Coronavirus In India : कोरोनाच्या तिसऱ्या म्युटेंटची एन्ट्री? देशवासियांची धास्ती वाढवणारी बातमी

दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगढ या राज्यांतून घेण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये ट्रिपल म्युटेंटची लक्षणे आढळली आहेत. या राज्यांमधून 17 नमुने घेण्यात आले होते. त्या नमुन्यांच्या अहवालातून ट्रिपल म्युटेंटचा धडकी भरवणारा निष्कर्ष समोर आला आहे. (Entry of Corona's third mutant, News that raises the concern of the indian)

Coronavirus In India : कोरोनाच्या तिसऱ्या म्युटेंटची एन्ट्री? देशवासियांची धास्ती वाढवणारी बातमी
पालकांनो, कोरोनापासून लहान मुलांना सांभाळा!
Follow us
| Updated on: May 22, 2021 | 10:28 AM

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशाची चिंता भलतीच वाढवली आहे. सध्या दररोज अडीच लाखांच्या आसपास नवीन रुग्ण सापडत आहेत. जवळपास सगळ्याच राज्यांची हालत खराब आहे. कोरोनाची रुग्णवाढ कशी रोखायची हा सरकार आणि आरोग्य प्रशासनापुढील यक्ष प्रश्न आहे. अशातच कोरोनाच्या तिसऱ्या म्युटेंटने देशाची चिंता आणखी वाढवली आहे. (Entry of Corona’s third mutant, News that raises the concern of the indian)

ट्रिपल म्युटेंटची लक्षणे

दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगढ या राज्यांमध्येच आधीच कोरोनाची दुसरी लाट प्रचंड फैलावली आहे. सगळीकडे मोठी रुग्णवाढ होत आहे. अशातच आता ट्रिपल म्युटेंटच्या एन्ट्रीची बातमी पुढे आल्यामुळे या राज्यांची चिंता आणखी वाढली आहे. डबल म्युटेंट वेरिएंट म्हणजे एकाच व्यक्तीला कोरोनाच्या दोन वेगवेगळ्या वेरिएंटची लागण. याची तीव्रता कैक पटीने अधिक आहे. त्यामुळे तिसऱ्या म्युटेंट किती घातक असेल, याची नुसती कल्पना करणेही कठिण जात आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आढळला होता डबल म्युटेंट

डबल म्युटेंट व्हेरिएंटला शास्त्रीयदृष्टया B.1.617 असे नाव देण्यात आले आहे. हा म्युटेंट सर्वात आधी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये निदर्शनास आला होता. सुरुवातीपासूनच हा म्युटेंट घातक होता. त्यामुळे देशात कोरोनाचा मृत्युदर वाढला. हा म्युटेंट रोखण्यास सरकार पातळीवर वेळीच ठोस पावले उचलली गेली नाही. त्यामुळे डबल म्युटेशनपासून आता ट्रिपल म्युटेंटचा धोका निर्माण झाला आहे. ज्यावेळी कोणताही विषाणू त्याच्याविरोधात केल्या जाणाऱ्या उपायांना दाद न देण्याच्या दृष्टीने स्वतःमध्ये काही जनुकीय बदल घडवून आणत असतो, त्याला म्युटेंटची क्रिया म्हटले जाते. म्युटेशन होण्यापूर्वी विषाणूसाठी तयार केलेल्या लशीचा किंवा औषधाचा परिणाम म्युटेशन झालेल्या विषाणूवर होईल का, याची खात्री देवू शकत नाही. जीनोम सिक्वेन्सिंगद्वारे अशा प्रकारची म्युटेशन्स शोधण्याचे काम केले जाते. म्युटेशन्स काही वेळा जास्त धोकादायक असू शकतात, तर काही म्युटेशन्स फारसे धोकादायक नसतात. या पार्श्वभूमीवर डबल म्युटेंटप्रमाणेच ट्रिपल म्युटेंटही घातक असेल, तर देशातील कोरोनाचे थैमान इतक्यात थांबण्याची चिन्हे नाहीत. (Entry of Corona’s third mutant, News that raises the concern of the indian)

इतर बातम्या

पीएम केअर फंडातील 80 टक्के व्हेंटिलेटर जळगावात धूळखात, खासदार उन्मेश पाटील यांचा गंभीर आरोप

…म्हणून पोलीस पुन्हा एकदा मैदानात उतरले, मुंबई पोलीस आयुक्तांचा विश्वास

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.