधान झालेले दिसत नाही. जनतेतही याविषयीचा संभ्रम दिसतो. आता एलॉन मस्क याने बॉम्ब टाकला आहे.

Elon Musk याच्या विधानाने भारतात येणार वादळ; EVM हटविण्याची मागणी, हॅकिंगबाबत केला आजवरचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
ईव्हीएम विषयीचा मोठा दावा
Follow us
| Updated on: Jun 16, 2024 | 10:29 AM

भारतात EVM मशीनवरुन अगोदरच गदारोळ आहे. या प्रकरणात निवडणूक आयोगाला सुद्धा अनेकदा स्पष्टीकरण द्यावे लागले. निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना या मुद्यावरुन चिमटा काढला होता. लोकसभा निवडणूक 2024 पूर्वीपासूनचा ईव्हीएमविरोधात विरोधकांनी रान उठवले होते. सर्वोच्च न्यायालयाने सुप्रीम निकाल दिल्यानंतरही विरोधकांचे समाधान झालेले नाही. त्यातच आता Tesla, SpaceX चा सीईओ आणि जगातील श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क याने पण आगीत तेल ओतले आहे. त्याने ईव्हीएमप्रकरणात मोठा बॉम्ब टाकला आहे.

काय आहे प्रकरण

हे सुद्धा वाचा

एलॉन मस्क याने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार रॉबर्ट एफ केनडी यांच्या युनियर ही पोस्ट शेअर केली आहे. सोशळ मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्याने ईव्हीएम विषयी भावना व्यक्त केल्या आहेत. “इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन नष्ट करायला हव्यात. या मशीन मानव आणि AI च्या मदतीने हॅक होण्याचा मोठा धोका आहे. हा धोका कमी आहे, पण त्याने मोठी गडबड उडते.”, असे मत त्याने पोस्टमध्ये व्यक्त केले.

काय म्हणाले केनेडी

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार रॉबर्ट एफ केनडी यांची सोशल मीडियावरील एक पोस्ट चर्चेत आली आहे. प्युर्टो रिको येथील निवडणुकीदरम्यान EVM मधील गडबडीविषयी त्यांनी त्यात सविस्तर लिहिले. प्युर्टो रिकोच्या प्राथमिक निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये अनेक त्रुटी आढळल्या. पण ही गडबड लागलीच लक्षात आली. त्यानंतर मतदार, मतदान यांचा पडताळा करण्यात आला. सर्व काही ठीक झाले, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले होते.

EVM हॅकिंगची भीती

पेपर ट्रेल असल्याने प्युर्टो रिको येथील गडबड पकडल्या गेली. पेपर ट्रेल म्हणजे बॅलेट पेपर, कोणाला मतदान केले याची माहिती देणारा कागद, जो मतदारांच्या हाती असतो. पण ज्या भागात असा पेपर ट्रेल नाही, तिथे अमेरिकन नागरिकांना माहिती पण होणार नाही की त्यांचे मतदान मोजण्यात आले की नाही आणि त्यांनी ज्या उमेदवाराला ते दिले, ते त्यालाच मिळाले? अशी शंका केनडी यांनी व्यक्त केली. त्याला एलॉन मस्क याने उत्तर दिले आहे.

Non Stop LIVE Update
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.