इलोन मस्कनी ट्वीटरची चिमणी काढून लोगो एक्स केला, पण रेल्वेत X चिन्हाचा अर्थ माहीती आहे का?
इलोन मस्क यांनी ट्वीटरचा पूर्वपरिचित लोगो लहानसा निळा पक्षी असलेला पूर्वपरिचित लोगो बदलून त्याच्या जागी एक्स असे इंग्रजी आद्याक्षराचे डीझाईन असलेला लोगो धारण केला आहे. त्यामुळे यावर विविध स्वरुपाच्या प्रतिक्रीया येत आहेत.
मुंबई | 27 जुलै 2023 : टेस्ला आणि स्पेसएक्स कंपनीचे मालक ट्वीटरचे सर्वेसर्वा अब्जाधीश इलोन मस्क यांनी ट्वीटरचा लोगो सोमवारी अचानक बदलून टाकला. आधीच्या निळ्या रंगाच्या छोट्या गोंडस पक्षाऐवजी इंग्रजी आद्याक्षर ‘एक्स’ असा नवा लोगो करुन टाकला आहे. परंतू या इंग्रजी एक्स आद्याक्षरावरुन समाजमाध्यमावर खूपच मजेशीर मिम्स व्हायरल केले जात असताना आता रेल्वेने त्यांच्या भाषेत ‘एक्स’ म्हणजे काय ? याचे स्पष्टीकरण ट्वीटरवर केले आहे. तर रेल्वेच्या भाषेत ‘एक्स’ फॅक्टर काय आहे ते पाहूयात…
इलोन मस्क यांनी आपल्या मायक्रो ब्लॉगिंग साईट कंपनी ट्वीटरचे पूर्वपरिचित लोगो लहानसा निळा पक्षी बदलून त्याच्या जागी एक्स असे इंग्रजी आद्याक्षराचे डीझाईन असलेला लोगो धारण केला आहे. त्यामुळे यावर विविध स्वरुपाच्या प्रतिक्रीया येत आहेत. काहीनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. आधीचा पक्षी असलेला लोगो सवयची झाला होता. आता आपण ट्वीट केले असे म्हणण्याऐवजी मी एक्स केले, माझे एक्स बघितले का ? असं म्हणून विनोद केले जात आहेत. दुसरीकडे मार्क झुकरबर्ग यांनी थ्रेड काढल्याने नाराज झालेल्या इलोन मस्क यांची ही नवीन चाल आहे का ? असाही सवाल केला जात आहे.
दरम्यान, दक्षिण-पश्चिम रेल्वेने रेल्वेच्या भाषेत कोच किंवा डब्यांच्या शेवटी पिवळ्या इंग्रजी अक्षरात ‘ X ‘ चिन्ह लिहीण्यामागचे कारण काय हे स्पष्ट करीत या मिम्सच्या वादात उडी घेतली आहे. रेल्वेचे म्हणणे आहे की एक्स चिन्ह प्रत्येक ट्रेनच्या शेवटच्या डब्याच्या पाठी लिहीलेले असते. त्यामुळे स्टेशनातून गाडी जात असताना स्टेशन मास्तरांना किंवा रेल्वेच्या सिग्नल देणाऱ्या कर्मचाऱ्यांना समजते की गाडीचे सर्व डबे सुरळीत जोडलेले गेलेले आहेत, मध्येच कुठला डबा निघालेला नाही. जर हे एक्स चिन्ह शेवटच्या डब्यावर नसेल तर गाडीचे डबे कपलिंग तुटून वाटेत निखळलेले आहेत हे रेल्वे कर्मचाऱ्यांना वेळत निर्दशनास येते. म्हणजे गाडीचे सर्व डबे सुरळीत जोडलेले असल्याची ही रेल्वेच्या कामकाजातील खात्रीशीर खूण आहे.
नागरिकांची बदलावर प्रतिक्रिया काय ?
अब्जाधीश इलोन मस्क यांनी ट्वीटरचा नवा लोगो सोमवारी लॉंच केला. काळ्या पार्श्वभूमीवर हा एक्सचा लोगो नेटवर्कींग साईटवर पाहून मिश्र प्रतिक्रीया आल्या आहेत. तर अनेकांना यावर मजेशीर मिम्स व्हायरल केले आहेत. काही युजरनी रिब्रॅंडींग करण्याऐवजी नॉन व्हेरीफाईड खात्यांचा प्रश्न आणि युजरचा अनुभव आणखी चांगला करण्याबरोबरन नवीन सुविधा वाढविण्यासाठी मस्क यांनी प्रयत्न करायला हवा होता.