भारतातील या जागी…नुसतं डोकावाल,तरी विषारी बाण घुसतात, सर्वात धोकादायक ठिकाण
भारतात बाहेरुन येणाऱ्यांना व्हीसाची गरज असते. तसेच आपल्याही बाहेरच्या देशात जायचे असेल व्हीसा आणि पासपोर्टची गरज असते. परंतू भारतात एक अशी जागा आहे तेथे बाहेरच्या कोणालाच प्रवेश नाही ...

भारत एक लोकशाही देश आहे. येथील नागरिकांना कोणत्याही राज्यात राहण्याचा आणि मुक्तविहार करण्याचा घटनेने हक्क दिलेला आहे. नोकरी निमित्त किंवा पर्यटनासाठी तुम्ही देशाच्या कोणत्याही कोपऱ्या जाऊ शकता. तेथे राहू शकता कायद्यानुसार तुम्हाला कोणी रोखू शकणार नाही.परंतू तुम्हाला एक जागा माहीती आहे का ? या जागेत जाणेच काय नुसतं वाकून जरी पाहायला जाल तर सपासप बाणांचा वर्षावर तुमच्या अंगावर होऊ शकतो…म्हणजे येथे जाणे म्हणजे साक्षात यमाला आमंत्रण आहे.
तुम्हाला माहीती असेलच की भारतात बाहेरुन येणाऱ्यांना व्हीसाची गरज असते. तसेच आपल्या परदेशातच स्थायिक व्हायचं असले तरी व्हीसा आणि पासपोर्टची गरज असते. परंतू भारतात एक अशी जागा आहे. तेथे पासपोर्ट आणि व्हीसा काही कामाचे नाही. येथे जो कोणी गेला तो संपला,साक्षात यमाला आमंत्रण जणू..आपण नॉर्थ सेंटिनल बेटांबद्दल बोलत आहोत.आयलँडवर बाहेर येणाऱ्या नागरिकांना मृत्यूची शिक्षा मिळते. त्यामुळे बाहेरच्या लोकांना प्रवेश बंदी आहे.
नियम तोडण्याची शिक्षा
अंदमान आणि निकोबार बेटांचा हा भाग आहे. या नॉर्थ सेंटिनल बेटांवर बाहेरील लोकांना प्रवेश बंदी आहे. अलिकडेच या बेटावर एका अमेरिकन नागरिकाने प्रवेश करण्याचा प्रयत्न. 24 वर्षांचा मिखाइलो विक्ट्रोविच पोल्याकोव याने पूर्व परवानगी याशिवाय या बेटावर प्रवेश मिळविला होत. हा परदेशी तरुण 26 मार्च रोजी पोर्ट ब्लेअर येथे गेला होता. त्यानंतर गुपचुप या नॉर्थ सेंटिनल बेटांवर घुसला. त्यानंतर 31 मार्चला पोलीसांनी त्याला अरेस्ट केले आहे. या व्यक्तीची माहीती आता गृह विभाग दिली आहे.
खूपच खतरनाक आयलँड
नॉर्थ सेंटिनल द्वीप सेंटिनली लोक राहातात.ही जमात लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. या जमातीला जगातील अंतिम प्री-नियोलिथीक ग्रुपचे सदस्य असे म्हटले जाते. ही जमाती 12,000 ते 8,500 ख्रिस्तपूर्वचे जमात आहेत. या बेटावर 500 लोक रहातात. हे लोक जगाशी संपूर्णपणे संपर्क नष्ट झालेले लोक आहेत. बाहेरुन आलेल्या कोणत्याही सदस्याला हे लोक ठार मारतात. साल 2018 मध्ये एकाने या जमातीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर साल २००६ रोजी मासे पकडताना दोन मच्छीमार चुकुन या बेटावर गेले,त्यांचाही जीव घेण्यात आला.