Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मस्क आल्यानंतर ट्विटर ॲक्शन मोडमध्ये..इतकी भारतीय अकाऊंट बंद

भारतातील 52,141 अकाऊंटवर बंदी घालण्यात आली आहे.

मस्क आल्यानंतर ट्विटर ॲक्शन मोडमध्ये..इतकी भारतीय अकाऊंट बंद
Follow us
| Updated on: Nov 01, 2022 | 7:09 PM

नवी दिल्लीः ट्विटरचे नवे मालक इलॉन मस्क बनल्यापासून अनेकांना ते काय निर्णय घेतात याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. त्यात त्यांनी अनेक बदलही केले आहेत. त्यातीलच एक बदल म्हणजे भारतातील 52,141 अकाऊंटवर बंदी घालण्यात आली आहे. 26 ऑगस्ट ते 25 सप्टेंबर या काळात ही खाती बंद करण्यात आली होती. बाल लैंगिक शोषण, गैर-सहमतीची नग्नता आणि संबंधित गोष्टींचा प्रचार करण्यासाठी या खात्यांवर बंदी घालण्यात आली होती.

इलॉन मस्कच्या आगमनानंतर ट्विटरने दहशतवादाबाबत प्रचार करणाऱ्या खात्यांवरही बंदी घातली गेली आहे.

ट्विटरने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे की, त्यांना भारतीय यूजर्सकडून 157 तक्रारी मिळाल्या होत्या. त्यानंतर त्या संदर्भात कारवाई करुन 129 यूआरएवर कारवाई केली गेली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.

ट्विटरने स्पष्ट केले आहे की, अकाऊंट बंद करण्यासाठी 43 तक्रारी कंपनीकडे आल्या होत्या. त्यामुळे ही ट्विटर अकाऊंट्स काढून टाकण्यात आली आहेत. त्याबरोबरच या संदर्भात आलेल्या तक्रारीदारांनाही कंपनीकडून योग्य तो प्रतिसाद देण्यात आला आहे.

तक्रारी केल्या गेल्या तरी व्हॉट्सॲपवरीलही या नियमामुळे भारतातील लाखो खाती दरमहा सस्पेंड होत असतात. आयटी नियम 2021 नुसार, मोठ्या प्लॅटफॉर्मसाठी तक्रार अधिकारी असणे आवश्यक आहे. मात्र अकाऊंट सस्पेंड झाल्यानंतर त्याचा अहवालही कंपनीला द्यावा लागतो असंही कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

मस्क आणि ट्विटर यांच्यातील करार पूर्ण झाला आहे. आता ट्विटरचा मालक इलॉन मस्क झाला आहे. त्यामुळे आता या व्यवहारातून पैसे कमवण्याचे नवीन मार्ग शोधण्यात येत आहेत. तसेच आता ट्विटरवर ब्लू टिकमार्कसाठी वापरकर्त्याला 700 रुपये खर्च करावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.